सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अंडरवर्ल्ड मुंबईतून संपले का ?(Is Mumbai underworld still active?)

दाउद इब्राहिम आणि इतर डॉन विषयी आपण नेहमी ऐकत असतो. मन्या सुर्वेचा ‘शूट आऊट वडाळा’ असेल किंवा ‘अरुण गवळीच्या’ आयुष्यावर आलेला Daddy आपण बघितला असेल. परंतु सध्या अंडरवर्ल्डच्या बातम्या येत नाहीत, त्यामुळे अंडरवर्ल्ड संपला आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे.

अंडरवर्ल्डचा इतिहास (Mumbai underworld don history)

भारत स्वतंत्र होण्याअगोदर पासून अंडरवर्ल्ड मुंबई मध्ये सक्रिय आहेत. मुंबईत हाजी मस्तान आणि करीम लाला हे दोघे अंडरवर्ल्डचे मुख्य डॉन होते. भारत स्वतंत्र झाल्यावर मुंबईमध्ये व्यवसाय वाढले, पैसे यायला सुरुवात झाली होती. याचा फायदा अंडरवर्ल्डच्या डॉनने घेतला. त्यांनी अवैध धंदे मुंबईत सुरु केले. त्या वेळच्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये दारू बंदी होती त्याचा फायदा घेऊन हाजी मस्तान आणि करीम लाला यांनी मुंबईमध्ये अवैध दारू आणि ड्रगचे धंदे सुरु केले होते.(mumbai underworld gangster)

नंतरच्या काळात अरुण गवळी, दाउद इब्राहिम, छोटा राजन या सारखे डॉन मुंबई मध्ये वाढले. सुरुवातीला दारू आणि अवैध धंदे करणाऱ्या अंडरवर्ल्डने हप्ते घ्यायला सुरुवात केली. हप्ते आणि पैश्यामुळे अंडरवर्ल्ड मध्ये वेगळे गट पडले होते. दाउद इब्राहिमचा एक गट आणि त्याच्या विरोधात अरुण गवळी आणि इतरांचा गट. अंडरवर्ल्डच्या गटाच्या भांडणात मुंबई मध्ये खून वाढले होते. १९९० च्या दशकात अंडरवर्ल्ड मुंबई मध्ये प्रचंड प्रमाणात वाढले होते. मुंबई पोलीस त्यांना रोखण्यात अपयशी ठरत होते.

१९९२ ला काय बदलले?

१९९० पर्यंत अंडरवर्ल्ड पूर्णपणे पोलिसांच्या हाताबाहेर गेलं होत. खून खराबा मुंबई मध्ये वाढत होता. १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मस्जिद पडली गेली. त्याचे पडसाद देशभरात दिसले. मुंबई मध्ये पण बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली घडल्या. मुंबई दंगलीमागे अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा हात असल्याचे उघड झालं होतं आणि तिथून अंडरवर्ल्डच भविष्य बदलून गेलं. अयोध्या प्रकरण होण्याअगोदर अंडरवर्ल्ड धर्माच्या नावावर विभागाला नव्हता. हिंदू मुस्लिम दोन एकत्र काम करायचे मात्र दंगली नंतर अंडरवर्ल्डमध्ये फूट पडली होती.
१९९२ पर्यंत अंडरवर्ल्ड बद्दल लोकांना थोडीसी सहानभूती होती कारण तो पर्यंत सामान्य लोकांना फारसा त्रास कोणी देत नव्हता. १९९२ च्या दंगलीत मात्र सामान्य लोक मारले गेले एक महिनाभर दंगली होत होत्या. दंगली नंतर अंडरवर्ल्ड बद्दल सामान्य लोकांचं मत बदललं. अंडरवर्ल्डचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आणि राजकारण्यांवर लोकांचा दबाव वाढत होता.

दंगलीनंतर मुंबई पोलीस फुल्ल फॉर्म मध्ये आली आणि त्यांनी वेग वेगळे ऑपरेशन करून अंडरवर्ल्डचे डॉन मारायला सुरुवात केली. मन्या सुर्वे आणि रामा नाईक सारखे डॉन पोलीस चकमकीत मारले गेले आणि दाउद इब्राहिम, छोटा राजन सारखे डॉन देश सोडून पळून गेले. पोलिसांच्या चकमकीत अंडरवर्ल्ड पूर्णपणे बिखरले आणि हळू हळू अंडरवर्ल्डचा प्रभाव मुंबई मधून कमी झाला.

१९९२ नंतरची मुंबई आणि अंडरवर्ल्ड.

१९९१ ला पंतप्रधान नरसिंह राव यांनी खाजगीकरणाचे धोरण आणले परदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाली. अगोदर ज्या गोष्टींचं अंडरवर्ल्ड स्मगलिंग करायचं त्या गोष्टी आता बाकी लोकांना पण सहज बाजारात मिळायला सुरवात झाली. ज्या गोष्टी लोक अंडरवर्ल्ड कडून मिळवायचे त्या आता सहज मिळत असल्याने अंडरवर्ल्डला मोठा धक्का बसला होता. खाजगीकरणाच्या धोरणामध्येच सरकारने दारूबंदीवरचे नियम शिथिल केले होते त्यामुळे अंडरवर्ल्डचे अवैध दारूचे धंदे पण आपोआप कमी झाले. मुंबईच्या दंगली नंतर पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली होती. अरुण गवळी सारखे डॉन गजाआड गेल्यामुळे त्यांचा बाहेर प्रभाव कमी झाला होता. दाऊद इब्राहिमची डी कंपनी भारतामध्ये येण्यास घाबरत होती. त्यामुळे १९९२ च्या नंतर अंडरवर्ल्ड मुंबई मधून संपल्यात जमा होती. टी सिरीज चे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर अंडरवर्ल्डचे नाव कुठल्याही केस मध्ये आले नाही. २०१८ ला दाऊद इब्राहिमचा उजवा हात ‘छोटा राजन’ भारतीय पोलिसांच्या हाती लागला आहे.

एके काळी अंडरवर्ल्डच्या भीती खाली असलेली मुंबई आता मोकळा श्वास घेते आहे. पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे मुंबई अंडरवर्ल्ड पासून पूर्ण नाही पण बऱ्यापैकी मुक्त झाली आहे, असं आपण समजू शकतो!

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.