सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

विदेशातून पैशांची देवाण-घेवाण होणार सोपी, व्हाट्सअप विरुद्ध भारत सरकार,फेसबुकवर जर्मनीची फटकार, यूट्यूब करणार क्रियेटर्स ला मालामाल….

१) गुगल कडून कमालीची खबर

आता गुगलच्या गुगल पे ॲप द्वारे विदेशातून भारतामध्ये पैसे मागवणे होणार सोपे. जर तुम्ही विदेशातून कधी पैसे मागवले असतील तर तुम्हाला माहित असल की हे किती क्लिष्ट काम आहे. मात्र आता bahutekankade असलेलं गुगल ॲप हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेतील कोणताही व्यक्ती जवळ गुगल पे असल्यास तो भारतामधील व्यक्तीला तिथून पैसे पाठवू शकतो सध्या ही सेवा अमेरिका आणि सिंगापूर या दोन देशांपुरती मर्यादित आहे. म्हणजेच तुम्ही अमेरिका आणि सिंगापूर मधून कोणत्याही गुगल पे यूजर कडून भारतामध्ये पैसे मागवू शकता. लवकरच बाकी देश सुद्धा यादीमध्ये समाविष्ट केले जातील. यापूर्वी मात्र तुम्हाला बँक ट्रान्सफर किंवा पेपाल सारख्या ॲप किंवा सेवा वर अवलंबून राहावे लागत होते आता हेच काम गुगलने अतिशय सोपे करून दिले आहे.

२) व्हाट्सअप विरुद्ध भारत सरकार

व्हाट्सअपचा संघर्ष काही थांबताना दिसत नाहीये. जेव्हापासून व्हाट्सअप ने त्यांची प्रायव्हसी पॉलिसी भारतामध्ये अपडेट करण्याचं ठरवलं तेव्हापासून व्हाट्सअप विरुद्ध भारत सरकार असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. याच विरुद्ध एक सुनावणीमध्ये दिल्ली हायकोर्टात व्हाट्सअप ने आखिर त्यांची बाजू मांडताना विविध कंपन्यांचे उदाहरण देऊन सांगितलं की या कंपन्या आमच्यापेक्षा सुद्धा जास्त माहिती त्यांच्या ग्राहकांकडून घेत आहे. ज्यामध्ये त्यांनी ओला ,झोमॅटो ,स्विगी, बिग बास्केट अशा नामांकित कंपनीचे नाव घेतले आहे, सोबतच इंटरनेट जगातील सगळ्यात मोठी कंपनी गुगलच ही नाव घ्यायला ते विसरले नाही. स्वतःचा बचाव करताना व्हाट्सअपने म्हटलं कि या कंपन्या देखील ग्राहकांची माहिती घेतात. गूगल तर किती जास्त प्रमाणात डेटा गोळा करतो, तर आम्हालाच इतका त्रास का दिला जात आहे. जर या मागची सत्यता जाणून घ्यायची म्हटलं तर व्हाट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी या कंपन्यांपेक्षा वेगळी आहे आणि याच कारणामुळे युरोपने व्हाट्सअप वर बॅन केलं आहे. आणि कुठे न कुठे या प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हाट्सअप वर बरेचशे देश कारवाई करत आहेत. बाकीच्या कंपन्यांवर तर कोणत्याही देशाची आपत्ती नाही आणि गुगल युरोपमध्ये सुद्धा वापरले जाते तरी तिथेही गुगल वर त्यांच्या पॉलिसीसाठी बँन नाहीये. त्यामुळे व्हाट्सअपला खरोखर त्यांच्या पॉलिसी संबंधी पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.

३) यूट्यूब करणार क्रियेटरसला मालामाल

युट्युबवरच्या शॉर्ट व्हिडिओ बद्दल तुम्ही ऐकलं असाल आणि किंबहुना तुम्ही शॉट्स पहात सुद्धा असाल आता यूट्यूबने दर महिन्याला या शॉर्ट बनवणाऱ्या क्रियेटरसाठी 700 कोटींचा निधी निर्माण करायचं ठरवलं. म्हणजेच जर तुमच्या शॉर्ट व्हिडिओ बर खूप चांगलं न्यूज असतील तर तुम्हाला युट्युब कडून पैसे मिळणार आणि लवकरच या शॉर्ट व्हिडिओवर जाहिरात सुद्धा बघायला मिळणार आहे.

४) फेसबुकला जर्मनीचा फटकार

जर्मनीमध्ये सुद्धा आता फेसबुक वर टांगती तलवार, फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व अँप्लिकेशन फेसबुकच्या मालकीचे आहेत आणि हे विविध प्रकारे लोकांचा डेटा गोळा करतात. ज्यामुळे व्हाट्सअपवर भारतामध्ये कारवाईचे संकट दिसून येत आहे. त्याच प्रमाणे जर्मनीमध्ये सुद्धा फेसबुकला फटकार मिळाली आहे. जर्मनीने फेसबुकला सांगितले की त्यांच्या लोकांची माहिती गोळा करणं थांबवा नाही तर तुमच्यावर याचे वाईट परिणाम होतील.आजच्या काळात डेटा फार महत्त्वाचा घटक झालेला आहे. या डेटाच्या माध्यमातून चांगले तसेच वाईट काम सुद्धा एखाद्या देशाविरुद्ध केले जाऊ शकते त्यामुळे प्रत्येक सरकार आता या कंपन्यांकडे जातीने लक्ष देत आहेत.

५) पोको एम ३ प्रो लवकरच होऊ शकतो लॉन्च

पोको एम ३ प्रो बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडलेला आहे. मात्र पोकोच्या ग्लोबल हेड ने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की लवकरच पोको एम ३ प्रो हा हायर रिफ्रेशर एट डिस्प्ले व फायजी सोबत लॉन्च होऊ शकतो. सोबतच कोको त्यांच्या स्वतःच्या युजर इंटरफेस वर काम करत आहे. सध्याचे त्यांचे मोबाईल हे शाओमीच्या एम आय यु आय इंटरफेस वर आधारित पोको लॉन्चर वर काम करत आहेत. आणि आता पोको युआय ते स्वतः निर्माण करत आहेत आणि हे पूर्णपणे वेगळे असणार आहे शाओमीच्या यु आय पेक्षा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.