आजोबा वारले म्हणून गावी गेलो होतो. आजोबांचं वय झालं होत. त्यामुळे आजोबाच्या जाण्याचं काही वाटलं नाही. दोन तीन दिवस घरी राहिल्यावर मी आपलं परत पुण्याकडे निघणार होतो. सकाळी मी माझ्या सामान भरण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात शेजारच्या घरून मोठ्याने रडण्याच्या आवाज आला. काय झालं म्हणून बघायला गेलो तर कळले शेजारचे काका हर्ट अटकने गेले. माझ्या सोबत जेवढे पण लोक तिथे होते सर्व स्पब्ध होते.. म्हणजे कोणाला काहिहि कळत नव्हतं हे कस काय झालं? काल पर्यंत ठीक असलेले काका आज अचानक हर्ट अटॅकने कसे गेले. अख्या गावात एक भयाण शांतता वाटतं होती. सगळे लोक एकमेकांशी फक्त डोळ्यांनी बोलत होते.
असा मृत्यू गावकऱ्यांसाठी नवा होता. अनेक मित्रांशी बोलणं झालं तेंव्हा कळलं कि गावात हर्ट अटॅकच प्रमाण खूप वाढलं आहे. मित्र त्यांच्या त्यांच्या माहिती प्रमाणे अंदाज लावत होते. तंबाखू खाल्यामुळे, दारू पिल्यामुळे हर्ट अटॅक येतो ते सांगत होते. त्यांची कारणे तार्किक होती. पण मला असं वाटत होत जर काकाला हर्ट अटक बद्दल माहिती असती तर कदाचित हि घटना झाली नसती. कदाचित ते आधीच दवाखान्यात गेले असते. घरच्यांना त्यांच्या त्रासाबद्दल सांगितलं असतं. आपल्याकडे हर्ट अटक बद्दल जागरूकतात नाही याची खंत वाटत होती.
म्हणून थोडीसी जागरूकता वाढवण्यासाठी हा लेख लिहतोय. हर्ट अटॅक येण्याचे अनेक करणे आहेत. पण आपल्याला हर्ट अटॅकचे किमान लक्षणे आणि प्राथमिक कारणे माहिती असायला पाहिजे..
हर्ट अटॅकचे प्राथमिक लक्षणे काय आहेत ?
हर्ट अटॅकचे लक्षणे दुसऱ्या माणसांना दिसत नाहीत. रुग्णाला आपल्या शरीरातले बदल जाणवतात असतात. पण बऱ्याच वेळेस हे हर्ट अटॅकचे लक्षण आहेत हे माहित नसत. छातीत दुखणं , हलकं हलकं वाटण , हात आणि पाय दुखणं, स्वास घयायला समस्या येन हि हर्ट अटॅकची प्राथमिक लक्षणे आहेत. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर डॉक्टर कडे जा. डॉक्टरांच्या साह्याने पुढील उपचार होऊ शकतील.
कशामुळे हर्ट अटक येतात ?
वजन वाढल्यामुळे हर्ट अटक येतो असा एक गैरसमज आहे. अनेक जाड लोंकाना हर्ट अटक येतो पण ते एकमेव कारण नाहीये. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले कि त्रास चालू होतो. कोलेस्ट्रॉलचे छोटे छोटे कण हृदयाच्या रक्त वाहिन्यांमध्ये अडकतात आणि रक्त प्रवाह रोकतात. एकदा का हृदयात रक्त प्रवाह थांबला कि तिथंच माणूस संपतो.
हर्ट अटॅक किती वेळापर्यंत असतो ?
हर्ट अटक टप्या टप्याने येतो असं डॉक्टर सांगतात. म्हणजे सुरुवातीचे अटॅक हे हलक्या स्वरूपाचे असतात. हृदयात त्रास सुरु झाल्यावर पुढचे पाच मिनिटे तरी अटॅकस हलके असतात. पण नंतरचे अटॅकस तीव्र स्वरूपाचे होऊ असतात. त्यामध्ये रुग्ण वाचण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे अटॅकस हलक्या स्वरूपाचे आहेत तोपर्यंतच रुग्णला दवाखान्यात दाखल करायला पाहिजे जेने करून त्याचा जीव वाचेल.
हर्ट अटॅकचे लक्षणे बाहेरून दिसत नाहीत. बऱ्याच वेळेस रुग्ण होत असलेला त्रास सांगायचं धाडस करत नाही. किंवा त्यांना माहितीही नसते कि हा हर्ट अटॅक होऊ शकतो. हर्ट अटॅकच्या बाबतीत फार जागरूकता नाही. त्यामुळे जागरूकता वाढवणे, हर्ट अटॅकचे लक्षणे लोकांपर्यन्त पोहचवणे आपले कर्तव्य आहे. आपल्याला असलेली माहिती शेयर करण्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे हर्ट अटॅक बद्दलची माहिती शेयर करताना चेंगटपणा करू नका.
हे खास आपल्यासाठी
महिला आणि पुरुषांमध्ये जननेंद्रियाचा क्षयरोग – जाणून घ्या याबद्दल सर्व काही
ऑटो रिक्शा चालकांमध्ये टीबी चे प्रमाण
पोट दुखतय ? टीबी तर ना , होय असू शकतो टीबी.. काय आहेत लक्षणे वाचा.