सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नवाब मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप ?

आर्यन खानच्या केस पासून सुरु झालेली आरोप प्रत्यारोपांची माळ काही संपायचं नाव घेत नाहीये. नवाब मलिक-समीर वानखेडे यांचा वादाची एक फेरी पूर्ण झाल्यावर आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडवणीस यांच्यात नव्या आरोपांचा कलगीतुरा सुरु झाला आहे. दोघेही पत्रकार परिषेद घेऊन एकमेकांवर आरोप करत आहेत.

काय केले नवाब मलिकांनी आरोप ?

नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषेदमध्ये आरोप केला आहे कि २०१६ ला झालेल्या नोटबंदी नंतर मुंबईच्या बांद्रा कुर्ला मध्ये खोट्या नोटांच्या रॅकेट मध्ये सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे. मालिकांच्या आरोपानुसार ८ ऑक्टोबर २०१७ ला केंद्रीय पथकांनी मुंबईत १४.५६ कोटीच्या नकली नोटा सापडल्या होत्या, परंतु त्या केस मध्ये नोटांची रक्कम फडणवीसांच्या सांगण्यावरून १४.५६ कोटी वरून ८ लक्ष करण्यात आली असा आरोप मालिकांनी केला.

‘या नकली नोटांच्या प्रकरणाचा मुख्य आरोपी हा हाजी अराफत शेख यांचा भाऊ होता आणि याच हाजी अराफत शेखला फडवणीस यांनी महामंडळावर घेतलं होत.’ ते फडवणीस काळात अल्पसंख्याक महामंडळाचे प्रमुख होते.

DRI (DIRECTORATE OF REVENUE INTELEGENCE) ची भूमिका.

DRI ही एक केंद्रीय संस्था आहे जी आर्थिक गडबडी आणि घोटाळे रोखण्यासाठी काम करते. नवाब मलिक यांच्या आरोपांवर DRI ने स्पष्टीकरण दिले आहे कि DRI ने दिलेल्या माहिती नुसार हीं केस २०१७ च्या ऑक्टोबर मधील आहे आणि ह्यात त्यांना १० लाख रुपयांच्या नकली नोटा सापडल्या होत्या. या नकली नोटाच्या प्रकरणात तिघा जणांना अटक झाली होती. त्यातील एक आरोपी हाजी इम्रान अस्लम शेख हा अराफत शेख यांचा भाऊ आहे तर दुसरे दोघे हे महेश अलिमचंदानी आणि शिवाजी खेडेकर हे आहेत. DRI ला त्यांच्या कडून ५०० आणि २००० च्या नकली नोटा मिळाल्या होत्या

DRI ने ह्या प्रकरणाचे पुढे काय केले ?

DRI ज्या वेळेस नकली नोटा जप्त करते किंवा छापा टाकते तेंव्हा DRI ला केसची माहिती RBI (Reserve Bank of India), NIA ( National Investigation Agency ) आणि CBI ला देणं बंधनकारक असतं. DRI च्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी ह्या केसची माहिती ह्या तिनी संस्थांना दिली होती. हाजी इम्रान अस्लम शेख, महेश अलिमचंदानी आणि शिवाजीराव खेडकर यांच्यावरील खटला न्यायालयात प्रलंबित आहे. हे तिघेही सध्या जामिनावर आहेत. परंतु ह्या केस मध्ये हाजी इम्रान अस्लम शेख हा देवेन्द्र फडणवीसांच्या जवळचा असल्या मुळे सध्या फडवणीस अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.