सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

इलेक्ट्रिक गाड्या घेताना जरा जपून, ओलाने १४०० गाड्या माघारी बोलावल्या आहेत

Ola-to-recall-1441-units of-S1

इलेक्ट्रिक गाड्या, कारची सध्या हवा झाली आहे. नवीन गाडी घेणारा हमखास इलेक्ट्रिकलाच पसंती देत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रचंड आकर्षण आहे. ओला, अथर आणि इतर कंपनी इलेक्ट्रिक गाड्या बनवत आहेत. मार्केटच्या आकड्यानुसार सध्या अथर एक नंबरला आहे पण चर्चा मात्र ओलाच्या गाडीची आहे. पण ज्या लोकांनी ओलाच्या गाड्या घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या नाहीत. अनेक ठिकाणी ओलाच्या गाड्या पेट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच ओला कंपनीने १४०० गाड्या माघारी बोलावल्या आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे देशात इलेक्ट्रिक गाड्यांची काय स्थिती आहे ह्याचा आढावा घेऊ

पुण्यातल्या घटनेमुळे चर्चा झाली

ओलाच्या गाड्या पेट घेत आहेत अश्या बातम्या येत होत्या पण त्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे कंपनीने त्याच्याकडे लक्ष नाही दिल. पण मागच्या आठवड्यात पुण्यात कंपनीने १४४१ गाड्या पाठवल्या होत्या. पुण्यात पाठवलेल्या गाडयांना मोठ्या प्रमाणात आग लागली. मोठ्या प्रमाणात गाडयांना आग लागल्यामुळे विविध न्यूज चॅनेलनी त्याची बातमी केली. केंद्रीय मंत्री नीतीन गडकरींनी ओलाला सल्ला दिला होता की जर गाड्यांमध्ये चूक असेल तर त्या परत मागवून ठिक करा. नितीन गडकरी यांच्या सल्ल्यांनंतर ओला कंपनीने त्यांच्या सर्व १४४१ गाड्या परत बोलावल्या आहेत.

आग कशी लागत आहेत ?

पुण्यातील घटना पुढे आल्यावर ओलाने त्यावर भाष्य केलं आहे कि पुण्यातली घटना इतर घटनांपेक्षा वेगळी आहे. कंपनी तर्फे शॊध घेण्यासाठी एक पथक पुण्यात पाठवले आहे. नेमकं कारण समजलं कि कंपनी ते सार्वजनिक करेल आणि त्याच्यावर काम करेल.

भारत सरकार ह्यावर काय बोललं आहे ?

भारत सरकार इलेक्ट्रिक गाडयांना प्रमोट करत आहे. त्यामुळे अश्या घटनेकडे सरकारचं बारीक लक्ष आहे. सरकार तर्फे नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांनी सर्व नियमांचे पालन करून गाड्यांची निर्मिती करावी असे आदेश दिले आहेत. सरकार सर्व घटनांकडे लक्ष देऊन आहे त्यामुळे नागरिकांनी चिंता करायची गरज नाही. अश्या घटना होत असतात. असं देखील नितीन गडकरी म्हणाले आहेत .

नितीन गडकरी आणि ओला ह्या दोघांनी पण स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता गाड्या घ्यायची कि नाही हे आपण ठरवायचे आहे. वाढते पेट्रोलचे भाव आपल्याला इलेक्ट्रिक गाड्यांकडे आकर्षित करत आहेत. पण अश्या बातम्यांमुळे मनात धाकधूक होते. त्यामुळे सर्व गोष्टी तपासूनच इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या तर चांगलं होईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.