२८ ऑक्टोबरच्या सायंकाळी रेल्वे मंत्रालयातून निर्णय आला कि , IRCTC जे तिकीट आरक्षित करताना शुल्क सेवा आकारते त्या मधून सरकार ५०% घेणार आहे. हा निर्णय जेव्हा सेबीने मार्केटला जाहीर केला तेंव्हा शेयर मार्केट मध्ये एकच गोंधळ उडाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला IRCTC च्या शेयरवर नकारार्थी परिणाम झाला. ज्या वेळेस ग्राहक रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढतात त्या वेळेस IRCTC ही भारत सरकारची कंपनी एक सेवा शुल्क आकारते. २०१६ पर्यंत हे सेवा शुल्क IRCTC ला खूप माफक होते. त्यानंतर २०१६-२०१९ च्या दरम्यान IRCTC ने भारत सरकारच्या आदेशामुळे हे शुल्क आकाराने बंद केले होते. डिजिटल इंडियाला प्रोत्सहन देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. २०१९ ला IRCTC हि कंपनी शेयर मार्केटला लिस्टेड झाली आणि सप्टेंबर २०२० पासून कंपनीने तिकीट सेवा शुल्क आकारणे परत चालू केले.
IRCTC ची तिकीट सेवा शुल्क काय आहे ?
IRCTC ही भारत सरकारची कंपनी रेल्वेच्या तिकीट आणि इतर सेवा देण्याचं काम करते. त्यात ऑनलाईन तिकीट सेवा देणे हे महत्वाचे काम आहे. ज्या वेळेस ग्राहक ऑनलाईन तिकीट घेतात त्या वेळेस IRCTC शुल्क आकारते. २०१६ पर्यंत हे तिकीट सेवा शुल्क माफक दरात IRCTC आकारायची. २८ ऑक्टोबरच्या निर्णयापर्यंत हे शुल्क IRCTC च्या नफ्याचा भाग होता. त्याचा फायदा IRCTC च्या भागधारकांना होत होता. २०२० -२०२१ ह्या वर्षात IRCTC ने तिकीट सेवा शुल्कातून ३०० कोटी कमावले होते.
IRCTC चे शेयर्स का पडले?
सेबीने सरकारी निर्णय मार्केट मध्ये जाहीर केला कि लगेच त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसायला लागला. २९ ऑक्टोबरला जेव्हा सकाळी शेयर मार्केट सुरु झालं तेव्हा IRCTC च्या शेयर्स धारकांनी IRCTC चे शेयर्स विकायला काढले. पहिल्या दोन तासामध्ये IRCTC चे शेयर्स मार्केट मध्ये खूप स्वस्त झाले होते. ग्राहक चिंतेत होते कारण सरकारने कंपनीच्या नफ्यामध्ये सरकारचा वाटा पक्का केला होता. २९ ऑक्टोबरला मार्केट मध्ये IRCTC च्या शेयर्सचे भाव पडत होते त्यामुळे सरकारच्या लक्षात आले कि आपल्या निर्णयामुळे IRCTC ला तोटा होत आहे. हा तोटा खूप मोठ्या प्रमाणावर होत होता. २९ ऑक्टोबरला सरकारने तिकीट शुल्कचा जो निर्णय घेतला होता तो माघारी घेतला. परंतु निर्णय परत घेई पर्यन्त सरकारने IRCTC च्या बाजार मूल्यामधे मोठी घट झाली. जवळपास १८००० कोटींचा तोटा झाला. २८ ऑक्टोबरला IRCTC च्या शेयर्सची किंमत १००० रुपये होती परंतु दुसऱ्या दिवशीच तो शेयर्स ५०० रुपयापर्यंत खाली आला. १००००० कोटीचे बाजार मूल्य असलेली IRCTC चे मूल्य ८२००० कोटी वर आले आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे रेल्वे आणि सरकारचे एका दिवसात १८००० कोटीचे नुकसान झालं आहे.
ह्या नंतर IRCTC चे भविष्य ?
येणाऱ्या काळात IRCTC ला काही काळ तरी उभारी घेताना अडचण येणार आहे कारण लोकांचा विश्वास आता कमी झाला आहे. सरकार कधी पण कंपनीच्या निर्णयात अडचण निर्माण करू शकते. भागधारकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. १००००० कोटीचे बाजार मूल्य परत मिळवायला कंपनीला परत ठाम विश्वास मिळवायला लागणार आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !