सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलसिंकी यांनी व्लादिमिर पुतिनची तक्रार रशियन नागरिकांकडे केलीयं !

आता पर्यंत तुमच्या पर्यंत बातमी आली असेलच कि रशियाने युक्रेन वर हल्ला केला आहे म्हणून. सकाळपासून रशियाने पूर्व युक्रेनचा मोठा भाग बळकावला आहे. हल्ला रशियाने केला आसल्यामुळे युक्रेन खूप पिछाडीवर आहे. रशियाचा हल्ला युक्रेनच अस्तिव संपवू शकतो. त्यामुळे संपूर्ण युक्रेन भीतीच्या छायेत आहेत.

रशियाने देशावर हल्ला केला आहे याची बातमी देण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलसिंकी यांनी देशाला संबोधित केलं आहे. त्यात त्यांनी रशियन नागरिकांना सुद्धा युद्ध थांबवण्याचे आव्हान केलॆ आहे. व्लादिमिर पुतीन यांच्या मुळे युरोप खंडावर मोठे संकट आल्याचे देखील झेलसिंकी यांनी रशियन नागरिकांना सांगितले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलसिंकी त्यांच्या भाषणात म्हणतात , आज मी व्लादिमिर पुतीन यांच्याशी फोन वर बोललो. त्यांच्या बोलण्यात मला काहीही सकारात्मकता जाणवली नाही. त्यांचे युद्ध करण्याचे इरादे जाणवत होते. त्यामुळे मी आज तुमच्याशी म्हणजे रशियन नागरिकांशी सवांद करण्याचा निर्णय केला आहे. युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलतोय.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुमारे २००० किमीची सीमा आहे. तुमचे २०००० लाख सैन्य आमच्या सीमेवर आहे. तुमच्या अध्यक्षानी सैन्याला आमच्या युक्रेनवर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. मला वाटत नाही कि रशियन नागरिक युद्धाला सर्मथन देत असतील. पण जर रशियन सैन्य आमच्या देशात आले, आमच्या देशाला तोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हाला प्रतिकार करावा लागेल. आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण आमच्या देशाला आम्ही वाचवू. व्लादिमिर दिमिर पुतीन यांच्या आदेशाने युरोप खंडावर मोठे संकट आले.

युद्ध ही स्वतः एक मोठी आपत्ती आहे आणि त्या आपत्तीची मोठी किंमत आहे. युद्धामुळे लोक पैसा, प्रतिष्ठा, जीवनाचा दर्जा गमावतात, स्वातंत्र्य गमावतात. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की लोक त्यांच्या प्रियजनांना गमावतात, ते स्वतःला गमावतात.

व्लादिमिर पुतीन यांनी तुम्हाला सांगितले की युक्रेन रशियासाठी धोका निर्माण करत आहे. युक्रेन रशियासाठी भूतकाळातही धोका नव्हता , वर्तमानातही नाही , भविष्यातही असे होणार नाही. तुम्ही नाटोकडून सुरक्षेची हमी मागत आहात,पण आमच्या युक्रेनच्या सुरक्षेचं काय ?

युक्रेनमधील शांतता आणि युक्रेनियन लोकांची सुरक्षा हे माझे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासह कोणाशीही, कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत. व्लादिमिर पुतिन सरकार आमच्या कडून सुरक्षेची हमी मागतआहे , मी कुठल्याही मंचावर त्यांच्या सोबत चर्चा करायला तयार आहे. पण त्यांची तशी इच्छा दिसत नाही. पण एक लक्षात असू द्या युद्धामुळे नुकसान कोणाचे होणार आहे सामान्य लोकांचे. त्यामुळे युद्ध रोखण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. मला खात्री आहे तुम्ही पुढाकार घ्याल.

मला माहित आहे की व्लादिमिर पुतीन सरकार माझ भाषण रशियन टीव्हीवर दाखवणार नाहीत, परंतु रशियन लोकांना ते पाहावा लागेल. त्यांना सत्य माहित असणे आवश्यक आहे आणि सत्य हे आहे की आता थांबण्याची वेळ आली आहे, खूप उशीर होण्यापूर्वी. जर रशियन नेते शांततेसाठी आमच्याबरोबर टेबलवर बसू इच्छित नसतील तर कदाचित ते तुमच्याबरोबर टेबलवर बसतील. रशियन लोकांना युद्ध हवे आहे का ? म ला उत्तर जाणून घ्यायचे आहे. परंतु उत्तर फक्त तुमच्यावर अवलंबून आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.