सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ओमायक्रोनने नेत्यांना टार्गेट केल्याचे दिसतय, सुळे पासून केजरीवाल सगळे बाधित झालेत.

Arvind Kejriwal tested positive

कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रोन भारतात मोठ्या प्रमाणामध्ये पसरत चालला आहे. ओमायक्रोनने राजकारणी लोकांना त्याच्या विळख्यात घेतले आहे. ओमायक्रोन एवढ्या नेत्यांना कस काय होतोय याची चर्चा होत आहे.

ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रोन एवढ्या लवकर जगभरात पसरेल वाटले नव्हते. पण कोरोनाने सुरुवातीपासूनच सगळयांना चकमा दिला आहे. सगळी काळजी घेऊन देखील आपले सरकार ओमायक्रोनला भारतामध्ये येण्यापासून रोखू शकले नाही. ओमायक्रोन वाढत आहे म्हणून त्याच्या बद्दल बोललं जातंय पण सोबत ज्या पद्धतीने ओमायक्रोन नेत्यांना होत आहे त्यामुळे भीती वाढत आहे. महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या नेत्यांना कोणालाही ओमायक्रोनने सोडले नाही. कोण आहेत ते नेते आणि का झाला त्यांना ओमायक्रोन समजून घेऊ.

महाराष्ट्रातील नेते आणि त्यांच्या कुटुंबातील लोक ओमायक्रोनच्या विळख्यात आलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंना पहिल्यांदा ओमायक्रोनची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या परिवारातील लोक देखील ओमायक्रोन बाधित झाले. सतत लोकांमध्ये असल्यामुळे आणि मुंबई सारख्या शहरात राहत असल्यामुळे त्यांना ओमायक्रोनची लागण झाली असावी. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील देखील कोरोना संक्रमित झाल्या आहेत. अंकिता पाटील यांचा एक आठवडा पूर्वी मुंबईमध्ये लग्न समारंभ होता. लग्नामध्ये अनेक लोकांना आमंत्रित केले होते. आमंत्रितांपैकी बरेच जणांनी कोरोना नियमांचे पालन केले नसल्यामुळे त्यांना ओमायक्रोनची लागण झाली आहे. भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे देखील ओमायक्रोन बाधित झाल्या आहेत.

उत्तर भारतातातील नेते पण ओमायक्रोन बाधित.

उत्तर प्रदेश, पंजाब सारख्या राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रचार सभा जोरात चालू आहे. कोरोना नियमांचे पालन त्यांच्या सभांमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला होता. बेजबाबदार वागण्यामुळेच उत्तर प्रदेशचे नेते अखिलेश यादव आणि त्यांची बायको खासदार डिम्पल यादव ओमायक्रोन बाधित झाल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पण ओमायक्रोनने गाठले आहे. पंजाबच्या निवडणुकीसाठी लाखो लोकांच्या प्रचार सभा केजरीवाल घेत आहेत. तिथेच त्यांना लागण झाल्याची शक्यता आहे.

नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे.

किमान भारतात तरी नेत्यांचं स्थान खूप आदरणीय असतं. लोक त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ते त्यांचे कर्तव्य आहे. कोरोना नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ओमायक्रोनचा धोका वाढत असताना देखील नेते त्यांचे कार्यक्रम घेत आहेत. त्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोक सहभागी होतात .कोरोना नियम पायदळी तुडवले जातात. त्यातून कोरोना पसरायला मदत होते. अशा कार्यक्रमामुळे राज्यावर संकट येत आहे. त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून तशी अपेक्षा आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.