सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

भारतात शून्य रुपयाची नोट पण आहे, तुम्ही कोणी पहिली का ?

zero rupee note

आपल्या भारतामध्ये ५ रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, ५०० रुपये आणि २००० रुपयेच्या नोटा आहेत. या नोटांबद्दल माहित नाही असा कोणी नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि भारतात शून्य रुपयाची देखील नोट आहे. तुम्ही वाचून चकित झाला असला तरी पण हे खरं आहे. मागच्या एक दशकापासून भारतामध्ये शून्य रुपयाची नोट अस्तित्वात आहेत आणि अनेक लोक तिचा वापर पण करतात.
भारतीय रिजर्व्ह बँक भारतात नोट छापण्याचे काम करते मात्र शून्य रुपयाच्या नोटे बद्दल विचारल्यावर रिजर्व्ह बँक म्हणते हे आम्हाला माहित नाही. मग ही शून्य रुपयाची नोट छापतो तरी कोण?

कोण छापतो शून्य रुपयाची नोट ?

फिप्त पिलर्स नावाची तामिळनाडूमध्ये एक एन. जी. ओ. आहे. २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शून्य रुपयाची नोट छापली. शून्य रुपयाच्या नोटेवर त्यांनी भ्रष्टाचार नियंत्रित करणाऱ्या सरकारी कार्यालयाचे आणि अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर्स छापली होते. मराठी, हिंदी, तामिळ आणि कन्नड भाषेमध्ये फिप्त पिलर्स संस्थेने लाखो शून्य रुपयाच्या नोटा छापल्या आणि त्या लोकांमध्ये फुकट वाटल्या.

शून्य रुपयाच्या नोटेचा कसा वापर करायचा ?

शून्य रुपयाच्या नोट छापण्यामध्ये फिप्त पिलर्स संस्थेचा उद्देश होता कि जर सरकारी अधिकारी किंवा कुणीही लाच मागत असेल तेंव्हा नागरिकांनी त्या शून्य रुपयाच्या नोटांचा वापर करायचा. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला ती शून्य रुपयाची नोट द्यायची म्हणजे तो त्यावर छापलेले नंबर्स बघेल आणि लाच घ्यायला घाबरेल. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी भारत आणि जगभर अनेक आंदोलने झाली. पण शून्य रुपयाची नोट काढून त्यावर भ्रष्टचार नियंत्रित करणाऱ्या सरकारी कार्यालयाची यादी देणारा हा फिप्त पिलर्सचा खूप वेगळा आणि अभिनव प्रयोग आहे.
अशा प्रयोगाने भ्रष्टाचार कमी होईल का तुम्हाला काय वाटत ?

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.