सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

एवढं तर मान्य करावंच लागलं मोदींसाठी सुभाष बाबू खास आहेत.

प्रत्येक जणांच्या आयुष्यात एक गुरु नक्की असतो.गुरु नसेल तर आपला आदर्श तरी असतोच असतोच.कोणाचा आदर्श सचिन तेंडुलकर असतो तर काही जणांचा अब्दुल कलाम.आपण आपल्याला आदर्श व्यक्तीचा, त्याच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार कारण्याचा प्रामाणीक प्रयत्न करत असतो.तसेच काहीस नरेंद्र मोदी यांचं दिसत आहे.नेताजी सुभाष चंद्र बोस मोदींचे आदर्श आहेत.त्यांच्या भाषणात अनेकवेळा तसा उल्लेख देखील होत असतो.नेताजींच्या कार्याशी पूर्ण भारत परिचित आहेत पण मोदीजी नेताजी सुभाष बाबू लोकांच्या स्मृति मध्ये निरंतन राहावे म्हणून प्रयत्न करता असतात.त्यासाठी ते सत्तेत आल्या पासूनच वेग वेगळे निर्णय घेत आहेत.

अंदमान आणि निकोबारच्या बेटांची नवे सुभाष बाबूं आणि आझाद हिंद सेनेच्या नावे.

आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान मध्ये ३० डिसेंबर १९४३ ला पाहिल्यांदा देशाचा तिरंगा फडकावला होता.हि एक ऐतिहासिक घटना होती.२०१८ साली ह्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत होती. म्हणून नरेंद्र मोदीं सरकारने अंदमान मध्ये जंगी कार्यक्रम ठेवले होते.सुभाष बाबूंच्या आठवणीत अख्या अंदमान सुभाषमय झाला होता.याच कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक घोषणा केली.अंदमान आणि निकोबार मधील प्रसिद्ध बेटांची नावे नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या नावाने करत असल्याचे जाहीर केले.रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाष चंद्र बोस बेट ,नेल बेटाचा नाव शहीद द्वीप तर हॅवलॉक बेताचं स्वराज द्वीप केलं .या निर्णयाचा सर्व देशभरातून स्वागत झालं होत.कारण सुभाष बांबूचं मोठा काळ या बेटांवर गेला आहे.

सुभाष बाबुंचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून जाहीर.

नेताजी सुभाष बाबुंचा इतिहास आपल्याला सर्वाना माहिती आहे .आक्रमक स्वभावाचे असलेले सुभाष बाबू इंग्रजी सरकार उखुडुन टाकण्यासाठी जग भर प्रवास प्रवास करत.इंग्रज कपटी स्वभावाचे आहेत त्यांना उखडून टाकायचे असेल तर आपल्याला त्यांचा सैनिकी मुकाबला करावा लागेल असे त्यांचे मत होते.तसा लढा देण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापन केली.देशाच्या स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाष बांबूचं योगदान मोठे आहे.त्यामुळे त्यांच योगदान जनतेला साजरे करता यावे म्हणून त्यांच्या जन्म दिवस मोदीजींनी २०२१ ला पराक्रम दिवस म्हणून घोषित केला.तेंव्हापासून २३ जानेवारी ला देश पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो.

इंडिया गेट वर नेताजींचा पुतळा.

दिल्लीच्या इंडिया गेट भागात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य ग्रॅनाईटचा पुतळा बसवला जाईल असा नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे.जो प्रयन्त पुतळा बसवला जात नाही तो पर्यत पुतळ्याच्या ठिकाणी होलोग्रामचा पुतळा बसवला जाणार आहे.येत्या २३ जानेवारीला मोदी उदघाटन करणार आहेत.

२३ जानेवारीला देश नेताजींची १२५ वी जयंती साजरी करत आहे .आणि अश्या वेळेला त्यांच्या पुतळ्याची घोषणा होणे ‘दुग्द शर्करा’ योगच म्हणावा लागेल.इंडिया गेट वर जाणाऱ्या प्रत्येक भारतीय आणि परदेशी नागरिकांना नेताजींचा पुतळा त्याच्या कडे आकर्षित करेल.

अंदमान मधील बेटांची नावे बदलणे ,जयंती दिनी पराक्रम दिन घोषित करणे आणि दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात सुभाष बाबुंचा पुतळा बसवणे हे नरेंद्र मोदींच सुभाष बाबू बद्दल असलेली आस्थाच दाखवतं.त्यामुळे सुभाष बाबू नरेंद्र मोदी साठी खास आहेत म्हंटल तर अतिशोक्ती ठरणार नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.