जानेवारी 15, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

प्रिय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनो तुमच्या भल्यासाठी हे पत्रं !

भाजपावाले मित्र, काॅंग्रेसवाले मित्र, शिवसैनिक, राष्ट्रवादी मित्र, मनसैनिक व इतर सर्व कार्यकर्त्यांना समर्पित.

प्रिय मित्रांनो,
तुमची सर्वांची क्षमा मागून तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून लिहितोय, मला माफ करा पण हे महत्वाचे आहे. जे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही सर्व माझ्या भावासारखे आहेत. एक भाऊ म्हणून मला तुमची काळजी वाटतेय म्हणून लिहतोय.

कमाल आहे मित्रांनो तुमची ,
काहीही संबंध नसताना मोदी सरकारचे / काँग्रेसचे ब्रँड अँबेसडर म्हणून काम करतायेत,
कधी पोटतिडकीने काँग्रेसची बाजू तर कधी भाजपाची ! पण मित्रानो पुढार्यांनी त्यांना राजकारणाला वाहून घेतलंय रे, तुझं काय, तू कुठं आहेस ते बघ जरा, ते काल काँग्रेसमध्ये होते आज भाजपमध्ये आहेत, ते बदलताहेत, पण दुःख ह्याचं आहे की आपण आहे तिथेच आहोत रे..
मित्रानो तुम्ही देशात चाललेल्या घडामोडीवरच्या पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करत असता, आपल्या जवळच्या लोकांबरोबर वाद घालत असता ,

कोणती पार्टी कशी चांगली आहे आणि कोणती कशी बाद आहे,
जागतिक मंदी, देशातली बेरोजगारी, नोटबंदी, 370 कलम,

राज ठाकरेंची ईडीने कशी चौकशी केली आणि चिदंबरम यांच्या मागे ईडी कशी लागली आहे, निरव मोदी, माल्या, मेहुल चोक्सी, किंगफिशर कशी बुडाली जेटचे कशामुळे वाटोळे झाले आणि व्हिडिओकॉन दिवाळखोरीत निघाली वगैरे वगैरे . . . .मीडिया कशी कुणाच्या बाजूने बोलते. अंजनी दमानिया काय म्हणतात, पतंजलीच्या बालकृष्णाना एम्सला ऍडमिट का केले आणि मग ईव्हीएम की बॅलेट पेपर… एक ना अनेक विषयांमधला तुमचा सवंग अभ्यास मानला पाहिजे . पण …तुम्हाला काय मिळतं ह्या विषयांवर बोलून, काय मिळतं तुम्हाला हे करून.

तुझी काळजी वाटते रे..
जरा स्वतःच्या व्यवसायात नोकरीत कशी प्रगती करता येईल हे बघा, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची काळजी करा, त्यांच्या समस्या सोडावा, जीवनात कसे पुढे जाता येईल ते बघा, प्रगती कशी होईल ते बघा … देशात काल कांग्रेसवाले होते आज भाजपावाले आहेत उद्या आणखी कोणीतरी असेल, पण तुमचं काय ?

कालही तुम्ही तिथेच होतात आणि आजही तिथेच आहेत, पण उद्या…

“उद्या” तुमच्या हातात आहे रे …
बघा जमलं तर बदला स्वतःला, कारण ह्यातली कोणतीही चर्चा आणि लोकं तुमच्या कामाची नाहीत रे… कालही तुमचं सरकारी काम पैसे दिल्याशिवाय होत नव्हते आणि आजही परिस्थिती तीच आहे.. लोकांचे मत बद्दलण्यापेक्षा स्वतःला बदलता आलं तर बघ तुमचाच फायदा आहे त्यात.

तुमच्यावरच्या प्रेमापोटीच हा प्रत्रप्रपंच…

( हे पात्र काल्पनिक आहे , सोशल मीडिया वर वायरल होत आहे )


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.