सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अर्थ (Modi cabinet expansion 2021 latest news)

२०१४ ला पहिल्यादा सत्तेत आलेले मोदी यांनी आता त्यांचे सत्तेत सात वर्ष पुर्ण केली आहेत. त्याच्या पहिल्या मंत्रीमंडळात भाजपाचे जुने जाणते नेतेच होते. ते मंत्रिमंडळ भाजपाचे जास्त आणि मोदीचे कमी होते. पण आज सात वर्षीनंतर परिस्थिती पूर्ण बदलली आहे. २०१९ ला मोदी परत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत .आज खऱ्या अर्थाने भाजपा हा पक्षच मोदी पक्ष झाला आहे. भाजपाचे सर्वेसर्वा मोदी झालेत म्हटलं तर चूक होणार नाही.

२०१९ नंतर चे मंत्रीमंडळ !

खर तर मोदीजीनी, मोदी २.० च्या सुरुवातीलाच यांचे संकेत दिले होते की लोकांनी मतदान मोदीला केले आहे तर पुर्ण मंत्रिमडळ फक्त आणि फक्त त्यांच्याच इच्छेने असणार. खऱ्या अर्थांने आता भारतीय सरकार “मोदी सरकार ” २०१९ ला बनवलं गेलं. सर्व मंत्री त्यांच्या ऐकण्यातले अपवाद म्हणून फक्त नितिन गडकरी होते ज्यांना मोदी बदलू शकले नाहीत किंवा त्यांचं खातं सुद्धा बदलता आलं नाही. गडकरींचे संघ संबंधानी त्याना तारलं. नाही तर मोदीच्या मंत्री मंडळातले सुषमा स्वराज, अरूण जेटली, क्रिडामंत्री राठोड यांचे स्थान नाकारले होते, तर राजनाथ सिंगाना खात बदलून त्यांच्या जागी अमित शाह यांना होम मिनीस्टर बनवलं गेलं.

दोनच वर्षात मंत्रीबदल का ?

पहायला गेलं तर मोदीच्या नव्या टिमला दोनच वर्ष पुर्ण झाली आहेत आणि मोदीजींचा स्वभाव बघता ते सहज कुठल्याही दबावाला बळी पडत नाहीत. पण या वेळेस परिस्थितीच अशी झाली होती की काहीतरी बदल करणं सरकारला गरजेचं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारने ठीकठाक सामना केला. पण त्यानंतर वाढलेली बेरोजगारी, धंद्याची झालेले नुकसान याला मात्र सरकार सांभाळू शकलं नाही. आणि त्यात भर म्हणून की काय सरकार करोनाच्या दुसऱ्या लाटेला पण समजू शकलं नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा सामाना करण्यासाठी सरकार कसल्याही प्रकारे तयार नव्हते. परिणामी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात लोक मेले, गंगा नदीत शव वाहायला लागले होते. सरकारवर फक्त विरोधी पक्षच नाही तर जगभरातुन टिका होत होती. त्यात परत सरकारी लसीकरण सपसेल फसलं. कोरोनाची दुसरी लाट मोदींची परिक्षा घेत होती. ज्यात मोदी नापास झालेत म्हटलं तर चूक होणार नाही कारण सरकारनें व्यवस्थितपणे करोना हाताळला असता, योग्य नियोजन केलं असतं तर हजारो नागरिकांचे प्राण वाचू शकले असते. मोदीजीच्या राजकीय सुरूवाती पासूनच ते समाज माध्यमं हाताळ्यात माहीर आहेत, तीच त्यांची ओळख होती. त्याचमुळे ते रामजन्म भुमी चळवळीत अडवानी यांच्या बरोबरीन काम करत होते. त्याच अनुभवावर त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या टिकांचा सामना केला. सरकार स्थिर असल्याचा भास कायम ठेवला. पण त्यांना हा किल्ला एकट्याला लढावा लागेला बाकी साथीदार फार प्रभाव पाडू शकले नाहीत. मोदी धूर्त राजकारणी आहेत ते ओळखतात लोक सध्या जरी शांत असले तरी लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला विसरले नाहीत. लोकांमध्ये सरकार बद्दल प्रंचंड रोष आहे. झालेली चूक मोदींच्या लक्षात आलेली आहे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

नव्या गड्यांची निवड !

मोदी निडर आहेत, ते आपले निर्णय कोणाच्याही दबावात घेत नाहीत. याचा परिचय भारतीयांना या अगोदर वेळोवेळी आला आहे. मग ते कश्मिरच ३७० कलम हटवणं असेल नाहीतर नोटबंदी असेल. हीच प्रचिती या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात दिसतं आहे. जे मंत्री प्रभाव दाखवू शकले नाहीत त्यांना डच्चू दिलाय त्यात बंगाल चे बाबूल सुप्रियो, शिक्षणमंत्री पोखरियाल आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि धक्का म्हणजे रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर जे मोदीजींच्या जवळचे मानले जायचे त्यांना विश्राम दिलाय‌. अनेक जुन्या मंत्र्याना बढती पण दिलीय त्यात अनुराग ठाकूर, किरण रिजूजू, हरिदीप पूरी हे आहेत. या सोबतच विस्तारात वेगवेगळ्या राज्याच्या राजकारणाचा ही समतोलं साधण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यप्रदेश मधून सिंधीया यांना समाविष्ट केलंय ज्यांनी मध्यप्रदेशात भाजपा सरकार स्थापन करण्यात मोलाची भुमिका निभावली होती त्याची बक्षिसी त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्रातुन नारायण राणे यांना घेवून शिवसेनेचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केलायं. “सरकरी अपयश झाकण्यासाठी किंवा ती सुधारण्याचा प्रयत्न करत २०२४ साठी राजकीय समतोल साधण्यासाठी केलेला प्रयत्न असा या मंत्रिमंडळ विस्ताराचा अर्थ काढता येईल.”

-विष्णू बदाले
(लेखक स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक आहेत )

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.