ईडी आणि महाविकास आघाडी यांच्यात काही तरी वैर असल्यागत परिस्थिती झाली आहे. याची सुरुवात झाली होती २०१९ मध्ये शरद पवार यांच्या ईडी चौकशी पासून , त्यांच्या नंतर अडकले ग्रहमंत्री अनिल देशमुख , देशमुख झाले कि ईडीने त्यांचा मोर्चा अजित पवार यांच्या परिवाराकडे वळवला होता. अजित पवार यांचा नंबर झाला कि आता त्यांचेच मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. ईडीची चौकशी काय नवीन राहिली नाही मात्र पहिल्यांदाच मंत्री झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर पण ईडीची धाड पडते म्हंटल्यावर मामला गंभीर आहे. तनपुरे यांच्या बद्दल माहिती घ्यायला पाहिजे.
नगरच्या मोठ्या घराण्यातून येतात प्राजक्त तनपुरे.
आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये एखादा आमदार मंत्री होत असेल आणि तेही युती-आघाडीच्या सरकारमध्ये म्हंटल्यावर तो आमदार किती पॉवरफुल असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. नगरच्या राहुरी तालुक्यातलं तनपुरे मोठं कुटुंब आहे. प्राजक्त यांचे आजोबा बाबुराव तनपुरे यांनी त्यावेळेला राहुरी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. तेंव्हापासून तनपुरे कुटुंब राहुरीच्या राजकारणात आहेत. बाबुराव स्वतः संसदीय राजकारणात होते त्यांचे पुत्र प्रसाद तनपुरे देखील काही काळ आमदार आणि खासदार राहिले आहेत.
घराची राजकीय प्राश्वभूमी असल्यामुळे प्राजक्त राजकारणात येणार हे तर पक्के होते. २०१७ ला प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. राहुरी नगरपालिकेचे ते पाहिल्यान्दा अध्यक्ष झाले. नगराध्यक्ष म्हणून दोन वर्षाची कारकीर्द पूर्ण झाल्यावर त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून राहुरी मतदार संघाचे तिकीट दिले. शिवाजीराव कर्डीले यांचा पराभव करून प्राजक्त तनपुरे २०१९ ला विधानसभेत पोहचले.
रोहित पवार असून देखील प्राजक्त यांची मंत्री पदी वर्णी लागली.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी त्यांची संसदीय राजकारणाची सुरुवात नगरच्या कर्जत जामखेड मधून केली. पहिल्याच प्रयत्नात ते देखील विधासभेत पोहचले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना नगर मधून राष्ट्रीवादीच्या रोहित पवार यांची मंत्री म्हणून निवड होईल अश्या चर्चा होत्या पण शरद पवार यांनी सर्वाना धक्का दिला. राहुरी मधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना मंत्री केलं.
नगर मधून राष्ट्रवादीला तरुण चेहरा द्यायचा होता पण जर रोहित पवार याना मंत्री पद दिले असते तर घराणेशाहीचा आरोप झाला असता म्हणून रोहित पवार यांचे नाव कमी करण्यात आले. मग राष्ट्रवादी कडे पर्याय होता नगरचे संग्राम जगताप , पारनेरचे निलेश लंके आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे. या तीन आमदारांमध्ये प्राजक्त तनपुरे यांचं पारडं जड ठरलं. काही लोक म्हणतात प्राजक्त जयंत पाटील यांचे भाचे असलत्यामुळे त्यांना मंत्री पद मिळाले. जयंत पाटील यांच्या मुळे मिळालं कि आणखी काही कारणामुळे माहिती नाही एक मात्र खरं कि शरद पवारांनी नगरचा नेता म्हणून रोहित पवार एवेजी प्राजक्त तनपुरेची निवड केली.
कारखान्याच्या गैरव्यहारात ईडी चौकशी करत आहे.
तनपुरे कुटुंबीय बाबुराव तनपुरे यांच्या पासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे वेग वेगळ्या ठिकाणी साखर कारखाने आहेत. नागपूरच्या “राम गणेश गडकरी” कारखान्याची मालकी पण तनपुरे कुटुंबीयांकडे आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना तोट्यात गेला त्यामुळे कारखानयाच्या बोर्डाने तो कारखाना राहुरीला हलवला. पण कारखाना राहुरीला हलवताना त्यात गैरव्यहार झाल्याचा आरोप झाला. ईडी कडे तशी तक्रार झाली होती. त्यामुळेच ईडीने ह्या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणात तनपुरे कुटुंबाची आता पर्यंत ईडीकडून ४२ कोटीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
राम गणेश गडकरी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने कारख्यानात गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे, पण आता पर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांची बाजू मांडली नाही.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !