फेब्रुवारी 3, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आमच्या आणि युक्रेन मध्ये याल तर इतिहासात झाला नसेल असा प्रतिकार करू !

डिसेंबर २०२१ च्या महिन्यात दोन लाख रशियन सैन्याने युद्धाला लागणारी हत्यारे घेऊन युक्रेनच्या सीमेवर पहारा द्यायला सुरु केला. रशियाचे असे अचानक वागणे सर्वाना अचंबित करणारे होते. रशिया युक्रेन वर हल्ल्याची तयारी करत असल्याच्या बातम्या येत होत्या. सैन्य मागे घेण्यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव होता. दबाव वाढल्यामुळे रशियाने सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली. पण धोका होता, जगाचे युक्रेन वरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हि टॅक्टिक वापरली. आज सकाळी पुतीन यांनी आम्ही युक्रेनवर हल्ला करत असल्याची माहिती दिली.

सुरेक्षेवरून रशिया युक्रेन मध्ये वाद सुरु झाला होता.

प्रसिद्ध वैज्ञानिक डार्विनने खूप आधीच सांगून ठेवले आहे कि “जो प्राणी फिट आहे तोच जगेल”. आपण किती जरी सांगत असलो कि माणसे खूप सुधारली आहेत बाकी प्रणयांपेक्षा माणसे वेगळी आहेत. पण हे खरं नाही, माणसांमध्ये पण जो फिट आहे तोच जगतो, कमजोर लोकांना थोडे मजबूत लोक मारून टाकतात. असंच काहीसं रशियाच्या युक्रेन हल्ल्या वरून समजतं. रशिया युक्रेनपेक्षा आकाराने आणि पैश्याने देखील खूप मजबूत आहे. त्यात हे दोघे शेजारी , शेजारी म्हंटल कि भांडणे होणारच. पण एक शेजारी मजबूत असेल तर तो त्या भांडणातून मजबूत असलेला फायदा घेतो. रशियाने पण तसेच केलं.

युक्रेनला नाटो ( NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION ) संघटनेत सहभागी व्हायचे होते. त्यासाठी नाटो मध्ये युक्रेनने अर्ज केला. युक्रेनने नाटो मध्ये सहभागी होणे रशियाला आवडले नाही. युक्रेन नाटो मध्ये सहभागी झाला तर युक्रेन रशियाच्या सुरक्षेला धोका ठरू शकतो असा रशियाचा आक्षेप होता. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अनेक प्रयत्न करून देखील युक्रेन ऐकत नाही असं दिसल्यावर रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केले. सैन्य तैनात करण्यामागे युक्रेनला नाटो पासून रोखणे हा उद्धेश होता.

क्रिमिया घेतल्यामुळे युक्रेनियन लोक रशियावर विश्वास ठेवायला तयार नाही.

१९९१ पर्यंत युक्रेन रशियन फेडरेशनचा भाग होता. १९९१ ला युएसएसआरचे ( UNION OF SOVIET SOCIALIST REPUBLICS ) विघटन झाले. त्याच वेळी युक्रेन पण स्वतंत्र झाले. युएसएसआर मधून वेगळे झालेल्या सर्व देशांवर रशियाचा प्रभाव होता. अनेक देशांवर आज देखील आहे. युक्रेन देखील त्याला अपवाद नव्हते. युक्रेनचे सरकार रशियाला आवडेल अशीच भूमिका घेत असे . पण २०१४ ला दक्षिणेला असलेले युक्रेनचे क्रिमिया नावाचे राज्य धोका करून रशियाने त्यांच्यात सामावून घेतले. क्रिमिया रशियाने घेतल्यामुळे युक्रेनियन लोक रशियावर नाराज आहेत. क्रिमिया गेल्यापासून युक्रेनवरचा रशियाचा प्रभाव संपला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केल्यामुळे युक्रेन रशियावर विश्वास ठेवायला तयार नाही.

अविश्वास आणि सवांद नसल्यामुळे युद्ध सुरु झालं

युक्रेन आणि रशियामध्ये क्रिमिया प्रकरणापासून वाद आहेत. एकमेकांवर विश्वास नाही आणि त्यात दोन्ही राष्ट्रांमधला संवाद देखील संपला होता. जिथे संवाद नसतो तिथे वाद वाढतात. रशिया आणि युक्रेन सोबत देखील तसेच झालं आहे. आज सकाळी रशियन अध्यक्ष पुतीन यांनी अधिकृत हल्ला करत असल्याचं जाहीर केलं.

रशियाची सैन्य ताकत बघता युक्रेनला हार मानण्याशिवाय पर्याय नाही. तेच त्यांच्या फायद्याचं आहे कारण रशिया सारख्या विशाल देशाला हरवणं युक्रेन सारख्या देशाला जमणार नाहि. पण युक्रेनच्या वतीने अमेरिका आणि नाटो संघटनेचे देश लढायला येऊ शकतात. जर अमेरिका आणि नाटो युक्रेनच्या बाजूने आली तर मात्र रशियाला युक्रेनवरचा हल्ला महागात पडू शकतो. त्यामुळेच रशियन राष्ट्राध्यक्ष यांनी हल्ल्याची माहिती देताना अमेरिका आणि नाटोला धमकी दिली आहे. कोणताही देश आमच्या आणि युक्रेनच्या वादात आला तर त्याचा आम्ही इतिहासात कोणीही केला नसेल असा प्रतिकार करू.

पुतीन यांनी धमकी दिली आहे पण अमेरिका आणि नाटो काय निर्णय घेतात यावर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भविष्य ठरणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.