सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

एलआयसीचा आयपीओ येतोय पैसे गुंतवण्याआधी आयपीओ बद्दल पूर्ण माहिती पाहिजे.

भारत सरकारची सर्वात मोठी कंपनी एलआयसी ( LIC) पुढच्या महिन्यात स्टॉक मार्केट मध्ये तिचा आयपीओ घेऊन येत आहे. एलआयसी कंपनी मागच्या सत्तर वर्षपासून नेहमीच फायद्यात आहे. बाजारात खूप मोठ्या इन्सुरन्स देणाऱ्या कंपन्या आल्या पण एलआयसीला टक्कर देणं त्यांना आजगायत जमलं नाही. एलआयसी म्हणजे विश्वास आहे. भारतात इन्शुरन्सचा समानार्थी शब्द बनला आहे एलआयसी.

२०२१ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एलआयसीचे १० % खाजगीकरण करणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यामुळेच भारत सरकार २०२१ पासून एलआयसीच्या आयपीओच्या कामाला लागले होते. एका वर्षानंतर सरकारची तयारी झाल्याच्या बातम्या येत आहेत. येत्या मार्च मध्ये एलओसीचा आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये येत आहे. एलआयसी सारखा ब्रँड स्टॉक मार्केट मध्ये येत असल्याने मार्केट एकदम तेजीत जाऊ शकत. एलआयसीच्या आयपीओवर सर्व मार्केट तुटून पडू शकतं. यात गैर काही नाही एलआयसी कंपनी आहे देखील पैसे लावण्यासारखी. पण जर कोणाचे ऐकून तुम्ही एलआयसीच्या आयपीओ घेणार असाल तर पहिले हे आयपीओ प्रकरण काय असतं तुम्हाला माहिती पाहिजे.

कोणत्या कंपनींना आयपीओचे परवानगी मिळते ?

स्टॉक मार्केटचा व्यापार सेबी (SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA ) नियंत्रित करते. आयपीओची परवानगी मिळवणायसाठी सेबीच्या अटी आहेत. त्यात पहिली अट हि आहे , आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या कंपनीची टोटल संपत्ती कमीत कमी ३ कोटी असली पाहिजे , दुसरी अट अशी आहे , कंपनीची मागच्या तीन वर्ष नेट किंमत १ कोटी पेक्षा कमी नसली पाहिजे आणि तिसरी अट अशी कि कंपनीची प्री टॅक्स इनकम मागचे तीन सरासरी १५ कोटी असली पाहिजे.

ह्या तीन अटी पूर्ण केलेल्या कंपनीला सेबी आयपीओची परवानगी देते. मागच्या काळात झोमॅटो , नायका आणि पेंटियमचे आयपीओ आले होते. झोमॅटोच्या आयपीओने स्टॉक मार्केट मध्ये नवे उच्चांक केले होते.

आयपीओत शेयरची किंमत कोण ठरवत ?

ज्या कंपनीचा आयपीओ आहे ती कंपनी त्यांच्या सल्लागारांच्या सल्ल्याने त्यांच्या शेयर्सची किंमत ठरवतात. कंपनीची किंमत, कंपनीचे उत्पन्न आणि भविष्यात असलेले कंपनीचे प्लॅन या सर्व गोष्टींचा विचार करून कंपनी शेयर्सची किंमत ठरवते. किंमत किती ठेवायची हा कंपनीचा अधिकार असतो. प्रत्येक कंपनी मार्केट मध्ये स्वीकारली जाईल अशीच त्यांच्या शेयर्सची किंमत ठेवते.

स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट करून कंपनीला काय फायदा होतो ?

कुठलंही कंपनी एका लेव्हल पर्यंत त्यांचा प्रवास करू शकते . त्यानंतर मात्र त्यांना मोठ्या गुंतवणुकीची गरज लागते त्याशिवाय कंपनीची वाढ करणे शक्य नसते. अशा वेळेला स्टॉक मार्केट एक पर्याय म्हणून असतो. स्टॉक मार्केट मधील ट्रेडर कंपनीच्या किमतीनुसार त्या कंपनीचे शेयर्स घेतात. कंपनीचे काम चांगले असले आणि जर इन्व्हेस्टरना कंपनी प्रॉमिसिंग वाटतं असेल तर कंपनीला मोठी गुंतवणूक मिळते. कंपनीमध्ये गुंतवणूक वाढली कि कंपनी स्वतः मध्ये आणखी सुधारणा करते. त्यामुळे सर्वच कंपनी स्टॉक मार्केट मध्ये त्यांना लिस्ट करायला उत्सुक असतात.

आयपीओत गुंतवणूक करताना आपण काय बघितले पाहिजे ?

आयपीओत गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक करावी लागते कारण कंपनी त्यांच्या अनेक गोष्टी लपवू पण शकते. त्यामुळे आयपीओत गुंतवणूक करण्याच्या आधी कंपनीचा सर्व इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. कंपनीला नफा कसा होतो या बद्दल पूर्ण माहिती ठेवणे गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचे भविष्य कसे राहील या बद्दल पूर्ण अभ्यास करायला हवा. या सर्व गोष्टी तपासूनच आपण आयपीओत गुंतवणूक करायला हवी नाही तर तोटा होण्याची शक्यता जास्त असते. पेटीएम आणि झोमॅटोचा ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओ घेतला त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.