टी-२० विश्वचषकाच्या अगोदरच विराट कोहलीने आपण भारतीय क्रिकेट टीमच्या टी-२० च्या कर्णधार पदावरून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने रोहित शर्माची टी-२० क्रिकेट साठी भारतीय टीमचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी विराट कोहली तर टी-२० क्रिकेटसाठी रोहित शर्मा कर्णधार असतील असे वाटतं होते. पण काल भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. बोर्डाने एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा ‘रोहित शर्मा’ कडे दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतरही भारतीय संघाच्या एकदिवसीय क्रिकेट साठी रोहित शर्माच कर्णधार असल्याचं क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं आहे.
विराट कोहलीची एकदिवसीय कारकीर्द
२०१७ ला महेंद्र सिंग धोनीने एक दिवसीय क्रिकेटच्या कर्णधार पदावरून राजीनामा दिल्यावर विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघाचाही कर्णधार झाला. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार आहे. विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघ ९५ सामन्या पैकी ६५ वेळा जिंकला आहे. विराट कोहलीचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड महेंद्र सिंग धोनी आणि कपिल देव यांच्यापेक्षा जास्त आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७० % सामने जिंकायचा. धोनी कर्णधार असताना तो आकडा ५८ % होता तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५४ % सामने जिंकायचा. विराट कोहलीचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड खूप चांगले आहे पण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ मोठ्या ट्रॉफी जिंकू शकला नाही. २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारत पाकिस्तान बरोबर फायनल मध्ये हरला. २०१९ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ सेमीफाइनला न्यूझीलंड सोबत हरला आणि २०२१ च्या टी-२० च्या वर्ल्ड कप मध्ये भारत अंतिम दोन संघांमध्ये देखील पात्र झाला नाही.
विराट कोहली वर्ल्ड ट्रॉफी जिंकत नसल्यामुळे त्याने कर्णधार पद सोडावे म्हणून त्याच्यावर दबाव वाढत होता. रोहित शर्मा कडे कर्णधार पद देण्याची वेळ आली असल्याचं मत पूर्व क्रिकेटर गौतम गंभीरने देखील मांडले होते.
रोहित शर्मा जिंकेल का वर्ल्ड कप ?
२०११ च्या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माची निवड झाली नव्हती. भारतीय संघामध्ये निवड नाही झाल्यावर रोहित शर्माने ट्विट केले होते त्या ट्विटची आता चर्चा होत आहे.
२०११ साली संघात निवड न झालेला रोहित २०२३ च्या वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाच्या कर्णधार असणार आहे. रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधार पद जास्त काळं सांभाळ नाही. विराट कोहली नसताना रोहित कडे कर्णधारपद यायचे. रोहित शर्माचा आय पी एल मधील रेकॉर्ड भारी आहे. २०१३ पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार आहे. रोहित शर्मा नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा आय पी एल ची ट्रॉफी जिंकली आहे. शांत स्वभावाच्या रोहित शर्माची त्याचे चाहते महेंद्र सिंग सोबत तुलना करतात. २०११ ला सत्तावीस वर्षा नंतर भारताने एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला तसाच २०२३ मध्ये होणार वर्ल्ड कप रोहित शर्मा भारताला जिंकून देईल का बघणे मजेदार असणार आहे. रोहितने ज्या प्रकारे आयपीएलच्या ट्रॉफीज जिंकल्या आहेत तसेच जर वर्ल्ड कप भारतासाठी जिंकला तर भारतीय क्रिकेटचे रोहित पर्व सफल होईल.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !