सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

‘८३’ च्या ट्रेलरचा धमाका ! (83 Movie trailer review)

‘८३’ ट्रेलर : १९८३ ला भारतीय क्रिकेटने भारताचा पहिला वर्ल्ड कप जिंकला. बलाढ्य अश्या वेस्ट इंडिजच्या टीमला भारताने इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर हरवले. १९८३ च्या या ऐतिहासिक घटनेवर दिग्दर्शक कबीर खानने चित्रपट बनवला आहे.

एक वर्षापासून चाहते ज्याची वाट पाहत होते त्या ‘८३’ चा पहिला ट्रेलर ३० नोव्हेंबरला युटयूब वर आला. १९८३ ची भारतीय क्रिकेट टीम, त्यांचे वर्ल्ड कप मधील प्रदर्शन आणि भारताने वर्ल्ड कप जिंकल्याचा क्षण, आपल्या टीमचा कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणारा रणवीर सिंग..हे सगळं ट्रेलर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलर एकदम रोमांच उभा करणारा आहे.

ट्रेलर मध्ये दाखवलं आहे कि भारतीय संघ १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये फारसा चांगला प्रदर्शन करू शकला नव्हता. परंतु सुरुवातीच्या प्रदर्शनावर मात करत भारतीय संघाने दुसऱ्या सत्रामध्ये मात्र प्रदर्शन वेगळया उंचीवर नेले. हे दृश्य ट्रेलरमध्ये बघणे एकदम रोमांचकारी आहे.
ट्रेलर मध्ये भारत आणि वेस्ट इंडिजची स्पर्धा आजच्या भारत पाकिस्तान सारखी दाखवली आहे. त्या वेळी वेस्ट इंडिजचा संघ जगात सर्वोत्कृष्ट होता तरीही भारताने त्यांच्यावर मात करून १९८३ चा वर्ल्ड कप जिंकला.

‘८३’ मध्ये रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारत आहे तर कपिल देवच्या बायकोची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहे. त्यामुळे हा रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी डबल धमाका आहे.
‘८३’ मध्ये रणवीर आणि दीपिका सोबतच पंकज त्रिपाठी, आदिनाथ कोठारे, साहिल कट्टर, अमय विरक, चिराग पाटील अशी तगडी स्टार कास्ट आहे.

‘८३’ हा चित्रपट २०२० मधेच प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला. आता तो येत्या २४ डिसेंबरला हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम मध्ये देश आणि विदेशांत प्रदर्शित होणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.