सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बलात्कार होणारच असेल तर मजा घ्या “..काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान.

निवडून आल्यानंतर सभागृहात बोलण्याचा अधिकार मिळाला म्हणजे त्या नेत्यांना जास्त अक्कल असते असं नाही. दुर्दैवाने आपले राज्यकर्ते वेळोवेळी त्यांची नको ती अक्कल प्रदर्शित करत असतात. बलात्कारासारखी गंभीर घटना विनोद करण्यासाठी नसते एवढी साधी अक्कल यांना नाही.

कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे. कर्नाटक मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. सभागृहात त्यावर चर्चा होत होती अधिवेशनात भाषण करताना काँग्रेस आमदार आणि माजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रमेश कुमार म्हणाले आहेत ,”जर बलात्कार होणारच असेल तर महिलांनी बलात्काराची मजा घ्यायला पाहिजे. रमेश कुमार यांनी असे विधान केल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागण्याची होत आहे.

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी सभागृहातील कामकाज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपवण्याचे आदेश दिले होते. पण राज्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते सभागृहात मांडण्याची गरज असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कामकाजाचा वेळ वाढवला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षाचे आमदार धिंगाणा घालत होते. सभागृहात विरोधी पक्षाचे आमदार गोंधळ घालत असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी हतबल होऊन आपले मत व्यक्त केले कि, “विधानसभेत जे काही आता होत आहे ते निंदाजनक आहे आणि मला वाटते हा गोंधळ नियंत्रित करणं कठीण आहे. माझ्याकडे आता जो गोधळ चालला आहे त्याला बघणे एवढाच पर्याय आहे “.

कर्नाटक विधानसभा अध्यक्षाच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना काँग्रेस आमदार आणि माजी विधान सभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. रमेश कुमार यांनी सभागृह अध्यक्षांना सल्ला दिला कि, अध्यक्ष महोदय आपल्याकडे अशी एक म्हण आहे जर बलात्कार होणारच असेल तर महिलांनी बलात्काराची मजा घ्यायला हवी “. त्यामुळे अध्यक्षांनी लक्षात घ्यायला पाहिजे जर गोंधळ होणारच असेल तर अध्यक्षांनी परेशान न होता गोंधळाची मजा घ्यायला हवी.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.