फेब्रुवारी 3, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महाराष्ट्रातल्या बस बंद, मुंबईत मात्र आज पासून २४ तास बस चालू होतायेत..

महा मंडळाची लालपरी दिवाळी पासून बंद आहेत. सामान्य लोकांना बस नसल्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण सरकारला त्याचे काही पडले आहे असं काही वाटत नाही. नाही तर आता पर्यंत बस नसत्या का चालू झाल्या. चळवळीतले लोक कधी कधी म्हणतात, भारत आणि इंडिया हे दोन वेगळे देश आहेत. गोरगरीब लोकांचा भारत हा इंडिया पेक्षा खूप वेगळा. त्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि दुर्दैवाने सत्ता हि नेहमी इंडियातल्या लोकांकडे असते. तुम्ही म्हणाल मी हे का सांगतो आहे, तर त्याला कारण हे आहे कि मुंबईत आज पासून २४ तास बस सेवा चालू होत आहे..

नाईट लाईफ साठी तर २४ बस सेवा सुरु होत नाही ना ?

मुंबईत २४ तास बस चालू होते आहे खरं तर हि खूप चांगली गोस्ट आहे. रात्र पाळी काम करणाऱ्या लोकांना २४ तास बस सेवेचा फायदा होईल. महागाई प्रचंड वाढत असताना गरीब लोकांना थोडीशी मदत होईल. पण अनेक जण असं म्हणत आहेत कि २४ तास बस सेवा हा आदित्य ठाकरे त्यांच्या नाईट लाईफ प्रोजेक्टचा भाग आहे. मुंबई रात्र भर चालू असते. ती तशीच चालू राहावी म्हणून आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची संकल्पना चालू केली होती. रात्रभर मुंबई चालू राहिली तर उद्योग वाढतील अनेक लोकांना त्यातून रोजगार मिळेल. मुंबईची अर्थव्यवस्था वाढेल असं आदित्य ठाकरेंचं मत आहे तर ठाकरेंचे विरोधक आदित्य यांना त्यांच्या मित्रांसाठी नाईट लाईफ पाहिजे असल्याचा आरोप करत आहेत.

इतर महाराष्ट्रात किमान दिवसा तरी बस हवी कि नाही..

मुंबईत २४ बस सेवा सुरु केल्याने मुंबईत रोजगार वाढतील , अर्थव्यवस्थेला फायदा होईल पण मग इतर महाराष्ट्रासाठी सरकारचा वेगळा विचार आहे का ? ऑक्टोबर महिन्यापासून अख्या महारष्ट्रातल्या बस सेवा बंद आहेत. कामावर जाणाऱ्या लोकांना खासगी वाहनाने कामावर जावे लागत आहे. शाळेत जाणाऱ्या मुला -मुलींना शाळेत जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातली अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. राज्य सरकारने त्या कडे लक्ष दिले पाहिजे. मुंबईत तुम्ही किती वेळ बस सेवा देता , ती सकाळी देता का आणखी कधी चर्चेचा विषय नाही पण जर तुम्ही मुंबईत रात्री बस सेवा देत असाल तर इतर महाराष्ट्रात किमान दिवसा तरी द्या !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.