सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

युक्रेनचा अध्यक्ष पुतिनला म्हणतोय मैं झुकेगा नही साला.

युक्रेन आणि रशियात युद्ध चालू झालं आहे याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. या युद्धात सगळ्यात जास्त चर्चा होत आहे युक्रेनचे अध्यक्ष झेलसिन्की यांची. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर अमेरिकेने झेलसिन्की याना युक्रेन मधून बाहेर पडायला विमानाची सोय केली होती. पण झेलसिंक्कीने अमेरिकेची मदत नाकारली आणि जगाला संदेश दिला कि मी काही अफगाणिस्तानचा अश्रफ घनी नाही जो देश संकटात असताना देश सोडून जाईल.

कॉमीडिअन ते अध्यक्ष असा प्रवास आहे झेलसिन्कीचा.

जगातल्या कोणत्याही देशातलं राजकारण बघा कॉमिडी पेक्षा कमी नाही पण युक्रेन असा एकमेव देश आहे ज्या देशाचा अध्यक्ष कॉमीडिअन आहे. खरा खुरा कॉमीडिअन. युक्रेन मध्ये भ्रस्टाचार वाढला होता. लोकांमध्ये सरकार बद्दल खूप राग होता. त्या वेळेतच झेलसिन्की त्याच्या कॉमिडी मधून सरकारवर प्रहार करायचा. त्याची कॉमिडी एवढी प्रसिद्ध झाली कि काही लोकांनी त्याला तू स्वतः राजकारणात येत नाही म्हणून विचारणा केली. लोकांचे समर्थन बघून झेलसिन्की युक्रेनच्या राजकारणात आला. २०१४ ला त्याने “सरवंट ऑफ पीपल”नावाची पार्टी सुरु केली. त्याचे भाषण अख्या युक्रेन मध्ये फेमस होत होते. २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकी मध्ये युक्रेनच्या जनतेने झेलसिन्कीला अध्यक्ष म्हणून निवडले. पण सत्ता मिळाल्याच्या दोनच वर्षात त्याला युद्धाला सामोरे जावे लागत आहे. काही लोक तर असे म्हणत आहेत कि झेलसिन्की अध्यक्ष झालाच आहेत युद्ध झेलायला.

झेलसिंक्कीचे आजोबा हिटलरच्या विरोधात लढले होते.

१९३९ या हिटलर ने दुसरे महायुद्ध सुरु केले. युरोपातले सर्व देश हिटलर त्याच्या ताब्यात घेत होता. पोलंड, हंग्री झाल्यावर हिटलरची सेना रशियाच्या मास्को कडे निघाली. त्यावेळच्या रशियन सैन्याने हिटलरच्या सैन्याला मॉस्कोच्या जवळ येऊ दिले आणि मॉस्कोच्या सीमेवर हिटलरच्या सैन्याला रशियाच्या रेड आर्मीने धूळ चारली. तिथूनच हिटलरची हरण्याची सुरुवात झाली आणि १९४५ ला हिटलर हरला. त्यावेळच्या रशियन रेड आर्मीत झेलसिंकीचा आजोबा सॅम होता. त्याने नाझी सेनेच्या विरोधात लढा दिला आणि रशियाला जिंकवले देखील. त्यावेळी युक्रेन रशियाचा भाग होता.

शेवटच्या श्वास असे पर्यंत लढू पण माघार नाही.

रशियन सैन्याने युक्रेन हल्ला केला आहे हे सांगण्यासाठी युक्रेन आणि रशियाच्या जनतेला संबोधित करताना झेलसिंक्कीने आम्ही लढणार असल्याचा जाहीर केलं होत. झेलसिंक्कीचे इरादे तेंव्हाच स्पष्ट दिसत होते. युद्धाच्या भूमीवर मरण स्वीकारु पण हार नाही असाच त्यांचा तोरा होता. युद्ध जसं जस वाढत जात आहे तसे तसे झेलसिंक्कीचे इरादे आणखी पक्के होत आहेत. काल पत्रकारांना बोलताना झेलसिंक्की म्हणालेत , माझे आजोबा हिटलरच्या नाझी सैन्याशी लढले आहेत. त्याचेच रक्त माझ्यात आहे. मी पुतीन यांच्या समोर शरणागती पत्करणार नाही. झेलसिंक्कीचा तोरा एकदम आपल्या पुष्पां भाऊ सारखाच होता , झेलसिन्की पुतिनला चॅलेंज देत होता, मै झुकेगा नही साला ..

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.