सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आधी एनडीए आणि आता महाविकास आघाडी मधून राजू शेट्टी बाहेर का पडले ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालून त्यांचं वाटोळं करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. महाविकास आघाडी सोबतचे सर्व संबंध तोडत असून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून आपलं नाव वगळावं यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सांगणार असल्याचं राजू शेट्टीने कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
कोल्हापूरच्या भाषणात राजू शेट्टी भावनिक होऊन म्हणाले, माझी झोळी अजून फाटलेली नाही. शेतकरी माझ्यामागे ठाम उभे आहेत. राजकारण हा माझा धंदा नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अटीवर आम्ही सरकारला मदत केली, पण दोन्ही सरकारकडून आमची फसवणूक झाली.”

आक्रमक शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा गेल्या काही काळातला एकूण राजकीय घडामोडी बघता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेट्टी याचं राजकारणातील स्थान डळमळीत झालं आहे असं वाटत आहे. एकीकडे कोणत्याही सरकारसोबत जुळवणं शक्य होत आणि पक्षातील एकमेव आमदार देवेंद्र भुयार याची पण हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आक्रमक शेतकरी नेते अशी ओळख असलेल्या राजू शेट्टी यांची संघटना कमजोर झाली आहे.

शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून वेगळं होत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर आजपर्यत वेगवेगळ्या पक्षांशी जवळीक केल्याने आधी भारत भालके, मग सदाभाऊ खोत आणि आता देवेंद्र भुयार या संघटनेतल्या नेत्यांची शेट्टी यांनी पक्षातून हकालपट्टी केली.

स्वतः राजू शेट्टी यांचा 2019 मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून मोठ्या मताने पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये शेट्टी यांचं नाव आहे, पण या आमदारांच्या यादीवर आजपर्यंत राज्यपालांनी सही केली नाहीये. त्यामुळे राजू शेट्टींकडे कोणतेही पद उरले नाही. राजू शेट्टी संघर्ष करणारे नेते आहेत पण त्यांच्या राजकीय तडजोडीना यश येताना दिसत नाहीये.

शेतकरयांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून सरकारमधून बाहेर

 “2019च्या पराभवानंतर शेट्टी यांचं महत्त्व कमी झालंय. पण 2019 मध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणात झालं त्याचा फटका राजू शेट्टी यांना बसला आणि ते पाहिल्यान्दा हरले. २०१४ पासून २०१९ प्रयत्न राजू शेट्टी भारतीय जनता पक्षासोबत युतीत होते. केंद्रातील मोदी सरकार शेतकरयांचे प्रश्न सोडवेल अशी त्यांची अपेक्षा होती पण मोदी सरकारकडून शेट्टींचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकी आधीच त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली.

“महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काही काम करता येईल यासाठी त्यांनी या सरकारला पाठिंबा दिला. पण इथंही पदरी निराशा पडल्याने शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडले.

‘चळवळीचं महत्त्व कमी झाल्याने युतीचे निर्णय घ्यावे लागले

राजू शेट्टीनी शेतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर राज्य सरकारकडून समाधान कारक तोडगा निघाला नाही. शेतकरी प्रश्नावर अनेकांना कळवळा वाटतो तसं ते दाखवतातही पण प्रत्यक्षात निर्णय घेत नाहीत. त्यामुळे शेट्टी बाहेर पडले असं शेट्टींना कव्हर करणारे पत्रकार सांगतात.
“शेट्टी यांना हा अनुभव दोन्ही वेळा आला आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत जवळीक केली. त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असमाधानी असल्यानं शेट्टी तिथून बाहेर पडले होते. .
2014 साली भाजपसोबत जवळीक आणि 2019 नंतर मोदी विरोधी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकार सोबत एकत्र येणं अशा भूमिकांमुळं राजू शेट्टी यांचं राजकीय स्थान अस्थिर झालंय पण राजू शेट्टींचे कार्यकर्ते आज देखील त्यांची बाजू घेत आहेत. ते म्हणतात “राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी भूमिका बदलाव्या लागतात. 2009 सालापर्यंत शेट्टी चळवळीच्या ताकदीवर यश मिळवत होतं. पण नंतरच्या काळात इतर पक्षांशी जवळीक केल्याने चळवळीचं महत्त्व कमी झालं आणि त्याचा फटका बसून ही संघटना अस्थिर झाली.”

राजू शेट्टी यांच्या चळवळीचे भविष्य सध्या खूप अंधारात दिसतं आहे. राजू शेट्टी यांचा स्वभाव आक्रमक असल्यामुळे ते पुन्हा संघटना उभी करतील याचा विश्वास अनेक लोकांना आहे. पत्रकारांना बोलताना राजू शेट्टी म्हणाले होते , कि शेती वाया गेली , आपण केलेल्या मेहनतीला यश नाही मिळालं म्हणून शेती सोडणर्यातला मी नाही. मी नव्याने संघटन उभी करेल”.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.