सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

खबरदार ! दहा दिवस कोणीही हसायचं नाही उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा अजब आदेश.

kim jong un latest news

माणूस मेल्यावर घरातली माणसं दहा दिवस सुद्धा सुतक पाळायला तयार नाही. पण उत्तर कोरियात एक माणूस अख्या देशाला सुतक पाळायला लावतॊय, आहे का नाय कमाल? कुत्रे अंगावर सोडून माणसे मारणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा आता अजून एक नवीन नियम घेऊन आला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन त्याच्या अजब गजब नियम आणि कायद्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. देशातल्या सर्व तरुणांनी त्याच्यासारखे केस कापणे त्याने अनिवार्य केले होते. हेअर सलून वाल्याना ठराविकच प्रकारचे केस कापता येतील असाही त्याने आदेश काढला होता. किम जोंग ऊनच्या या निर्णयाची जगभर चर्चा झाली होती. आता किम जोंग ऊन नवीन निर्णय घेऊन आला आहे. उत्तर कोरिया मध्ये किम जोंग ऊनने दहा दिवस हसण्यावर, दारू पिण्यावर, नवीन खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. कुणाच्या दुःखात दहा दिवस हसायचं नाही हे जरा एकदा समजून घेऊ.

हसणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा लागणार आहे.

उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा म्हणजेच किम जोंग ऊनचे वडील किम जोंग दुसरे यांची १७ डिसेंबरला पुण्यतिथी आहे. आपल्या वडिलांची पुण्यतिथी साजरी करण्याची जोरदार तयारी करण्याचे प्रसाशनाला किम जोंग ऊनने आदेश दिले आहेत. पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सर्व देश दुःखात दिसायला हवा. सगळ्या उत्तर कोरिया वासियांनी आपल्या नेत्याची पुण्यतिथी अगदी दुःखात साजरी करावी म्हणून किम जोंग ऊन याने हा अजब गजब निर्णय घेतला आहे. पुण्यतिथीच्या दिवसापासून दहा दिवस म्हणजे १७ डिसेंबर पासून २७ डिसेंबर पर्यंत उत्तर कोरिया मध्ये हसण्यावर, नवीन खरेदी करण्यावर, अंत विधी करण्यावर आणि कुठलाही कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे. या दहा दिवसात जर कोणीही हसताना किंवा आनंदात दिसला तर कोरियन पोलीस त्याला अटक करू शकणार आहेत. हसण्याचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा लागणार आहे.

उत्तर कोरियात पुण्यतिथी कार्क्रमासाठी जनतेचा मूड तयार करावा असे आदेश होते. या महिन्याच्या सुरुवाती पासूनच जनतेने आपल्या नेत्याच्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी तयार राहावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. किम जोंग ऊन हा कधी कुठले काय निर्णय घेईल सांगता येत नाही. उत्तर कोरियाच्या जनतेला हा निर्णय मान्य आहे का नाही माहित नाही पण असल्या येडपट माणसासमोर कोण बोलणार. माणूस येडपट आहे ही भीती नाही पण भाऊंचा थोडा राग वाढला तर तोफेच्या तोंडी द्यायला कमी करायचा नाही. तो अमेरिकेला धमकी द्यायला पण कमी करत नाही. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना किंग जोंग ऊनने अमेरिकेवर अणूबॉम्ब टाकण्याची धमकी दिली होती. असा हा मोगॅम्बो कधी कशाने खुश होईल सांगता येत नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.