सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कलकत्ता महानगरपालिकेत ममता बॅनर्जी यांची हवा कायम भाजप फक्त ३ जागांवर.

mamta banerjee won kolkata municipality

कलकत्ता महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या. १८ डिसेंबरला मतदानकलकत्ता महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या. १८ डिसेंबरला मतदान झालं आणि आज २१ डिसेंबरला महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले. १४४ नगरसेवक असलेल्या महापालिकेत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने १३४ जागेवर विजय मिळवत कोलकाता महानगरपालिकेत सत्ता कायम राखली. विरोधी पक्ष भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानव लागलं.

विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचा पराभव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने ४२ पैकी १७ जागा जिंकून भाजप दुसऱ्या नंबरचा पक्ष बनला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने पश्चिम बंगालकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली होती. २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने लोकसभेनंतर लगेच कामाला सुरुवात केली. मध्यप्रदेशातील नेते कैलास विजयवर्ग यांची पश्चिम बंगाल भाजप प्रभारी म्हणून निवड केली. दोन वर्षाच्या मेहनती नंतर भाजप विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा होती. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील नेते भाजपमध्ये जात होते. निवडणुकी आधी भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवेल अशीच परिस्थिती दाखवली जात होती.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला चांगलीच मात दिली. २९४ सभासद असलेल्या विधिमंडळात ममता बॅनर्जी यांचे दोन तृतीयांश पेक्षा जास्त म्हणजे २१७ आमदार निवडून आले. निवडणुकी आधी मोठा गाजावाजा करून भाजपने हवा केली होती मात्र भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

विधानसभा निवडणुकीनंतर मोठी निवडणूक मात्र भाजपचे प्रदर्शन कायम

मे २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यात कोलकाता महापालिकेच्या निवडणुका झाल्या. पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी राजधानी असलेल्या कोलकाता महापालिकेत सत्ता असणे महत्वाचे आहे. २०११ पासून तृणमूल काँग्रेस महापालिकेत सत्तेत आहे. २०१६ च्या निवडणुकांमध्ये तृणमूल सहज निवडून आली. या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मात्र भाजपने तृणमूल काँग्रेसला आव्हान उभे केल्याचे वाटत होते. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी हे भाजपचे नेतृत्व करत होते. मदिनापूर विधान सभा मतदार संघात अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुवेंदू अधिकारी कोलकाता महापालिकेत भाजप जिंकेल असा दावा करत होते. कोलकात्याच्या मतदारांनी मात्र भाजपाला पूर्णपणे नाकारले. फक्त तीन जागांवर भाजपचे नगरसेवक जिंकले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचा हा सलग दुसरा मोठा पराभव आहे.

बाकी राज्यांमध्ये एका मागून एक निवडणूक जिंकणारा भाजप पश्चिम बंगाल मध्ये मात्र ममता बॅनर्जी यांच्या समोर नांगी टाकताना दिसत आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.