सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

राज्यपाल कोश्यारी म्हणतात तसे समर्थ रामदास छत्रपतींचे खरे गुरु होते का

राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यातील गुरुशिष्य नात्याचा वाद अधूनमधून उफाळून येत असतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पण वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान त्यांनी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यात गुरू शिष्याचे नाते होते की नाही यावरून खूप वेळा वाद निर्माण झालेले आहेत. आणि आता राज्यपाल कोश्यांरी यांच्या वक्तव्याने वाद परत सुरु झाला आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे समकालीन होते पण त्यांच्यात खरंच गुरू-शिष्याचे नाते होते का याचा शोध अनेक इतिहासकारांनी घेतला आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी यांच्या गुरु शिष्याच्या नात्यावरून इतिहासकारांमध्ये दोन गट आहेत. एक गट मानतो कि समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते तर दुसरा गट असं मानतो कि शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे गुरु शिष्याचे संबंध नव्हते. गुरु शिष्याचा वाद न संपणारा झाला आहे पण आपण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थ रामदास खरेच शिवाजी महाराजांचे गुरु होते का यावर इतिहासकार काय म्हणतातात हे जाणून घेतले पाहिजे. जेणे करून दोन्ही बाजू आपल्याला समजतील.

श्री शिव- समर्थ पुस्तकात सर्मथ रामदास महाराजांचे गुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वंसत वैद्य यांनी १९९० साली “श्री शिव समर्थ” नामक पुस्तक प्रकशित केले होते. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यातल्या नात्याबद्दल या पुस्तकात लिहले आहे. वसंत वैद्य यांनी असा दावा केला आहे कि सर्मथ रामदासांकडे ११ मारुती मंदिरे होती. ११ पैकी प्रत्येक मारुती मंदिराला शिवाजी महाराजांनी ६ बिघे जमिनी दिली. जमीन दिल्यावर शिवाजी महाराजांनी सर्मथ रामदासांना पत्रं लिहले होते त्यात शिवाजी महाराज म्हणतात , ” मी आपले राज्य समर्थ रामदासांना अर्पण करत आहे”. तसे पत्रं देखील वैद्य यांनी “श्री शिव-समर्थ” मध्ये जोडले आहे.

वसंत वैद्य यांचा दावा अनेक इतिहासकारांनी मोडून काढला आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणतात, वसंत वैद्य यांनी प्रस्तुत केलेली पत्रं खोटी आहेत. इंद्रजित सावंत म्हणतात महाराज आणि रामदासांची एक दोन वेळा भेट झाल्याची दाखले मिळत नाहीत मग शिवाजी महाराज आपले राज्य रामदासांना अर्पण का करतील ? इंद्रजित सावंत महाराजनाच्या एक पत्राचा दाखल देऊन सांगतात कि , महाराजांनी त्याचे बंधू व्यंकोजीराजे याना पत्रं लिहून सांगितले होते, वैराग्य, देव वैगेरे उतार वयातील गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही पराक्रमावर भर द्या. त्यामुळे जे महाराज भावाला देव धर्मपासून दूर राहायला सांगतात ते राजे स्वतः आपले राज्य रामदासांना का अर्पण करतील ?

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे ठोस पुरावे कोणीही सादर करू शकले नाही.

राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे चांगले संबंध होते असे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहले आहे. शिवाजी महाराजांनी रामदासाच्या निवासाची सोय केल्याचे दाखले पण पुरंदरे यांनी दिले आहेत. पण समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखले पुरंदरे यांनी सादर केले नाहीत. इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे म्हणतात कि १६४९ साली शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट झाली असल्याचे दाखले दिले जातात ते खरे नाहीत. तरी पण जर छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास याना मान सन्मान दिला असेल म्हणजे रामदासच महाराजांचे गुरु असतील असा शोध लावणे म्हणजे अकलेचे तारे तोडणेच आहे.

गुरु शिष्याच्या वादाचे राजकारण होत आहे.

वाद निर्माण झाला कि राजकारणी त्यांची बाजू घेतात. गुरु शिष्याच्या वादात देखील राजकारणी दोन गटात विभागले आहेत. एक गट ब्राह्मणी तर दुसरा ब्राह्मणीत्तर . समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांनाच गुरु दाखवून ब्राह्मणी गटाला महाराजांच्या यशात समर्थ रामदानाचे योगदान दाखवायचे आहे. समर्थ रामदास ब्राह्मणी विचाराचे प्रतिनिधित्व करतात असे ते दाखवतात. त्यामुळेच भाजप . मनसे समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु असल्याच्या बाजूने दिसतात. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करतात. समर्थ रामदास किंवा दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते तर महाराजांच्या एकमेव गुरु होत्या राजमाता जिजाबाई भोसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी तसे त्यांच्या भाषणात देखील सांगितले आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.