‘मी तिथे असतो तर एक कानाखाली लावली असती’ असे भाष्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्या बाबतीत केले आणि रामायण सुरु झालं. नारायण राणे वर केस झाली, त्यांना अटक झाली आणि त्यातून ते सुटले. पण राणे कुटुंबाच्या मागची साडीसाती काय संपली नाही. नारायण राणेंचा मुलगा आमदार नितेश राणेंना संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीस कोठडी झाली झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व मिमर नितेश राणे यांचे मिम बनवतं आहेत. मिम भारी आहेत त्यामुळे हसून आनंद घ्या पण सोबत नितेश राणेंची एकूणच केस आहे समजून घ्यायला पाहिजे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यानच केसला सुरुवात झाली.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणूक लागल्या होत्या. आपल्याला माहिती आहे आपल्या राजकारण्यांचा जीव सहकारी बँकामध्ये आहे. कारण पण तेवढंच साहजिक आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या मदतीने जिल्ह्याचं राजकारण सोपं जात. तर असो आपण नितेश राणेंच्या केस कडे येऊ. सिंधुदुर्ग सहकाराची बँकेची निवडणूक होती. सिंधुदुर्ग म्हंटल कि शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातला संघर्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. बँकेच्या निवडणुकीत पण राणे आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते. निवडणुकीत राणे वरचढ आहेत असंच दिसत होत पण शिवसेना तेवढ्याच ताकतीने निवडणूक लढत होती. त्यामुळे मुकाबला जोरदार होणार होता. नारायण राणेंनी भाजपाची सगळी सूत्रे त्यांनाच मुलगा नितेश याच्या कडे दिली. नितेश राणे यांचं राजकारण कसं आहे महाराष्ट्राला माहिती आहे. हा गडी साम, दाम, दंड, भेद सगळं वापरतो. तेच राजकारण पुढे नेत नितेश राणेंनी शिवसेनेची माणसं फोडली आणि जी शिवसेना सोडत नव्हती त्यांना धमकावले. शिवसेनेचे संतोष परब यांना पण नितेश यांनी धमकावले होते. धमकावल्याच्या काहीच दिवसात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्याला एक निनावी चारचाकी गाडीने उडवले. अपघातात संतोष परब चांगलेच जखमी झाले होते. आपण शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे आमदार नितेश राणे यांनीच हा अपघात घडवून आणला असल्याचं आरोप संतोष परब यांनी केला. १८ डिसेंबरला संतोष परब यांनी तशी पोलिसात तक्रार दाखल केली आणि नितेश राणेंची केस सुरु झाली.
दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जाऊन पण फायदा नाही.
संतोष परब यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून नितेश राणेच्या विरोधात सिंधुदुर्ग मध्ये तक्रार केली. प्रकरण गंभीर होतं त्यामुळे नितेश राणेला अटक होणे नक्की होतं . पण नितेश राणे यांनी पोलिसांचा सामना करण्याच्या ऐवजी फरार होणे स्वीकारले. नितेश राणे फरार झाले पण सोबत त्यांनी सिंधुदुर्ग कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. सिंधुदुर्ग कोर्टाने राणेंचा अर्ज नाकारला आणि पोलिसांना शरण येण्याचे आव्हान केले. जिल्हा कोर्टात जमीन न मिळाल्याने राणे मुंबई हाय कोर्टात गेले. मुंबई कोर्टात पण त्यांना अटक पूर्व जमीन मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून राणे सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने पण नितेश राणेंची जमीन नाकारला. नितेश राणेला दहा दिवस अटक करू नका असे आदेश पोलिसांना दिले. त्यामुळे दिल्ली पर्यन्त जाऊन पण नितेश राणेला जिल्हा कोर्टात हजर व्हावे लागले.
संतोष परबच्या मागे शिवसेना खंबीर उभी आहे.
राणे आणि शिवसेनेच्या वितुष्टाबाबत सांगायला नको. त्यामुळे राणे कुटुंब अडचणीत येणार म्हंटल्यावर शिवसेना त्यात सहभाग घेणारच. सोबत संतोष परब हा शिवसेनाच कार्यकर्ता त्यामुळे शिवसेनेने सर्व ताकत त्यांच्या मागे लावली. राज्यात शिवसेनेचे सरकार असल्यामुळे नाही म्हंटल तरी राज्य पोलीस शिवसेनेच्या हातात आहेत. त्यामुळे नितेश राणे कधीही समोर आले असते तर त्यांची अटक पक्की होती. त्यामुळेच नितेश राणे डायरेक्ट कोर्टात हजर झाले. फिर्यादी जरी संतोष परब असला तरी त्याच्या बाजूने शिवसेनाच लढत आहे.
चार दिवसाची पोलीस कोठडी पण पुढे काय ?
२ फेब्रुवारीला नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टात हजर झाले. कोर्टात दोन्ही बाजूने प्रतिवाद झाले. सिंधुदुर्ग कोर्टाने नितेश यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलीस कोठडीत नितेश राणेंची पोलीस चौकशी करतील. चार दिवस झाल्यावर नितेश राणेला परत कोर्टासमोर हजर केले जाईल. जर चार दिवसात पोलिसांची चौकशी पूर्ण झाली तर राणेंना जामीन भेटू शकतो. पण जर पोलिसांनी चौकशीसाठी आणखी वेळ मागितला तर मात्र नितेश राणेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. पोलीस काय भूमिका घेतात ह्यावरच पुढचं काय ते ठरेल.
..
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !