सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कुबेरांचे प्रताप, संभाजी ब्रिगेडचे उत्तर. कोण बरोबर कोण चुकले ?

दैनिक लोकसत्ताचे संपादक ‘गिरीश कुबेर’ यांच्यावर नाशिक मध्ये मराठी साहित्य संमेलनात ‘संभाजी ब्रिगेड’ च्या कार्यकर्त्यांनी शाही फेक केली. साहित्य संमलेनात भाषण देण्यासाठी ‘गिरीश कुबेर’ नाशिक मध्ये आले होते. ‘रेनिसां स्टेट’ नावाचं कुबेरांनी पुस्तक लिहलं आहे. ‘रेनिसां स्टेट’ मध्ये कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

गिरीश कुबेर कोण आहेत?

जेष्ठ पत्रकार, लेखक आणि २०१० पासून गिरीश कुबेर लोकसत्ता चे संपादक आहेत. आपल्या संपादकीय अग्रलेखामुळे ‘गिरीश कुबेर’ नेहमी चर्चेत असतात. २०१६ साली ‘असतांचे संत’ नावाचा अग्रलेख कुबेरांनी लिहला होता. ‘असंतांचे संत’ वर सर्व स्तरातून टीका झाली होती. टीकेनंतर कुबेरांनी ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख मागे घेतला. टाटायन, एका तेलियाने, अधर्मयुध्द, युद्ध जीवांचे, पुतीन -महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान, हा तेल नावाचा इतिहास आहे इत्यादी पुस्तके गिरीश कुबेरांची प्रसिद्ध झाली आहेत. २०२१ च्या मेमध्ये कुबेरांनी ‘रेनिसां स्टेट’ नावाचं इंग्रजी पुस्तक प्रकाशित केलं. मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला यावर ‘रेनिसां स्टेट’ मध्ये भाष्य केलं आहे.

संभाजी बिग्रेडचे काय आहेत गिरीश कुबेरांवर आरोप ?

मे २०२१ मध्ये कुबेरांनी ‘रेनिसां स्टेट’ प्रकाशित केलं. प्रकाशनच्या काही दिवसांमध्येच कुबेरांच्या लिखाणावर आक्षेप घेण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा इतिहास चुकीचा लिहला असल्याचा आरोप कुबेरांवर होत आहे. संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे कि,” गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राविषयीचे ‘रेनिसां स्टेट’ हे इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ज्या पद्धतीने ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे तीच ‘री’ कुबेरानी ओढली आहे. संभाजी महाराजांनी सत्तेसाठी महाराणी सोयराबाई यांना मारले हे लिहिलेलं तर सनक आणणारे आहे. थोरले बाजीराव यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली आहे. बाजीराव यांना दिल्लीला आव्हान देणारा पहिला योद्धा होता म्हणून लिहिलं आहे. हे सांगताना दिल्लीत महादजी शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या अफाट कामगिरीचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला आहे.

थोरले बाजीराव हे सातारच्या छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे होते. शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते. कुबेरानी ते सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट थोरल्या शाहू महाराजांकडे दूरदृष्टीचा अभाव होता म्हणून स्वतःचे मनाचे श्लोक छापले आहेत. सामाजिक न्यायाचे आणि समतेचे पुरस्कर्ते राजश्री शाहू महाराजांचा उल्लेख पहिले आरक्षण दिले इतकाच केला आहे. हे पुस्तक एक प्रकारे प्रपोगेंडा पसरवायला लिहिले आहे की काय अशी शंका येते “.संभाजी ब्रिगेड आणि इतर लोकांच्या आक्षेपानंतर अनेकांनी गिरीश कुबेरांचा निषेध केला होता.

नाशिक मध्ये शाई फेक

गिरीश कुबेरांच्या ‘रेनिसां स्टेट’ वर प्रकाशनाच्या काही दिवसानंतरच आक्षेप घेतले जात होते. गिरीश कुबेर यांनी आक्षेपावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण जे लिहले आहे ते कसे बरोबर आहे त्यात कुठलीही छेडछाड केली नसल्याचा त्यांनी प्रतिवाद केला नाही. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कुबेरांनी हे पुस्तक अकॅडमिक नसल्याचा उल्लेख केला आहे. हा एवढाच काय तर कुबेरांचा प्रतिवाद आहे आपण म्हणू शकतो. काही काळ वाद उभा झाल्यावर तो नंतर शांत झाला. परंतु कुबेरांनी स्पटीकरण न दिल्याने जे आक्षेप घेतले गेले होते ते तसेच राहिले आणि त्याचा परिणाम नाशिकच्या साहित्य संमेलनात त्यांच्यावर शाई फेकने झाला.
गिरीश कुबेरांनी पुस्तक लिहले हा त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी काय लिहावे हे त्यांना कोणी सुचवू शकत नाही. परंतु पुस्तकात इतिहासाची तोड फोड होत असेल, त्यावर आक्षेप घेतले जात असतील तर लेखकांनी त्यावर स्पटीकरण दिले पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर आपण इतिहासाची तोड फोड करू शकत नाहीत. इतिहास म्हणजे कथा नाहीत ज्या आपण आपल्या सोयी नुसार लिहाव्या. स्पटीकरण न देऊन कुबेर ‘रेनिसां स्टेट’ च्या बाबतीत चुकले आहेत, त्यांनी ती चूक सुधारावी.

विरोध करण्याचा एक वैधानिक मार्ग असतो तोच आपण वापरला पाहिजे, याचे भान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्तांना राहिले नाही. गिरीश कुबेर आक्षेपांना दाद देत न्हवते हे खरंच होत पण म्हणून त्यांच्यावर हल्ला करावा, शाई फेक करावी हे लज्जास्पद आहे. हिंसेने काहीही साध्य होत नाही हे कार्यकर्त्यांना समजायला हवे होते. विचारांनीच विचारांचा मुकाबला केला जाऊ शकतो हे जर आपल्याला समजले तर पुन्हा शाई फेक सारखे प्रकार होणार नाहीत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.