संसदेत निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बजेटची उत्सुकता शिगेला होती. काही खुश तर काही नाराज हा दरवर्षीचा खेळ आहे. बजेट सांगणारे अर्थमंत्री सगळ्यांच्या नजरेसमोर असतात त्यामुळे चांगलं वाईट सगळं श्रेय आणि जबाबदारी हि अर्थमंत्र्यांची असते. पण बजेट तयार कारण्यापाठीमागे अनेक दिग्गज असतात. ज्यांचा उल्लेख सहसा होत नाही. २०२२ च्या बजेटच्या पाठीमागील चेहरे कोण आहेत आणि त्यांची पात्रता काय आहे हे समजून घेऊ.
टीव्ही सोमनाथन
वित्त मंत्रालयात वित्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे टीव्ही सोमनाथन हे या बजेट टीमचा प्रमुख चेहरा आहेत. खरे तर अर्थ मंत्रालयाच्या पाच सचिवांपैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची अर्थ सचिवपदी नियुक्ती करण्याची परंपरा आहे. सध्या ही मोठी जबाबदारी सोमनाथन सांभाळत आहेत. सोमनाथन हे तामिळनाडू केडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी जागतिक बँकेतही काम केले आहे. कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या सोमनाथन यांच्यासमोर बजेटमध्ये खर्चावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
तरुण बजाज
तरुण बजाज, १९८८ च्या हरियाणा बॅचचे IAS अधिकारी, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव आहेत. अर्थमंत्रालयात येण्यापूर्वी बजाज यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. येथे काम करताना त्यांनी देशासाठी अनेक रिलीफ पॅकेजवर काम केले आहे. एका अहवालानुसार तीन आत्मनिर्भर भारत पॅकेजला आकार देण्यात तरुण बजाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
अजय सेठ
वित्त मंत्रालयातील सर्वात नवीन सदस्य असूनही अजय सेठ आर्थिक व्यवहार सचिव म्हणून नियुक्त केले आहेत. सर्वांच्या नजरा असतील कारण DEA भांडवली बाजार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित धोरणांसाठी नोडल विभाग आहे. अजय हे कर्नाटक कॅडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भारताची जीडीपी वाढ टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन करण्याचे अवघड काम अजय सेठ यांच्याकडे आहे.
देबाशिष पांडा
देबाशीष पांडा हे वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत. पांडा हे बजेट टीममधील सर्वात महत्त्वाचा भाग मानू शकता कारण अर्थसंकल्पातील आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व लहान-मोठ्या घोषणा त्याच्या जबाबदारीत येतात. देबाशिष पांडा १९८७ च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्यावर वित्तीय व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सोबत जवळून काम करण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
तुहीन कांता पांडे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट टीममध्ये तुहीन कांता पांडे यांच्या नावाचाही समावेश आहे. ज्यांच्या खात्याकडे सर्वांचे लक्ष असेल. खरं तर तुहीन कांता १९८७ च्या बॅचचे ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहेत. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे ते सचिव आहेत. त्यांची ऑक्टोबर २०१९ मध्ये DIPAM चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधील प्रोफेसर लुग्गी जिंगल्स आणि रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे साध्य केले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सुब्रमण्यम यांना मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आले होते. त्यांना बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणाचे मास्टर मानले जाते.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !