सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अण्णा हजारेंच्या कुशीतून वाढलेला आम आदमी पक्ष आता कात टाकत आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या पण सगळ्यात जास्त फुटेज खाल्लं ते पंजाबच्या निवडणुकीनं. एकूण १७७ पैकी ९२ जागा जिंकत केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने इतिहास रचला आहे. सत्ताधारी काँग्रेसला फक्त १९ जागांवर समाधान मानव लागलं आहे. या आधी पण दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला अशीच मात दिली होती. काँग्रेसच्या एकूण झालेल्या स्थितीवरून अनेक जण तर लिहत आहे, कि मोदी तर असाच बदनाम झाला आहे खरं काँग्रेस मुक्त भारत केजरीवाल करत आहे.

काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी पक्ष स्थापन करण्याचं चॅलेंज दिलं आणि अरविंद केजरीवालांनी चॅलेंज स्वीकारलं !

२००४ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसच म्हणजेच युपीए सरकार होतं. पहिल्या पाच वर्षात सरकार ठीक ठाक चाललं होत. पण २००९ नंतर मात्र काँग्रेस सरकारवर भ्रस्टाचाराचे आरोप , भ्रस्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं झालं होतं. अण्णा हजारे यांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन ( India Against Corruption) आंदोलन अण्णा आंदोलन म्हणून देशभर गाजलं. अण्णा आंदोलनाने काँग्रेस सरकारचे पाळेमुळे हलवले होते. आंदोलात सरकारचे वाभाडे काढले जात होते. सरकारवर टीका केल्या जात होत्या.
सरकार कडून पण अण्णा आंदोलनाच्या टीकाना प्रतिउत्तर दिले जायचे. त्यावेळेचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अण्णा आंदोलनाचे संयोजक अरविंद केजरीवाल याना चॅलेंज दिल कि तुम्हाला सरकारचा एवढा प्रॉब्लम आहे तर तुम्ही तुमची पार्टी काढा आणि लढा निवडणूक. होऊन जाऊद्या दूध का दूध और पाणी का पाणी.
सरकारने लोकपाल बिल आणल्यावर अण्णा आंदोलन मागे घेण्यात आले मात्र अरविंद केजरीवाल यांनी दिग्विजय सिंह यांचं चॅलेंज स्वीकारलं. प्रशांत भूषण , योगेंद्र यादव , कवी कुमार विश्वास , मनीष सिसोदिया याना सोबत घेऊन २०१३ च्या डिसेंबर महिन्यात आम आदमी पक्षाची स्थापना केली.

यांचं डिपॉजिट जप्त होईल म्हणून सर्वानी आप वर बोलणं टाळलं होत.

२०१३ च्या डिसेंबर महिन्यात पक्ष स्थापन झाल्याच्या सहा महिन्यातच आम आदमी पक्षाने लोकसभेच्या निवडणूक लढवल्या. स्वतः अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीत उभे राहिले. पंजाबच्या चार जागा सोडता सर्व निकाल आपच्या विरोधात गेले. देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती. पण २०१४ चे लोकसभा निवडणूक आपची खरी परीक्षा नव्हती. कारण सहा महिने आधी स्थापन झालेल्या पक्षाला यश येईल हा भाबडेपणा ठरला असता.
डिसेंबर २०१४ ला दिल्लीत विधानसभा निवडणूक लागल्या. ह्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष जोरदार तयारी करून उतरला होता. पण लोकसभा निवडणुकीत प्रदर्शन चांगले झाले नसल्यामुळे आप कडून राजकीय पंडितांना फार अपेक्षा नव्हत्या. बाकी पक्ष पण ‘आपला’ सिरीयस घ्यायला तयार नव्हता. त्यावेळच्या दिल्लीच्या मुख्यंमत्री शीला दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली होती कि आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवाराचं डिपॉजिट जप्त होईल. पण दिल्ली विधानसभेचे निकाल एकदम उलट लागले. आम आदमी पक्षाला दिल्लीत ७० पैकी २८ जागा मिळाल्या. दिल्लीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. इथूनच आपची खरी सुरुवात झाली.

दिल्लीच्या दोन विधानसभा जिंकल्या आणि आता पंजाब.

पहिल्याच निडणुकीत आपने २८ जागा जिंकल्या होत्या मात्र सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला होता. पण काँग्रेस आणि आप मध्ये खूप कमी वेळात मतभेद झाले. मतभेद झाल्यामुळे आपने सरकार बरखास्त केले आणि पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे गेले. २०१५ च्या निवडणुकांमध्ये मध्ये तर आपने कमाल केली. दिल्लीच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागा जिंकत इतिहास रचला. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस त्याच खातं पण उघडू शकल नव्हतं.
२०१५ ला परत बहुमताने सत्तेत आल्यावर पाच वर्षानंतर आप २०२० मध्ये दिल्लीत परत निवडणुकीला सामोरे गेले. २०२० मध पण आपने त्यांचे प्रदर्शन कायम ठेवले एकूण ७० जागांपैकी ६३ जागा जिंकत सत्ता राखली. भाजपाला फक्त ७ जागा मिळाल्या. काँग्रेसला सतत दुसऱ्या निवडणुकीत दिल्लीत एकही जागा मिळवता आली नव्हती.
दिल्लीत केलेल्या कामांमुळे आणि दोन वेळच्या सत्तेमुळे आपला फक्त दिल्ली पुरता पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती . पण केजरीवाल यांची इच्छा होती कि पक्ष दिल्लीच्या बाहेर जावा पण त्यांना दिल्लीच्या बाहेर पक्षाला यश येत नव्हता. २०१७ साली त्यांनी पंजाबमध्ये प्रयत्न केले होते पण अपेक्षित यश मिळले नाही. २०२२ मध्ये मात्र आपने कमाल केली. सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतुन घालवायला आपला यश आले. पंजाबच्या यशाने आम आदमी पक्ष दिल्लीच्या बाहेर पोहचला आहे.

आम आदमी पक्ष दिल्लीच्या बाहेर पोहचल्यामुळे आता त्यांच्या कडून राष्ट्रीय पातळीवरून अपेक्षा केल्या जात आहेत. पंजाबच्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातून पण त्यांच्या पुढच्या प्रवासाचा अंदाज आला आहे. देशातला जनतेने आम आदमी पक्ष जॉईन करावा असं केजरीवाल म्हणाले आहेत. पंजाब तर आपने जिंकला पण इतर राज्यात त्यांना यश मिळतं का पुढच्या निवडणुकांमधून दिसून येईल. आपची पुढची परीक्षा डिसेंबर आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत होईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.