सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

तंबाखू बिनधास्त खावा पण कॅन्सर साठी पण तयार रहा !

tobacco-cancer-in-women-rural-India

महाराष्ट्रात एकही कुटुंब सापडणार नाही ज्या कुटुंबात कोणीही तंबाखू सेवन करत नसेल. हमखास कोणी ना कोणी तंबाखू सेवन करत असतोच असतोच. त्यात आपले वडील , भाऊ , काका, त्यासोबच अनेक वेळा महिला देखील तंबाखू सेवन करताना आढळतात.

शासन नियामनुसार तंबाखूच्या प्रत्येक पॅकेटवर लिहलेले असते की तंबाखू सेवन केल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो पण वाचतो कोण ? वाचले तर त्याकडे लक्ष देखील दिले जात नाही.

आता तुम्हाला वाटेल की, तंबाखूच्या पॅकेट वर लिहलेली धोकादायक सूचना तंबाखू खाणारा वाचत नाही, खाणाऱ्याला फरक पडत नाही मग भावा तू इथ लिहून काय झेंडे गडणार आहेस आणि त्यांनी काय फरक पडणार आहे. तर तुझ म्हणण अगदीच खोटे नाहीय मी लिहून मोठा ब्लॉग लिहून काहीही होणार नाहीय.. जे तंबाखू खात आहेत कदाचित ते वाचणार देखील नाहीत.

पण मित्रा/ मैत्रिणी तू वाचतोय/ वाचतेय ना म्हणजे तुला काळजी आहे तुझ्या कुटुंबाची , मित्र परिवाराची. त्यामुळे माझ काम आहे की तंबाखू मुळे जगात आणि देशात काय होत आहे , किती लोक दररोज तंबाखू खाऊन मरत आहेत, किती कुटुंब तंबाखू खाऊन देशोधडीला लागले आहेत आणि एकंदरीत हा तंबाखू वर वर खूप सहज आणि सोप्पा विषय वाटत असला तरी किती गंभीर विषय आहे हे ही तुला समजेल. आणि एवढ वाचून तू एखाद्या तंबाखू खणाऱ्याला समजावून सांगू शकला तर माझ लिखाण सार्थकी लागेल बघ ,

तर विषय असा आहे, तंबाखू सेवनाने तोंडाचा, ओठाचा, जबड्याचा, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर होतो. भारतात आढळणाऱ्या एकूण कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४०% कॅन्सर हे याच प्रकारातील आहे. यावरून तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांची समस्या किती गंभीर याची कल्पना येते.

महाराष्ट्रातील गडचिरोली, मुंबई, नागपूर, पुणे, यवतमाळ, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मौखिक कर्करोगाचे रुग्ण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात दर लाख लोकसंख्येमागे ९१ पुरुष आणि ९० स्त्रिया या कॅन्सरचे रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात दर लाख लोकसंख्येमागे ८३ कॅन्सर रुग्ण तर औरंगाबादमध्ये दर लाख लोकसंख्येमागे ७० कॅन्सर रुग्ण आढळतात. नागपुरात आढळणाऱ्या कॅन्सर रुग्णांत सर्वाधिक रुग्णांना तंबाखूमुळे कॅन्सर झाला असल्याची माहिती आहे.

जागतिक संस्थाचे धक्कादायक आकडेवारी

जगभारत विविध संघटना कॅन्सर आणि इतर आरोग्याच्या प्रश्नावर काम करतात आणि प्रती वर्षी त्यांचे आवाहल प्रसिद्ध करतात. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO यांच्या 2022 आकडेवारी नुसार आपल्या भारतात तंबाखू पासून झालेल्या कॅन्सरमुळे दर 8 सेकंदाला एक मृत्यू होतो तर दिवसात अंदाजे १०००-१५०० नागरिकांचा मृत्यू होतो. तर भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (ICMR) २०२१ च्या अहवालानुसार तंबाखूमुळे झालेल्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण महाराष्ट्रात खूप जास्त आहे. एकट्या महाराष्ट्रात दर वर्षी तंबाखू सेवन केल्यामुळे उद्भवणाऱ्या आजारातून १ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू होतो.

राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढत असताना शासन स्थरावर मात्र उपाययोजना आपुऱ्या आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यात तंबाखू मुळे कॅन्सर झाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शासन स्थरावर कॅन्सर उपचारांसाठी योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कॅन्सरचे लवकर निदान न झाल्यामुळे बहुतांश कॅन्सर रुग्णांना जीव गमवावा लागतो.

खाजगी दवाखान्यात कॅन्सरवर उपचार घेणे फारच खर्चिक असते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तींना हा खर्च परवडत नाही अनेक वेळा कुटुंब अर्थीक दारिद्रीत ढकलले जातात. राज्यात मुंबईतील केवळ टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये कमी खर्चात उपचार केले जातात राज्यात दुसरे हॉस्पिटल नाही.

गरीब आणि अतिगरीब कुटुंबातील व्यक्तिला कॅन्सर झाला तर व्यक्ति गमावणीची भीती आसतेच त्यासोबतच ते कुटुंबावर दारिद्र्य येते.

अनेक कारणांनी कॅन्सर होतो बऱ्याच वेळेस रुग्णाला माहिती देखील नसते किंवा त्याच्या हातात देखील नसते. परंतु तंबाखू मुळे कधी ना कधी हमखास कॅन्सर होतोच होतोच होतो. WHO & ICMR ची अकडेवारि देखील तेच सिद्ध करते. त्यामुळे तंबाखू खाऊन तात्पुरता आनंद घ्यायचा याचा विचार तंबाखू सेवन करणाऱ्यांनी केले पाहिजे. तंबाखू सेवन केल्याने सस्वतचा जीव धोक्यात जातोच जातो त्यासोबत त्या व्यक्तीचे कुटुंब देखील दुखत ढकलेले जाते त्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्या सर्वांना त्यापासून प्रवृत्त करणे आपले काम आहे. त्यासाठी मिळेल त्या आणि जमेल त्या मार्गाने आपण प्रबोधन केले पाहिजे अगदीच माझ्या सारखा लेख लिहून सोशल मीडियावर टाकला तरी चालेल किंवा हा लेखच शोशल मीडियावर शेयर केला तरी एखादा तंबाखू खाणारा व्यक्ति खाण्यापासून प्रवृत होऊ शकतो.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.