सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नवनिर्माण करायचं सांगणारे राज ठाकरे अचानक हिंदुत्ववादी का होत आहेत ?

गुढीपाडव्याच्या सभेनांतर हे स्पष्ट झालं आहे की राज यांनी आता हिंदुत्वचा रस्ता धरला आहे. २००६ ला शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवंनिर्माण सेना काढलीं. विकासाच , प्रगतीच राजकारण करण्यासाठी म्हणून हा पक्ष काढला असल्याचं ते सांगत. “माझ्या पक्षात काम करणारा कार्यकर्त्याच्या घरच्यांना अभिमान वाटेल अशी संघटना करण्याची राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला स्वप्ने दाखवलीं होती.
पण राजकारणात काय होईल सांगता येत नाही. नेते आज जी भूमिका आहे ती उद्या ठेवतील याची शास्वती देता येत नाही. राज ठाकरे यांनी देखील त्यांची पारंपरिक विकसाची भूमिका सोडून सध्या हिंदुत्व हाती घेतलं आहे. विकास, प्रगती याविषयी बोलणारे राज अचानक हिंदुत्ववादी होत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज यांची भूमिका समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्यांचा प्रवास समजुन घ्यावा लागेल. त्याशिवाय हा सगळा विषय काय आपल्याला समजणार नाही.

शिवसेनेत घुसमट होत आहे म्हणून नवा पक्ष

बाळ ठाकरे यांच्या यांच्या सोबत राज ठाकरे खूप आधीपासून दिसायचे. बाळ ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण १९९० च्या दशकात बाळासाहेब यांचा मुलगा उद्धव राजकारणात आले. उद्धव यांच्या येण्यामुळे शिवसेनेत राज आणि उद्धव यांचे वेगळे गट पडले.  पक्षाकडून उद्धव यांना झुकतं माप मिळतं गेलं असं शिवसेनेचं राजकारण लिहणारे पत्रकार सांगतात. राज यांची पक्षात घुसमट चालु झाली होती. अखेर २००५ ला राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय केला. शिवसेनेत आपल्यावर अन्याय होत होता म्हणून आपण शिवसेना सोडत असल्याचं राज यांनी सांगितलं होत. शिवसेना सोडल्यावर ६ मार्च २००६ ला राज ठाकरेंनी नवा पक्ष काढला. शिवसेनेच्या पारंपरिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत त्यांनी विकसाचा मार्ग निवडला. शिवसेनेच्या हिंदुत्वाला विकासच्या मुद्द्याने मात करू अस राज ठाकरे सांगत.

राज यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला पण तो टिकला नाही

पक्ष स्थापन केल्यावर राज यांना राज्यातल्या युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. राज यांचे विकासाचे राजकारण राज्यातल्या जनतेला आवडलं होत.  अगदी थोड्या वेळात राज यांचा मनसे राज्यात पोहचला होता. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत तो प्रभाव पाहायला मिळाला. तीन वर्ष आधी स्थापन झालेल्या राज यांच्या पक्षाचे विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आले होते. फक्त तीन वर्षात राज यांनी मोठी मजल मारून दाखवली होती. देशभरात राज ठाकरेंचे कौतुक झाले होते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज यांना नाशिक महापालिकेत देखील सत्ता मिळाली. नाशिक महपालिकेत राज ठाकरे विकास करून दाखवतील अशी सर्वांना अपेक्षा होती. पण राज यांचा सुवर्णकाळ नाशिक महापालिकेच्या नंतर संपला की काय असाच त्याचा प्रवास झाला आहे.  २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत राज यांचा प्रभाव संपला. पाच वर्षात राज यांना जनतेने नाकारलं. १३ वरून मनसेचा एकमेव आमदार निवडून आला.  २०१४ नंतर राज यांचा आलेख काही वाढला नाही. आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत देखील त्याच्या पक्षाला फक्त एकच jaजागा मिळाली. राजू पाटील हे एकमेव मनसेचे सध्या आमदार आहेत. नवीन पक्ष स्थापन केल्यावर जनतेने राज यांच्या वर विश्वास दाखवला होता. पण तो त्यांना कायम ठेवता आला नाही अस जाणकार सांगतात. 

शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेल्याने राज यांचा रस्ता मोकळा झाला.   

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकिय बदल झाले. एकेकाळी भाजप सोबत युतीत असलेली शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा सोबत गेली. राज्यात महविकास आघाडी नावाचा राजकिय प्रयोग झाला. उद्धव ठाकरे महविकस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.  हिंदुत्ववादी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत गेल्याने राज्यात हिंदूत्ववादी राजकारणात स्पेस तयार झाली होती. राज यांनी लगेच ती जागा घ्यायची तयारी दाखवली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. राज यांची तेंव्हापासून त्या दिशेने वाटचाल चालु आहे. पण मधल्या काळात कोरोना आल्यामुळे राज्यात सर्व राजकीय हालचाली बंद झाल्या होत्या.
दोन वर्षाच्या कोरोणा काळानंतर राज्य पूर्व पदावर आले आहे. त्यामूळे राज यांनी स्वतः आघाडी घेत राज्यात राजकारण तापवले आहे. शिवसेनेला पहिल्या सारखं हिंदुत्व वापरता येणार नाही हे राज यांनी ओळखलं आहे. त्यामुळे ती जागा घेण्याचा प्रयत्न राज करत आहेत. विकासाचा मुद्दा वापरून राज यांना राज्यात मत मिळाली नाहीत. त्यामुळे ते बाळासाहेब ठाकरे यांचा फॉर्म्युला वापरत आहेत अस जाणकार सांगत आहेत. शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही पण त्यांना पूर्वी सारखं त्याचा वापर करता येणार नाही हे वास्तव आहे.
देशात भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत आणि जिंकत आहे. पण राज्यात त्यांना शिवसेने शिवाय हिंदुत्वाचा राजकारण करणं सोप असणारं नाही. म्हणून भाजप देखील राज यांच्या कडे लक्ष ठेवून आहे. राज यांना देखील राज्यात शिवसेनेची जागा घ्यायची आहे. राज ठाकरेंचं राजकरण फॉलो केलं तर आपल्याला लक्षात येईल की राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे होण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंना जनतेने सत्ता दिली तशी राज यांना जनता संधी देते का हे येणाऱ्या काळातच समजेल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.