सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

राहुल गांधी ते प्रशांत किशोर यांच्यावर पाळत ठेवणारा पेगासस काय आहे ?

राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, प्रशांत किशोर त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन मंत्री यांची नवे पेगासस स्पायवेअरच्या साहाय्याने पाळत ठेवण्यात आलेल्यांच्या यादीत आल्याने एकच खळबळ उडाली. पत्रकार तसेच मानवी अधिकार कार्येकर्ते यांच्यावरही मोदी सरकारने पाळत ठेवल्याचे पुरावे The Wire या न्युज पोर्टलने उजेडात आणले. नेमकं पेगासस स्पायवेअर काय आहे आणि ते कसं काम करतं हे आज जाणून घेऊया.

काय आहे पेगासस सॉफ्टवेअर?

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. स्मार्टफोनवर हल्ला करणारे सर्वात अत्याधुनिक स्पायवेअर असे या सॉफ्टवेअरचे वर्णन केले जाते. हे इस्रायलच्या NSO या कंपनीचे उत्पादन आहे.

कसे काम करते हे सॉफ्टवेअर?

पेगाससची सुरवातीची आवृत्ती २०१६ मध्ये सापडली होती. जी Spear – phishing ने काम करत होते. म्हणजेच एखादा मेसेज किंवा इमेल ज्यामध्ये पेगाससचा कोड असतो तो मोबाईलवर पाठवला जायचा आणि त्यावर क्लिक केल्यांनतर हा स्पायवेअर इन्स्टॉल होतो. यानंतरही NSO कंपनीने पेगाससला अत्याधुनिक बनवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. आता पेगासस Zero – Click हल्ला करण्यापर्यंत प्रभावीक्षम झाला आहे. Zero – Click म्हणजे मोबाईल वापरकर्त्याने कोणताही क्लिक केला नाही तरीही ते मोबाईलवर इन्स्टॉल होते. हे बऱ्याच वेळा Zero – Day असुरक्षितता म्हणजेच मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टिम मधील त्रुटी ज्या मोबाईल फोनच्या निर्मात्यासही माहित नाही अशा त्रुटींचा हल्ला करण्यास उपयोग करून घेते.

एकदा सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले कि मग मात्र अक्षरशः धुमाकूळ घालते. मोबाईल मधील सर्व माहिती एसएमएस, ई-मेल, व्हाट्स अँप मेसेजेस, फोटो, व्हिडिओ कॉल ही सर्व माहिती हल्ला करणारा वापरकर्त्याच्या मोबाईल मधून काढून घेऊ शकतो. अगदी मोबाईलचा कॅमेरा चालू करून रेकॉर्डिंगही करू शकतो. थोडक्यात काय तर आपल्या फोनची सर्व माहिती हल्लेखोरास मिळते. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम या स्पायवेअरसमोर कमकुवत आहेत. या दोन्ही फोनमध्ये जेवढे बदल वापरकर्ता करू शकतो त्यापेक्षा जास्त बदल पेगाससने करता येऊ शकतो.

(चित्र स्वरूपात स्पायवेअर कसा मोबाईल मध्ये इन्स्टॉल केला जातो आणि माहिती काढून घेतली जाते हे वरील प्रतिमेत दाखवले आहे)

पेगासस स्पायवेअर कोणाला विकत घेता येतो?

NSO हा ग्रुप फक्त देशांच्या सरकारबरोबरच काम करतो. जगभरातील जवळपास ६० देश यांचे ग्राहक आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे अत्याधुनिक तंत्रज्ञान देशांना ‘राष्ट्रीय सुरक्षेला’ धोका असणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आहे.

पेगाससची किंमत किती आहे?

पेगासस हे परवाना (License) पद्धतीने विकले जाते. प्रत्येक परवान्याची किंमत ही कॉन्टॅक्टवर अवलंबून असते. एका परवान्याची किंमत ७० लाखापर्यंत असू शकते. २०१६ मध्ये दहा लोकांवर पाळत ठेवण्यासाठी NSO ग्रुप ९ कोटी रुपये पर्यंत पैसे आकारत असे. २०१६ च्या दरपत्रकानुसार कंपनी १० उपकरणे हॅक करण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपये आणि इंस्टॉलेशनसाठी ४ कोटी रुपये घेते. साहजिकच आहे एवढं मोठं बजेट हे फक्त सरकारकडेच आहे.

सरकारने हेरगिरी केलेल्यांची यादी वाढतच आहे. जनतेने कररूपाने दिलेला पैसे हा लोकशाही खिळखिळी करण्यासाठी कसा वापरला गेला हे आपण पुढील लेखात पाहूया.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.