सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

द्वेषाची परिसीमा झाली, १४ वर्षाचा पोरगा अखिलेश यादवला गोळ्या घालायला तयार

aryan pande threat to akhilesh yadav

१४ वर्षाचा मुलगा गोळ्या घालायला तयार होतोय. उत्तर प्रदेशाचे राजकारण कुठे चाललंय कळायला मार्ग नाही. एक दोन महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सगळेच पक्ष अगदी ताकदीने प्रचाराला लागले आहेत. भाजप राज्यभर प्रचार सभा घेत आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव त्यांची विजय यात्रा करत आहे. काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष देखील प्रचार करत आहे. सध्या जे वातावरण उत्तर प्रदेशात दिसत आहे त्यावरून एक स्पष्ट झालं आहे कि येत्या निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच फाईट होणार आहे. त्यामुळे भाजप आणि अखिलेश यादव एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पण दुर्दैवाने टीका अशा दिशेला घेऊन जाईल असं वाटलं नव्हतं.

आर्यन पंडित अखिलेश यादव यांचा खून करायला तयार

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचार सभेच्या नंतरचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे .मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेला आलेल्या लोकांकडून पत्रकार प्रतिक्रिया जाणून घेत होते. त्यातील एक पत्रकार जमलेल्या घोळक्याला प्रश्न विचारात होता तेंव्हा त्याला हा १४ वर्षीय आर्यन पंडित भेटला. तुम्हीच ऐका तो काय म्हणतोय. त्याचं म्हणणं आहे शक्य झालं तर तो समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा खून करायला तयार आहे.

द्वेशाने भरलेला प्रचार थांबला पाहिजे

प्रचार म्हणजे एकमेकांचे उणे दुणे काढणे आलेच. भाजप समाजवादी पक्षावर जोरदार टीका करत आहे. समाजवादी पक्षाच्या काळात उत्तर प्रदेशात दादागिरी वाढली होती. भ्रष्टाचार भयानक झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी तर समाजवादी पक्षाची लाल टोपी उत्तर प्रदेशसाठी खतरे कि घंटी असल्याची टीका केली होती.
समाजवादी पक्ष देखील भाजपवर टीका करताना जोरदार प्रहार करत आहे. राज्यातील योगी सरकार बिन कामाचे आहे. मागच्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी यादव यांनी कसले हि काम केले नाही त्यामुळे भाजपला सत्तेतून घालवणे गरजेचे असल्याची टीका अखिलेश यादव करत आहेत.

निवडणुकीत एकमेकांवर टीका करणे साहजिक आहे. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत द्वेष हा प्रचाराचा मुख्य भाग झाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात किती द्वेष भरला आहे याची प्रचिती प्रचार सभेतील लोकांच्या प्रतिक्रियांमधून येत आहे. हा द्वेष छोट्या मुलांपर्यंत पोहचला आहे. छोटी मुलं आपल्या विरोधकांचा खून करायला पण तयार असल्याचं दिसत आहे.

राजकारण समाजाच्या भल्यासाठी करायचं असतं. जनता ज्याला निवडून देईल त्याचा सन्मान करायचा असतो. लोकशाही मध्ये विरोधकांचा सन्मान केला पाहिजे ह्या गोष्टी राजकीय पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिकवण्याची गरज आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.