सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पाथरीचा आमदार होणार विधानसभेचा नवा अध्यक्ष ?

suresh-wadpurkar

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून विधासभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. ज्या आमदारांना मंत्री पद मिळाले नाही ते काँग्रेसचे आमदार अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करत आहेत. या वेळेस मराठवाड्यातील पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नावाची जोरात चर्चा आहे.

नाना पटोलेंनी का सोडले होते अध्यक्ष पद ?

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद आले. नाना पटोलेंची अध्यक्ष म्हणून निवड झाली. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत नाना अध्यक्ष राहिले. आक्रमक चेहरा असल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने नाना पटोलेंना संघटनेमध्ये जबाबदारी दिली. बाबासाहेब थोरात यांच्या जागेवर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड करण्यात आली. पक्षाची जबाबदारी घेतल्यामुळे नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेंव्हा पासून काँग्रेसने नवीन अध्यक्षाची निवड केली नाही.

संख्या कमी असल्यामुळे वरपुडकर यांचे मंत्री पद हुकले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी आधी राष्ट्रवादी मधून सगळे नेते भाजप मध्ये जात होते. अशोक चव्हाण यांनी सुरेश वरपुडकर यांना मात्र काँग्रेसमध्ये आणले आणि पाथरी मतदार संघातून तिकीट दिले. भाजपचे आमदार मोहन फड यांचा पराभव करून सुरेश वरपूरकर विधानसभेत आले. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडले. महविकास आघाडीची स्थापना झाली. चार नंबरला असलेली काँग्रेस देखील सत्तेत आली. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या वाट्याला कमी मंत्री पदे आली. काँग्रेसने महत्वाच्या सर्व आमदारांना मंत्री केले. मंत्र्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक आमदारांना मंत्री होता आले नाही. त्यात पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर देखील होते.

ह्या वेळेस सुरेश वरपुडकरांची स्ट्रॉंग फिल्डिंग

मागच्या चार दशकांपासून सुरेश वरपुडकर परभणी जिल्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. परभणीची मध्यवर्ती बँक, परभणी महापालिकेमध्ये सुरेश वरपुडकर यांचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात संपलेल्या काँग्रेसला जिवंत करण्याचे काम आमदार सुरेश वरपुडकर यांनी केले आहे. ज्या प्रमाणात काँग्रेससाठी काम आमदार सुरेश वरपुडकर यांनी केले आहे त्या प्रमाणात सुरेश वरपुडकर यांना काँग्रेसने राज्यात संधी दिली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्वीकारले होते. त्यामुळे सुरेश वरपुडकर यांना राज्यात काम करण्याची संधी काँग्रेस देणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण आमदार सुरेश वरपुडकर यांच्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी लॉबिंग करत आहेत अशा पण बातम्या येत आहेत.
विधानसभा अध्यक्षपद परभणीच्या वाट्याला द्यावे म्हणून अशोक चव्हाण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ह्या वेळेस सुरेश वरपुडकर यांचे पारडे बाकी आमदारांपेक्षा जड आहे. २८ डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. तेंव्हा काँग्रेस सुरेश वरपूरकर यांना संधी देते कि आणखी दुसराच आमदार बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.