सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला

hardik-pandya-stretcher-injury-in-asia-cup-2018-dubai-stadium-india-beat-pakistan-in-2022

आशिया चषक मध्ये पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला तो हार्दिक पांड्या. यूएई मधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात हार्दिकने गोलंदाजीत २५ धावा देऊन ३ बळी घेतले. यानंतर फलंदाजीत १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. शेवटी षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा हार्दिक हिरो ठरला.

कालच्या सामन्यात हार्दिक पांड्या हिरो ठरला पण चार वर्षापूर्वी याच मैदानात हार्दिक स्ट्रेचरवरून परतला होता. तेव्हा हा सामना सुद्धा आशिया चषकमधीलच होता. १९ सप्टेंबर २०१८ ला हा सामना खेळला गेला. त्यावेळी हे सामने एकदिवसीय होते. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील हे १८ वे षटक तर हार्दिकचे हे पाचवे षटक होते. हार्दिकने पाचवा चेंडू टाकल्यानंतर तो जमिनीवर एकदम कोसळला. त्याच्या पाठीत दुखायला लागलं होतं. हार्दिकने डोळे मिटले होते. मैदानात स्ट्रेचर आणला गेला. त्वरित स्ट्रेचरवर झोपवून हार्दिकला मैदानाबाहेर नेण्यात आलं. ही घटना अतिशय गंभीर होती. हार्दिक त्या सामन्यात खेळला नाही पण पुढे काय होईल याची चिंता होती. हार्दिक बरा होईल पण क्रिकेटच्या करिअरवर परिणाम होईल हे सगळ्यांना वाटत होतं. पण हार मानेल तो हार्दिक पांड्या कसला ?

२०१८ च्या आशिया चषक सामन्यात भारताने पाकिस्तानला १६२ धावात गारद केले. सरफराज अहमद पाकिस्तानचा कर्णधार होता. भारताने २९ षटकार मध्ये ८ गडी राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्याने ४.५ षटकात २५ धावा दिल्या होत्या. त्या सामन्यात हार्दिक पांड्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. भारताने सामना जिंकला होता पण हार्दिक पांड्या पुढील कोणत्या सामन्यात खेळणार समजत नव्हतं. हळूहळू हार्दिक ठीक होऊ लागला होता. करिअर धोक्यात असं वाटत असताना त्याने कामगिरीवर लक्ष दिलं. IPL मध्ये तर पहिल्याच वर्षी गुजरात टायटनला जिंकून दिलं. कालच्या सामन्यात तर जडेजा आणि हार्दिकने विजयी पताका उभारली.

हार्दिक पांड्याने नाबाद राहून विजय मिळवून दिला. टॉस हरलेल्या पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली आणि १४७ धावा केल्या. पाकिस्तनाकडून मोहम्मद रिजवानने ४३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार ४, हार्दिक पांड्या ३ तर अर्शद सिंहने २ बाद केले. १४८ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला भारतीय संघाची दमछाक होईल असं वाटलं होतं कारण सलामीचे खेळाडू लवकर गारद झाले होते. रोहित शर्मा १० तर विराट कोहली ३५ धावा करून बाद झाले. ५३ धावा असताना ३ गडी बाद झाले होते. यानंतर जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी कमान सांभाळली. हार्दिक पांड्याच्या विजयी षटकाराने आशिया चषक भारतच जिंकणार हे निश्चित झालं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.