MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

लहान मुलांमध्ये वाढत आहे डायबेटिस, काय आहे कारण

आपल्या देशातील नागरिकांमध्ये डायबेटिसचे प्रमाण वाढत आहे. देशातल्या दर १० माणसांच्या मागे ६ जण डायबेटिसचे रुग्ण आहेत. धोक्याचा इशारा म्हणजे डायबेटिसचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढताना दिसत आहे. त्याचा गंभीर पणे विचार करून त्याच्यावर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे…त्यामुळे विषय समजून घ्या..

लहान मुलांमध्ये का वाढत आहे प्रमाण ?

पालकांची जीवन शैली बदलली आहे , त्याच्या कामाचे स्वरूप बदलले आहे याचा परिणाम मुलांवर होत असल्याचे समोर आले आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेत किंवा घराच्या बाजूला मैदाने उरली नाहीत त्यामुळे मुले दिवसभर घरात बसून टीव्ही बघत असतात. पालकांच्या व्यस्त वेळामुळे त्यांना देखील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि परिणाम म्हणून मुलांना मधुमेह होऊन तो वाढत जात आहे.

JAMA रिपोर्ट

JAMA नेटवर्क या जर्नलच्या अभ्यासानुसार २०१९ साली जगभरात दोन लाख २७ हजार ५८० बालकांना मधुमेह झाल्याचे समोर आले. त्यापैकी ५,३९० बालकांचा मधुमेहामुळे मृत्यू झाला; तर पाच लाख १९ हजार ११७ लहान मुलांना आपले आरोग्यदायी जीवनाचे एक वर्ष (highest disability-adjusted life years (DALY) गमावावे लागले. या अहवालानुसार १९९० पासून लहान मुलांना मधुमेह होण्याच्या प्रमाणात ३९.४ टक्के वाढ झाली आहे.

जगभरात २०१९ पर्यंत २ लाख मुलांना डायबेटिस झाल्याचे पुढे आले त्यापैकी ६ हजार मुलांचा मृत्यू झाला.

मुलांना डायबेटिस झालाय कस ओळखावं

पालकांनी मुलांच्या आरोग्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मुलाच्या शरीरात काय बदल होत आहेत याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत. मुलांना लहान पाणी डोळ्याचे आजार होतात ,
लहान मुलांना स्कीनचे आजार होणे, त्यांचे वजन कमी , इत्यादी लक्षणे दिसत असले की मुलांची डायबेटिस टेस्ट करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ला घेऊन उपचार करावे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.