सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

लक्ष असू द्या ! देशात 11 % मधुमेहाचे रुग्ण असल्याचा धक्कादायक रीपोर्ट

देशात मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुणांपासून वयोवृद्धांनादेखील हा आजार जडत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण तसेच त्याची कारणे स्पष्ट करणारा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात नेमके काय आहे? हे जाणून घेतले पाहिजे.

देशात ११ टक्के लोकांना मधुमेह

‘द लॅन्सेट डायबेटीज ॲण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यःस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. ‘मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन’ (एमडीआरएफ) या संस्थेने ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) या संस्थेच्या मदतीने याबाबतचा अभ्यास केला आहे.

हा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी भारतातील लोकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, लठ्ठपणा, शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण याचा अभ्यास केला. २००८ ते २०२० या सालात एकूण पाच टप्प्यांत हा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक टप्प्यांत पाच राज्यांमध्ये तर एका टप्प्यात ईशान्येकडील सात राज्यांत संशोधकांनी अभ्यास केला. या अभ्यासकांनी २० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.

अहवहाल नेमका काय सांगतो ?

या अभ्यासानुसार देशात सध्या १०१ दशलक्ष (१०.१ कोटी) लोकांना मधुमेह आहे. २०१९ साली हाच आकडा ७० दशलक्ष एवढा होता. या अभ्यासानुसार गोव्यामध्ये साधारण २०.६ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास असून इतर राज्यांच्या तुलनेत या राज्यात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गोव्यानंतर पुदुच्चेरीमध्ये २६.३ टक्के, केरळमध्ये २५.५ टक्के लोकांना मधुमेह हा आजार आहे. तामिळनाडू राज्यात १४.४ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मधुमेहाचे प्रमाण ४.८ टक्के म्हणजेच सर्वांत कमी आहे. सध्या जरी उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मधुमेहग्रस्तांचे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेश, बिहार या राज्यांत मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसे भाकीत या अभ्यासाच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.

फक्त श्रीमंत नाही तर आपल्या सारख्या गरिबांनी बी डीबेटीस व्हायला लागलाय

‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शहरी भागात मधुमेहग्रस्तांचे प्रमाण जास्त आहे. शहरात १६.४ टक्के तर ग्रामीण भागात ८.९ टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार सध्या जरी शहरी भागात मधुमेहींचे प्रमाण जास्त असले तरी ग्रामीण भागातील लोकांनादेखील हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार फक्त श्रीमंत लोकांनाच होतो, हा गैरसमज आता दूर होत चालला आहे.

मधुमेहाचे रुग्ण वाढण्याचे कारण काय आहे?

आहारविषयक तज्ज्ञ तसेच डॉक्टरांनी मधुमेह आजार जडण्याची अनेक कारणं सांगितली आहेत. “बदलते राहणीमान, शहराकडे होत असलेले स्थलांतर, कामांच्या तासांमधील अनियमितता, एका जागेवर बसून काम करणे, जेवणाच्या सवयीमध्ये बदल, फास्ट फूड अशा काही कारणांमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढलेय,”

री- डायबिटीजचे प्रमाणही वाढले?

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार देशात साधारण १३६ दशलक्ष (१३.६ कोटी) लोकांना मधुमेह – पूर्व स्थिती (प्री-डायबिटीज) आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार शहरातील साधारण १५.४ टक्के तर ग्रामीण भागातील १५.२ टक्के लोकांना प्री-डायबिटीजची लक्षणे आहेत. हे सरासरी प्रमाण १५.३ टक्के आहे. याबाबत बक्सी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या देशात प्री-डायबिटीजचे प्रमाण बरेच आहे. अनेक वेळा प्री-डायबिटीजचे निदान होण्यास उशीर होतो. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते, असे बक्सी यांनी सांगितले. मायो **क्लिनिकच्या संकेतस्थळानुसार सामान्य व्यक्तीच्या तुलनेत प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्री-डायबिटीज असलेल्या रुग्णाला दुसऱ्या क्रमांकाचा मधुमेह (टाइप-२ डायबिटीज) होण्याची शक्यता जास्त असते

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.