टेक संबंधी महत्वाच्या चार बातम्या खालीलप्रमाणे
१) रियल मी चे नवीन ब्रँड लवकरच पाहायला मिळणार.
रियल मी कंपनीने मे २०१८ मध्ये त्यांचा पहिला मोबाईल लॉन्च केला होता जो रियल मी वन या नावाने होता. ओप्पो या कंपनीचा एक ब्रँड म्हणून लॉन्च झाला होता. शाओमीच्या रेडमी मोबाईल सोबत स्पर्धा करण्यासाठी हा मोबाईल बाजारात आणला गेला होता. यांनतर रियल मी ने मध्ये सुद्धा एक सब ब्रांड लॉन्च केला गेला ज्याला नार्झो हे नाव दिले गेले. हा ब्रँड तरुण लोकांना आकर्षित करण्यासाठी लॉन्च केला गेला, ज्यामध्ये गेमिंग प्रोसेसर, चांगली बॅटरी, उत्तम किंमत आणि आकर्षक रचना होती. या ब्रॅण्डचा रियल मी ला फायदा सुद्धा झाला. आता रियल मी डीझो हा सब ब्रँड घेऊन येत आहे. लवकरच भारतामध्ये हा मोबाईल लॉन्च होणार आहे. हा ब्रँड कशावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार याची माहिती लवकरच कळेल. या ब्रँड नावाने मोबाईल व इतर कंजूमर इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा लॉंच केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
२) क्रिएटेरर्ससाठी युट्युबची मोठी अपडेट
यूट्यूब ने त्यांची पॉलिसी अपडेट केली आहे यासंबंधी ईमेल सर्व युट्युब क्रियेटरला त्यांनी मेल केले आहे. यामध्ये सर्वात महत्वाची अपडेट हि आहे की युट्युब वरील सर्व व्हिडिओवर आता जाहिराती लावणार आहे. ही बातमी ऐकून बऱ्याच जणांना फार आनंद होत असणार की जे यूट्यूबच्या जाहिरातीसाठी पात्र नाही त्यांच्या व्हिडिओ वर सुद्धा जाहिराती पाहायला मिळणार पण याची कमाई त्यांना मिळणार नाही ती पूर्ण कमाई युट्युब कडे जाणार. म्हणजे सर्व पूर्वी सारखेच असणार तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत पण तुमच्या व्हिडिओ वर जाहिराती मात्र नक्कीच येणार. ह्याबद्दल स्पष्टीकरण देताना युट्यूब सांगितलं की आमच्याकडे असं करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते आम्ही लवकरच करणार आहोत. एक जून पासून हि अपडेट पाहायला मिळणार.
३) रेडमीचे दोन नवीन लॅपटॉप भारतामध्ये होणार लॉन्च.
मागच्या वर्षीपासून मोबाईल लॅपटॉप यांची खरेदी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑनलाईन शिक्षण असो की ऑनलाईन काम सगळ्यांना लॅपटॉप व मोबाईलची गरज ही जास्त भासत आहे. हेच पाहता बऱ्याच कंपन्यांनी आपले नवीन नवीन लॅपटॉप मागच्या वर्षी बाजारात उतरवले. त्याचप्रमाणे शाओमीने त्यांचे लॅपटॉप मागच्या वर्षी भारतामध्ये लॉन्च केले. या लॅपटॉप कडून फार जास्त अपेक्षा होती मात्र भारतामध्ये लॉन्च झाल्यावर किंमत ही जवळजवळ प्रतिस्पर्धी लॅपटॉप इतकीच होती. सुरुवातीला शाओमी लॅपटॉप बाजारात येणार या बातमीने लोक फार आनंदी होते कारण की स्वस्त आणि मस्त लॅपटॉप मिळेल असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं पण ते काही झालं नाही. मात्र आता शाओमीचा सब ब्रँड रेडमी भारतामध्ये दोन नवीन लॅपटॉप लॉन्च करणार आहे. रेडमी बुक प्रो १४ आणि रेडमी बुक प्रो १५ हे दोन लॅपटॉप लॉन्च होण्याची शक्यता आहे. १४ व १५ इंची डिस्प्ले स्क्रीन सोबत येतील, व त्याच प्रमाणे यांची किंमत सुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे. तर आता वाट फक्त याची आहे की यांची किंमत किती राहणार ? हे लॅपटॉप नक्कीच चांगले असतील मात्र भारतीय बाजारात लॅपटॉप ची किंमत कमी होण्याची गरज आहे.
४) जिओ वाढवणार भारताची इंटरनेट क्षमता
जिओने त्यांच्या महत्त्वकांक्षी सबमरीन सी केबल प्रकल्प जाहीर केला आहे. हा भारताचा सगळ्यात मोठा असा सबमरीन केबल प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प भारताची इंटरनेट क्षमता वाढवणार आहे असं जीओकडून सांगण्यात येत आहे. या सबमरीन केबलची लांबी सोळा हजार किलोमीटर इतकी असणार आहे. यासोबतच भारतामधील बँडची क्षमता ही २०० टेरा बाईटने वाढणार आहे, असा अंदाज आहे. हि एक फार महत्वाची बातमी जिओ कडून येत आहे. येत्या काळात गरज वाढतच जाणार आहे आणि योग्य वेळी जीओने त्यांचा हा प्रकल्प जाहीर करून ही गरज आता पूर्ण होणार आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !