सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

काँग्रेसच्या गरीब मुख्यमंत्र्यांच्या बँक अकाउंट मध्ये १३३ कोटी आहेत.

आम्ही कॉलेज मध्ये असताना जेव्हा केव्हा निवडणुका लागायच्या आमचा पूर्ण दिवस पेपर वाचण्यातचं जायचा. क्लास सोडून जायची हिम्मत नव्हती अन निवडणुकीच्या बातम्या बघायची हौस काय कमी होती होय. त्यामुळे कुठला नेता काय म्हणतो पासून तर पार त्याच्या अख्या इतिहासाची माहिती असायची आम्हाला. पण सगळ्यात जास्त लक्षात राहायचं कि कुठल्या नेत्याकडे किती प्रॉपर्टी आहे ते. कारण ज्याच्या कडे जास्त प्रॉपर्टी तो भ्रष्ट नेता असं आमचं ठरलं होत.

कॉलेज सोडून चार पाच वर्ष झाली पण कोणत्या नेत्याकडे किती प्रोपेर्टी आहे हे जाणून घ्यायची हौस काय संपली नाही. पंजाब अन इतर चार राज्यांमध्ये निवडणूक चालू आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरंजीत सिंग चन्नी यांच्या बँक खात्यात १३३ कोटी असल्याचा आरोप त्यांच्याच पार्टीच्या कार्यकर्तीने केला आहे.

साहजिकच नेत्याकडे एवढे पैसे आहेत म्हंटल्यावर त्याने ते कसे मिळवले असतील याचा अंदाज येतो. ज्या चरंजीत सिंग चन्नी यांच्याकडे १३३ कोटी असल्याचा आरोप होत आहे. त्यांना राहुल गांधी यांनी गरीब असल्यामुळे मुख्यमंत्री केलं असल्याचं म्हंटल होत. चन्नीला राहुल गांधी यांनी गरीब म्हणणे आणि त्यांच्यावर त्यांच्याच पार्टीतून असे आरोप होणे. पंजाब काँग्रेस मध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दाखवतं. पंजाबचे राजकारणात काय चाललंय कोणालाही समजतं नाहीये. काँग्रेसचे आपसाततले भांडणे आणखी संपले नाहीत. २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे पंजाब मध्ये नेमकं काय चाललंय याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे.

चन्नी अन सिद्धूत कोल्ड वॉर चालूय.

राजकारण लई बेक्कार असतं चांगल्या माणसाला पण वाईट बनवतं असं आमच्या गावाकडचे एक आजोबा म्हणायचे. आता कळतंय खरं सांगायचे ते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतल्यावर खरं तर सिद्धू पंजाबचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. कारण अमरिंदर याना हटवण्यात सिद्धूचा सर्वात मोठा वाटा होता. पण काँग्रेसने वेगळा डाव टाकला. रेस मध्ये नसलेल्या चन्नीला मुख्यमंत्री बनवला. चन्नी मुख्यमंत्री झाल्या पासूनच सिद्धू नाराज होता त्यात भर म्हणून कि काय काँग्रेसने चन्नीला पुढचा मुख्यमंत्री म्हणून घोषित केलंय. पुढचा मुख्यमंत्री पण चन्नीचं होणार असल्यामुळे सिद्धूचा गेम झाला आहे. चन्नीला त्याच्या मतदार संघात हरवल्याशिवाय आपला नंबर लागत हे सिद्धूला चांगले माहित आहे. चन्नीला पण जाणीव आहे कि सिद्धूला घरी बसवल्याशिवाय आपल्याला राज्य हाकता येणार नाही. त्यामुळे दोघे लागलेत एकमेकांना हरवायला. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री पदाची हाव दोघांना खेळवत आहे. लोकं उगाच म्हणतं नाहीत, भले भले येडे झालेत राजकारणाच्या नादात.

सिद्धूच्या पोरींनी चन्नीची गरिबीचं बाहेर काढलीय.

अमृतसर शहरातून नवजोत सिंग सिद्धू निवडणुकीला उभे राहिले आहेत. सिद्धूला राज्यभर प्रचार करायचा असल्यामुळे अमृतसरचा प्रचार सिद्धूची बायको आणि पोरगी बघते आहे. दिवसभर प्रचार करून सिद्धूची पोरगी रबिया सिद्धू पत्रकारांना बोलतं होती, पत्रकारांनी तिला विचारलं चन्नी गरीब असल्यामुळे सिद्धूचा पत्ता कट झाला आहे का ? त्यावेळीस रबिया म्हणाली, “चन्नी गरीब आहे तुम्हाला कोणी सांगितलं. बाकीचं जाऊद्या चन्नीचे बँक अकाउंट जर तुम्ही बघितले तर तुम्हला १३३ कोटी दिसतील. मला सांगा १३३ कोटी बँकेत असलेला माणूस गरीब तर नसतो ना ?” रुबिया सिद्धू यांनी चन्नी गरीब नाहीत सांगून एक प्रकारे काँग्रेसला अडचणीत आणलं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.