स्वप्न ! आपल्या सर्वांचा किती आवडता शब्द आहे. दिवसभरात आपण किमान दहा, पंधरा वेळा तरी वापरत असू. आपण सर्व वेगवेगेळे स्वप्न बघतो, त्या स्वप्न रंजनात रमतो पण एकट्यात गेल्यावर घोळ होतो. बघितलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं अवघड होऊन जात. स्वप्न पूर्ण नाही झाले तर काय होईल म्हणून आपण भितो. अश्या काळात होतील रे स्वप्न पूर्ण, आपण काम केलं पाहिजे असा सांगणारा दोस्त असेल तर आपल्याला कोणाची गरज नाही. पण असा दोस्त नसेल तर मात्र आपल्याला माजी शिक्षण मंत्री डॉ पतंगराव कदमांचा संघर्ष माहिती असायला पाहिजे. ज्या वेळेस स्वतःवरचा विश्वास संपत जाईल ना ? त्या वेळेस पतंगराव कदमांच्या संघर्ष तुम्हाला विश्वास देतील, कि मित्रा घाबरायचं नाही..स्वतःवर विश्वास ठेव. तुझी पण स्वप्न पूर्ण होतील जशी माझी झाले..काम करत राहा…!
खिश्यात ३८ रुपये होते स्वप्न बघितलं विद्यापीठाचं..
जगातील सर्व यशस्वी माणसं मोठी झाली ती त्यांची दूरदृष्टीने आणि मोठे स्वप्न बघायच्या हिंमतीने. घरची श्रीमंती असल्यावर , वडील मोठे असल्यावर मोठे स्वप्न बघणे, त्यांचा पाठलाग करण खूप साधारण गोष्ट आहे. पण कोणतीही पार्शवभूमी नसताना मोठी स्वप्ने बघणे. त्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यासाठी मोठ्या हिंमतीची गरज लागते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पतंगराव कदम त्यांच्या भागातले मॅट्रिक पास होणारे पहिले विद्यार्थी होते. मॅट्रिक झाल्यावर पुण्यात आले. पुण्यात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि इथं टिकायचं असेल तर इंग्रजी आणि गणित आलं पाहिजे. पण गावातून आलेल्या पोरांना “ना चांगलं गणित जमत ना इंग्रजी”. पतंगराव पण त्यातलेच एक होते. असं म्हणतात गरज हि शोधाची जननी असते. इंग्रजी आणि गणित चांगलं करण्यासाठी काय करता येईल यासाठी पतंगराव आणि त्यांच्या मित्रांनी विचार केला आणि त्यातून आयडिया आली भारती विद्यापीठाची ! गावाकडून आलेल्या पोरांना इंग्रजी आणि गणित शिकवण्यासाठी पतंगराव विद्यापीठ सुरु करायचं ठरवत होते तेंव्हा त्यांचा मित्र त्यांना मस्करी करत म्हणाला होता, तुझ्या खिश्यात ३८ रुपये आहेत आणि स्वप्न बघत आहेस विद्यापीठाचे. जाऊद्या त्याला तरी कुठे माहिती असेल भारती विद्यापीठाचं भविष्य काय असेल.
३२ वर्षाच्या प्रवासानंतर भारतीला डीम विद्यापीठाचा दर्जा मिळाला.
मित्रांना बोलून दाखवलेला विद्यापीठाच्या विचाराने पतंगराव कदमांच्या डोक्यात जागा केली होती. काहीही झालं तरी विद्यापीठ सुरु करायचं त्यांनी निर्णय केला होता. १९६४ ला पुण्याच्या सदाशिव पेठेत पतंगराव कदमांनी भाड्याने एक खोली घेतली आणि भारती विद्यापीठाची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पतंगराव स्वतः विद्यार्थ्यांना शिकवायचे. पतंगरावांनी भारती मध्ये कमी पैशात चांगले शिक्षण द्यायला सुरु केले. काम चांगलं केलं कि ते वाढतच तसेच भारती विद्यापीठाचं देखील वाढलं. महाराष्ट्रातून विद्यार्थी भारती विद्यापीठात शिक्षणासाठी यायला लागले. शिक्षणाचा दर्जा आणि पतंगराव कदमांच्या प्रशासन कौशल्याने भारतीचा आलेख वाढत गेला. पुण्याच्या सदाशिव पेठेत एका खोलीत चालू झालेलं विद्यापीठ कात्रजच्या वीस-पंचवीस एकरात खूप कमी वेळात पोहचलं. भारती वाढत होत मात्र युजीसी कडून विद्यापीठाला मान्यता मिळत नव्ह्ती. शेवटी १९९६ ला स्थापनेच्या ३२ वर्षानंतर यूजीसीने भारती विद्यापीठाला डिम (अर्ध खाजगी )विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.
२३००० पेक्षा जास्त विद्यार्थी आज भारती विद्यापीठात शिकत आहेत.
पतंगराव कदमांनी भारती विद्यापीठ फक्त पुण्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही. एकूण नऊ शहरातमध्ये भारती विद्यापीठाचे महाविद्यालये आहेत. नवी मुंबई , दिल्ली , कराड , पाचगणी, सांगली , कोल्हापूर , सोलापूर , सातारा इत्यादी शहरात आहे. वैद्यकीय महाविद्यालय ,कायद्याचे शिक्षण देणारे महाविद्यालये , अभियांत्रिकी महाविद्यालये, फार्मसी महाविद्यालये भारती भारती विद्यापीठ चालवत. सर्व महाविद्यालयातील मिळून आज भारती विद्यापीठात २३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
९ मार्च २०१८ साली दीर्घ आजाराने पतंगराव कदम यांचं निधन झालं. सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन पतंगराव कदमांनी भारती सारखं विद्यापीठ उभा केलं. पंतगराव कदमांचं आयुष्य आपल्याला हेच सांगत कि आपण स्वप्न बघितली पाहिजे एक ना एक दिवस ती पूर्ण होतात.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !