फेब्रुवारी 5, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मोबाईल दुकानात काम करणाऱ्या पोराने पंजाबच्या मुख्यमंत्र्याला ३४ हजार मताने हरवलं.

उत्तरप्रदेश , गोवा , उत्तराखंड मणिपूर आणि पंजाब अश्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकणांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे तर पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या बाहेर पहिला विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाने भाजप, काँग्रेस आणि अकाली दल सारख्या पक्षांना मात दिली असल्यामुळे आज दिवसभर त्यांचीच चर्चा होत आहे. पंजाबमध्ये मध्ये मात्र चर्चा होत आहे “लाभ सिंग उगाके” ह्या तरुणाची.

चरणजित सिंग चन्नीच्या विरोधात लढायची हिंमत केली..

पंजाबचे राजकारण नेह्मीच राष्ट्रीय चर्चेत असतं पण मागच्या सहा महिन्यापासून खूप जास्तच आहे. ह्याच कारण असं कि काँग्रेस पक्षाने त्यांचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांना त्यांच्या पदावरून हटवलं. स्वतंत्र नेता म्हणून अमरिंदर सिंग ह्यांची एक प्रतिमा होती पण त्यांना मुख्यमंत्री पदावरून हरवल्यामुळे काँग्रेस मध्ये मतभेद झाले. तेंव्हापासून पंजाब राष्ट्रीय बातम्यांमध्ये आहे.
कॅप्टन यांच्या नंतर काँग्रेसने पंजबाच्या मुख्यमंत्री पदावर चरणजित सिंग चन्नी याना आणलं. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री झालेल्या आणि ह्यांनी खूप कमी वेळेत स्वतःची एक ओळख बनली. चन्नी पंजाबमध्ये प्रचंड लोक प्रिय नेता झाले होते.
फेब्रुवारी मध्ये पंजाबच्या निवडणूक होणार होत्या काँग्रेस कडून चन्नी याना ‘भागौर’ मतदार संघातून उतरवले. साहजिकच मुख्यमंत्री असलेला उमेदवार बाकी उमेद्वारांपेक्षा ताकतवरच असणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला कोणी तयार होत नव्हते. त्यावेळा नाव पुढं आलं लाभ सिंग उगाके ह्या तरुणाचं. २०१३ पासून तो आम आदमी पक्षाचं काम करत होता. केजरीवालने त्याला लढायला सांगितलं आणि हा गडी मैदानात उतरला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्याची हिंमत केली आणि आज त्याची किंमत त्याला मिळाली आहे.

आई शाळेत काम करते , वडील ड्राइवर आहेत पोरगा आमदार झाला.

केजरीवालांच्या आदेशामुळे “लाभ सिंग उगाके” याला निवडणुकीत उभे राहावे लागले. पण निवडणुकीला सामोरे जाण्यासारखी लाभ सिंग ह्याच्या घरची परिस्थिती नव्हती. आई सरकारी शाळेत खाऊ बनवण्याचे काम करते, वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत आणि घर चालवण्यासाठी स्वतः लाभ सिंग मोबाईल च्या दुकानात काम करतो. पण म्हणतात ना देव ज्या वेळेला देतो ना छप्पर फडके देतो. होईल ते बघू म्हणून लाभ सिंगने पक्षासाठी जबाबदारी स्वीकारली. पोरगा लढतोय म्हणून भागौर वासियांनी त्याला भरगोस मदत केली. निडणुकीला लागणारा सर्व खर्च मतदारांनी केला. एक बाजूला स्वतः मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला गरीब लाभ सिंग पण भागौरच्या लोकांनी गरीब लाभ सिंगला निवडले. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नीला लाभ सिंगने ३४ हजार मतांनी हरवलं आहे. आई शाळेत काम करते, वडील ड्राइवर आहेत पण पोरगा आमदार झालाय..

चरणजित चन्नीच कुठं चुकलं ?

निकाल लागून आणखी एक दिवस हि झाला नाही त्यामुळे नेमकं चन्नी कुठे चुकले हे सांगणं कठीण आहे पण ज्या लोकांनी भागौरची निवडणूक कव्हर केली त्यांच्या म्हणण्यानुसार चन्नी पॉसिटीव्ह प्रचार कमी पडले. काँग्रेसने चन्नीला दोन मतदार संघातून निवडणूक लढवायला लावली त्यामुळे भागौर मतदार सांगता त्यांना लक्ष देणं जमाल नाही. त्यात चन्नी यांच्या कडे राज्यभरात प्रकाहर करण्याची जबाबदारी होती.
चन्नी यांच्या गैरहजेरीचा फायदा लाभ सिंग आणि आम आदमी पक्षाला झाला त्यांना भागौर मध्ये पॉसिटीव्ह प्रचार केला. दिल्लीत केलेल्या केजरीवाल यांच्या कामाचा प्रचार करण्यात लाभ सिंग यशस्वी झाला. लोकांना त्याचा प्रचार आवडला म्हणूनच मुख्यमंत्री असलेल्या चन्नी यांचा भागौरच्या मतदारांनी त्यांचा ३४ हजार मतांनी पराभव केला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.