सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

३० रुपयांना एक लिंबू… पण अचानक लिंबांचे भाव का वाढलेत ?

मागच्या दोन आठवड्यापासून लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. भाव गगनाला भिडले आहेत आधी हा फक्त वाक प्रचार ऐकला होता. आता याचा अनुभव येत आहे. सध्या बाजारात लिंबाचा भाव ३५० रुपये किलो आहे. ह्या भावात लिंब घ्यायचे म्हंटले तर एक लिंबू साधारणपणे २० ते ३० रुपयाला पडते.
या आधी लिंबाचे भाव एखादाही वाढल्याचे आठवत नाही. पण मग या वेळेस असं काय झालं कि सगळी कडे फक्त लिंबाची चर्चा होत आहे. याच लिंबू भाव वाढीचा आपण आढावा घेतला.

देशात लिंबांचं उत्पादन किती आहे ?

देशामध्ये ३.१७ लाख हेक्टरवर लिंबांचं उत्पादन घेतलं जातं. एका वर्षभरामध्ये एका लिंबाच्या झाडाला तीन वेळा लिंब येतात. आंध्र प्रदेश हे देशातील सर्वाधिक लिंबू उत्पादन घेणार राज्य आहे. या राज्यामधील ४५ हजार हेक्टर जमीन या पिकाखाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा आणि तामिळनाडू ही राज्ये सुद्धा लिंबू उत्पादनात आघाडीवर आहेत. सामान्यपणे आपण ज्याला लिंबू म्हणतो त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये साधं लिंबू जे पिवळ्या रंगाचं असतं ते आणि दुसरं हिरव्या रंगाचं मोठ्या आकाराचं लिंबू ज्याला ईडलिंबू असं म्हणतात. ईडलिंबांचं उत्पादन उत्तर आणि ईशान्य भारतामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. देशात दर वर्षी ३७.१७ टन लिंबांचं उत्पादन घेतलं जातं. या सर्व लिंबांचा वापर देशातच केला जातो. लिंबांची आयत आणि निर्यात आपल्या देशात होत नाही.

उत्पादन कसं घेतलं जातं ?

शेतकरी वर्षभर लिंबांचं उत्पादन घेतात. यासाठी बहर ट्रीटमेंट नवाची प्रक्रियेचा वापर केला जातो. यामध्ये सुरुवातील शेतकरी सुरुवातीला सिचंन आणि रसायनांचा वापर करत नाहीत. बागांची छाटणी केल्यानंतर ते सिंचन आणि रसायनांचा वापर करतात. त्यामुळे झाडाला फुलं चांगली येतात आणि फळं चांगल्या दर्जाचं मिळतं. या झाडांना अंबे बहर, मृग बहर आणि हस्ता बहर असे तीन वेगवेगळे बहर एका वर्षात येतात. अंबे बहरमध्ये जानेवारी-फेब्रुवारीत फुलं येण्यास सुरुवात होते आणि एप्रिलमध्ये फळ येतं. मृग बहरमध्ये जून-जुलैदरम्यान फुलं येतात आणि ऑक्टोबरमध्ये फळं येतात. हस्ता बहरमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुलं येतात आणि मार्च महिन्यात फळं हाती लागतं. हे सर्व बहर वर्षभर येतात त्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन घेता येतं.

किंमती किती वाढल्या ?

पुण्याच्या बाजारात १० किलो लिंबांची किंमत १ हजार ७५० रुपये इतकी आहे. १० किलोमध्ये ३५० ते ३८० लिंबं असतात त्याहिशोबाने एका लिंबांची किंमत पाच रुपये होते. पुण्यात एक लिंबू सध्या १० ते १५ रुपयांना मिळत आहे. पुरवठा कमी असल्याने लिंबांचे दर एवढे वाढल्याचं पुण्यातील व्यापारी सांगतात. पुण्याच्या बाजारामध्ये १० किलोच्या लिंबाच्या तीन हजार पिशव्या येतात पण सध्या ही संख्या एक हजारांपर्यंत आलीय. मुंबई, हैदराबादच्या बाजारात लिंबं १२०, ६० आणि १८० रुपये किलो भावाने विकली जात आहेत. मागच्या महिन्यापर्यंत हे भाव १००, ४० आणि ९० असे होते.

लिंबांची भाव वाढण्यामागील कारणं काय ?

मुख्य कारण म्हणजे हस्त बहरमध्ये फळं आलेली नाहीत आणि अंबे बहरमध्येही फळांवर परिणाम झालाय. मागील वर्षी मान्सूनचा पाऊस चांगला झाला. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. लिंबाची झाडं ही आर्द्रतेबद्दल संवेदनशील असतात. त्यामुळेच पावसाचा परिणाम झाडांवर झाला. अंबे बहरमध्ये येणाऱ्या फळांवरही अवेळी आलेल्या पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला फुलं धरण्याचं प्रमाण कमी झालं. तापमान वाढीचाही फुलांच्या वाढीवर परिणाम झालंय . आता लिंबांची मागणी वाढली असताना हस्ता बहर आणि अंबे बहरमधील फळं बाजारात आहेत. मात्र संख्या फारच कमी आहे. दोन सलग बहर अपयशी झाल्यामुळे असं झाल्यानेच लिंबाचे दर वाढलेत.

फक्त लिंबांचेच दर वाढलेत का ?

फक्त लिंबांचेच भाव वाढलेले नाही. तर हिरव्या मिर्च्या, कारली ह्या भाज्यांचे भाव पण आठवड्यांमध्ये दुपट्टीहून अधिक वाढलेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढल्यामुळे भाज्यांचे दर वाढलेत.

भाव कमी कधी होतील ?

लिंबाचे भाव लगेच कमी होण्याची चिन्हं फार कमी दिसत आहेत. सध्या व्यापाऱ्यांकडे माल उपलब्ध होत नाहीय. आता लिंबांचा पुरवठा बाजारपेठेमध्ये ऑक्टोबरमध्येच होईल. त्यानंतरच लिंबांच्या दरांमध्ये घट झाल्याचं दिसेल असं म्हटलं जातंय. सध्या ज्या ठिकाणी फुलांवर वातावरणाचा आणि पावसाचा परिणाम झाला नाही अशा प्रदेशात अंबे बहरअंतर्गत आलेली फळं बाजारपेठेत विकली जात आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.