फेब्रुवारी 22, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या या अफवा किती खऱ्या किती खोट्या ?

१० डिसेंबरला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे. देशाचे पंतप्रधान आणि इतर राजकीय लोकांनी सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर मात्र सोनिया गांधी यांच्या बद्दलच्या अफवांचा पूर आला आहे. सोनिया गांधी लग्नाच्या अगोदर बार डान्सर होत्या, त्याच्या वडिलांचे मुसोलिनी सोबत संबंध होते, सिताराम केसरी यांच राजकीय जीवन सोनिया गांधी यांनी संपवले इत्यादी या अफवा किती खऱ्या आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे. मराठी मिररच्या आमच्या टीमने अफवांची पडताळणी केली आहे.

सोनिया गांधी बार डान्सर होत्या का ?

सोशल मीडियाचे ट्रोलर सोनिया गांधी यांना बार डान्सर म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करतात आणि तशा अफवा त्या राजकारणात येण्याच्या अगोदर पासून आहेत. मात्र सोनिया गांधी बार डान्सर असल्याच्या अफवा पूर्ण चुकीची आहे. सोशल मीडियाचे ट्रोलर हॉलिवूडची अभिनेत्री ‘मारलीन मोंरिओ’ चे फोटो सोनिया गांधी यांचे आसल्याचे पसरवतात. (वरील फोटो अभिनेत्री मारलीन मोंरिओचा तो आहे ) तर सत्यता अशी आहे सोनिया गांधी ह्या मूळच्या इटलीच्या आहेत. लंडनच्या केम्ब्रिज विद्यपीठात शिकण्यासाठी त्या आल्या होत्या. युरोपमध्ये विद्यार्थी शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कॉलेज नंतर थोडा वेळ काम करतात. तशी युरोपात संस्कृती आहे. सोनिया गांधी या देखील लंडनमध्ये स्वतःचा खर्च भागवण्यासाठी बार मध्ये बिल घेण्याचे काम करत होत्या. जे खूप साधारण मानले जायचे. राजीव गांधी आणि त्यांची भेट बार मध्ये काम करत असताना झाली असल्याचे सोनिया गांधी यांच्या बद्दल लिहणारे लेखक म्हणतात.

सोनिया गांधी यांचे खरे नाव काय ‘ऍन्टोनिया कि सोनिया’ ?(what is sonia gandhi real name)

सोनिया गांधी यांना ट्रोल करणारे त्यांचा उल्लेख ‘ऍन्टोनिया माईनो’ असा करतात. रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी सोनिया गांधी यांचा नेहमी असाच उल्लेख करतात. ही मात्र अफवा आहे असे आपण म्हणू शकत नाही कारण सोनिया गांधी यांचे खरे नाव ‘एड्विगे ऍन्टोनिया अल्बिना माईनो’ असे आहे. १९६८ मध्ये राजीव गांधी यांच्या सोबत लग्न झाल्यावर इंदिरा गांधी यांनी त्यांचे भारतीय नामकरण केले आणि तेंव्हा पासून त्या सोनिया गांधी हेच नाव लावतात.

सोनिया गांधी यांचे वडील मुसोलिनचे समर्थक होते का ?(sonia gandhi father mussolini)

दुसऱ्या महायुद्धच्या वेळेस इटलीवर हुकूमशहा ‘मुसोलिनी राज्य करत होता. मुसोलिनीला सुरुवातीच्या काळात सर्व स्तरातूनच पाठिंबा मिळत होता. इटलीची जनता मुसोलिनीवर प्रेम करत होती. नंतर युध्दा दरम्यान मुसोलिनीच्या खरा चेहरा लोकांना समोर आला. सोनिया गांधी यांचे वडील मुसोलिनीचे समर्थक होते असे आपण म्हणू शकतो पण सोनिया गांधी यांचा जन्म १९४४ साली झाला आहे आणि त्याच वर्षांमध्ये इटली मधील लोकांनी मुसोलिनीचा भर रस्त्यात खून केला. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या वडिलांचा मुसोलिनीशी संबंध जोडणे पूर्ण बरोबर होणार नाही.

काँग्रेस अध्यक्ष सिताराम केसरी यांचं राजकीय आयुष्य सोनिया गांधी यांनी संपवले का ?

१९९१ च्या राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी परिवार राजकारणापासून दूर झाला होता. सोनिया गांधी यांना राजकारणात यावे यासाठी काँग्रेस नेते विनंती करत होते मात्र त्या राजकारणापासून दूर होत्या. १९९६ ला लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हारली, गांधी परिवाराशिवाय काँग्रेस जिंकणार नाही असा काँग्रेस नेत्यांचा समज झाला आणि त्यांनी सोनिया गांधी यांना राजकारणात येण्यासाठी आग्रह केला. शेवटी १९९८ मध्ये सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते सिताराम केसरी नियमाप्रमाणे काँग्रेसचा अध्यक्ष पाच वर्ष त्याचा कार्यकाळ पूर्ण करतो पण सोनिया गांधी यांना अध्यक्षा करण्यासाठी सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने सिताराम केसरी याना दोनच वर्षामध्ये अध्यक्ष पदावरून हटवले. १९९८ पासून सोनिया गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत.

सीताराम केसरी यांचं राजकीय आयुष्य सोनिया गांधी यांनी संपवले ही अफवा पूर्ण बरोबर नसली तरी ती पूर्णपणे चुकीची देखील नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.