सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

जब वी मेट ज्यांच्या गाण्यांमुळे गाजला ते राशीद खान पद्मभूषणाने सन्मानित झाले

rashid khan information in marathi

जब वी मेट हा बऱ्याच लोकांसाठी असा चित्रपट आहे कि लोक स्वतःच्या आयुष्याला यात जास्त पाहतात. खूप जणांच्या काळजाचा विषय म्हणजे हा चित्रपट. करिना कपूर शाहिद कपूर या जोडीला लोकांनी खूप प्रेम दिलं. कथेबरोबर गाण्यांनी लोकांना वेड केलं. गर्लफ्रेंड नसली तरी एखादा कार्यकर्ता भावनिक होईल असं यात एक गाणं आहे ते म्हणजे ‘आओगे जब तुम…. हे गाणं म्हणणाऱ्या उस्तादकडे मात्र फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही. याच उस्तादला पद्मभूषण जाहीर झालायं. (Singer Ustad Rashid Khan information)

उस्ताद राशीद खान म्हणजे संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव. उत्तर प्रदेशातील बदायुन येथील सहस्वान येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी उस्ताद निसार हुसैन खान (1909-1993) यांच्याकडून प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणेही आहेत. मुख्य प्रशिक्षण निसार हुसेन खान यांच्याकडून घेतले होते. सुरुवातीला बदायुन येथील त्याच्या घरी कठोर, शिस्तप्रिय निसार हुसेन खान सकाळी चार वाजल्यापासून आवाज प्रशिक्षण (स्वर साधना) वर आग्रह धरायचे आणि राशीदला तासनतास एक नोंद घेण्याचा सराव करायला सांगायचे. संपूर्ण दिवस फक्त एक नोट सराव करण्यात घालवायचा.

लहानपणी त्यांना संगीतात फारसा रस नव्हता. त्यांचे काका गुलाम मुस्तफा खान हे त्यांच्या संगीत कौशल्याची नोंद घेणारे पहिले होते आणि त्यांनी काही काळ त्यांना मुंबईत प्रशिक्षण दिले. राशीदला लहानपणी या धड्यांचा तिरस्कार वाटत असला, तरी शिस्तबद्ध प्रशिक्षणमुळे आज त्यांच्या तान आणि लयकारीमध्ये सहज प्रभुत्व दाखवते. 18 वर्षांचा होईपर्यंत राशीदला त्याच्या संगीत प्रशिक्षणाचा खरोखर आनंद वाटू लागला. इथून पुढे सुरू झाले एका महान संगीत पर्व.

शास्त्रीय गायक चित्रपटातील गाण्यापासून दूर राहण्यात धन्यता मानतात. पण राशीद खान यांच्या गायकीचा प्रभाव चांगल्या चांगल्या संगीतकारांवर होता. रहमान आणि इम्तियाझ अली यांनी राशीद यांच्या गायकीचे महत्व ओळखले. आओ गे जब तुम हे अजरामर गाणं तयार झालं. आजही हे गाणं एकांतात ऐकणाऱ्यांची संख्या मोजता येणार नाही इतकी असेल. शाहिद कपूरच्या मौसम चित्रपटातील गाणं पण त्यांनी ज्या पद्धतीने गायलं आहे ते ऐकून समाधी लागेल. उस्ताद हे गायकीच्या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने उस्ताद आहे. भारत सरकारने त्यांचा गौरव करून शास्त्रीय गायकीला एक वेगळी उंची दिली आहे. उस्ताद राशीद खान फारसे चर्चेत नसतात पण तरीही त्यांचे गायकीने ते लोकांच्या मनावर राज्य करून असतात. बॉलीवूड मध्ये संगीतकार म्हणून देखील त्यांनी काही चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

अशा या महान गायकाला पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याने हा पुरस्कार योग्य माणसाला मिळाला अशी अनेकांची भावना आहे. खुद्द पंडित भीमसेन जोशी यांनी राशीद खान यांच्याबद्दल बोलताना ‘भारतीय शास्त्रीय संगीताचे भविष्य’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.