मराठी नवं वर्ष किंवा अनेक जण गुडीपाडव्याला हिंदूंचं नवं वर्ष म्हणतात. दोन्ही विशेषणे बरोबरच आहेत कारण इतिहास अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल कि त्यावेळी बहुतांश मराठी माणसं हिंदूच होती. आता मात्र तशी परिथिति नाही. काळाच्या ओघात नवे धर्म आले , नव्या जाती आल्या , जगण्याच्या नव्या पध्दती जोडल्या गेल्या. त्यामुळे आताच्या संदर्भात गुडीपाडव्याला फक्त हिंदूंचं नवं वर्ष म्हणणं थोडं अन्याय केल्यासारखं होईल. हा पण आपण आजही गुडीपाडव्याला मराठी नवं वर्ष म्हणून शकतो कारण जाती धर्म जरी वेगळे झाले असले तरी आपण आजही मराठी आहोत. मराठी हि आपली ओळख आहे आणि ती कायम राहील.
कोणतीही संस्कृती आणि समाज त्याच्या मूल्यांवर टिकतो आणि ती टिकवण्यासाठी लागते सांस्कृतिक मदत. सांस्कृतिक मदतीशिवाय कोणताही समाज फार काळ टिकाव धरू शकणार नाही. मराठी संस्कृती आणि समाज टिकण्यामागे आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा खूप मोठा वाट आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे आणि ते पुढच्या पिढ्यान देणे हे आपले कर्तव्य आहे. गुडीपाडवा हा त्यातलाच एक.
गुडीपाडवा नेमका कधी पासून सुरु झाला ?
गुडीपाडव्याच्या सुरु होण्याबद्दल वेग वेगळे मत आहेत. इतिहासकारांमध्ये नेह्मीच असे मतभेद अढळतात. तर स्टोरी अशी आहे कि, दख्खन आणि महाराष्ट्रावर २००० वर्षांपूर्वी सातवाहन घराण्याचे साम्राज्य होत. राज्य वाढवण्याची त्याकाळी राज्यांमध्ये लढाया होत. उत्तर भारतात ‘शक’ नावाचे एक साम्राज्य होते. त्या साम्राज्याच्या राजाने महाराष्ट्र आणि दख्खन भागात असलेल्या सातवाहन राज्यावर आक्रमण केले. शंकांचे आक्रमण रोखून त्यांना मात देण्यात सातवाहन राजाला यश आलं. सातवाहन जिंकले त्या दिवशी महाराष्ट्रात गुढ्या लावल्या गेल्या. तेंव्हा पासून मराठी जण गुडीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका आहे. सातवाहन, गौतमी पुत्र आणि शक आणि त्यांचा कालखंड अभ्यासल्याशिवाय आपल्याला पूर्ण स्टोरी समजणार नाही. त्यामुळे वाचा पुढे…
गौतमीपुत्र सातवाहनाचा पराक्रम
“इसवी सनपूर्व 236च्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य स्थापन झालं. सातवाहनांतील सगळ्यांत श्रेष्ठ सम्राट म्हणून ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ याचं नावं घेतलं जातं. इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन 72 ते 95 या काळात हा सत्तेवर होता. “मौर्यांच्या साम्राज्यानंतर कुशान, हुन, पल्लव, शक यासारख्या परकीय टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केलं. दक्षिण भारताला या परकीय आक्रमणातून वाचवण्याचं काम हे गौतमीपुत्रानं केलं. गौतमीपुत्रानं शकांचा पराभव केला आणि त्या वेळेपासूनच ‘शालिवाहन शक’ म्हणजेच आपलं मराठी कालनिर्णय ही कालगणना सुरू झाली”. गुडीपाडव्याचा हिरो गौतमीपुत्रचं !
सातवाहन, सालाहन, साळीहन आणि शालिवाहन
“शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असं म्हटलं आहे. त्याचं संस्कृतीकरण जेव्हा झालं, तेव्हा ते शालीवाहन झाले,” “या साम्राज्याचा बाविसावा राजा गौतमीपुत्र हा अतिशय पराक्रमी होता. त्याने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. गौतमीपुत्र आणि शकांमध्ये साम्राज्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घनघोर युद्ध झालं. या युद्धात गौतमीपुत्रानं शक-शत्रप घराण्यातल्या नहपान या राजाचा समूळ पराभव करून त्याला मारून टाकलं.” “सातवाहनांनी शकांच्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शकं कालगणना सुरू झाली. गौतमीपुत्राने प्रतिस्पर्धी शक शत्रप यांचा पराभव करून आपली नाणीही प्रचारात आणली,”
गौतमीपुत्र आणि सातवाहन राजांच्या विजयामुळे खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याची सुरुवात झाली. पण त्यानंतर आलेल्या सर्व पिढ्यानी त्यातून प्रेरणा घेतली आणि ती परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र आणि मराठी भाषिक आजही दोन हजार वर्षानंतर देखील तेवढ्याच उत्साहाने साजरा करतात. आज गुडीपाडवा आहे. मराठी मिरर कडून तुम्हाला गुडीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्या !
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !