आपल्या देशात राजकीय वाद कधी होतील काही सांगता येत नाही. म्हणजे असे वाद सुरु झाले तर लोक वाद करणाऱ्या राजकारण्यांकडे लक्ष देत नाहीत. लोकांना माहिती आहे हे राजकारणी काही वेळा पुरते भांडतील पण नंतर दोघेही एकत्रही दिसतील. तर असो, आता मात्र वाद वेगळा आहे. ह्या वादाला राजकीय वाद म्ह्णावे कि नाही हा प्रश्न आहे. लॉकडाउन मध्ये मजुरांना गावी कोणी जाऊ दिलं ह्याचा हा वाद.
लोकसभेत मोदींनी आरोपांची सुरुवात केली….
संसदेचं अर्थ अधिवेशन चालू आहे. राष्ट्रपतींनी दिलेल्या अभिभाषणाला धन्यवाद करण्यासाठी मोदींनी लोकसभेत भाषण दिल. साहजिकच राष्ट्रपतीला धन्यवाद देण्यासाठी जरी मोदी लोकसभेत आले असले तरी त्यांच्या निशाण्यावर विरोधी पक्षचं राहणार होते. अपेक्षेप्रमाणे मोदींनी विरोधानकांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. मुख्यतः काँग्रेस त्यांच्या निशाण्यावर होती. कोरोना स्थिती आणि लॉकडाऊनवर भाष्य करताना मोदी म्हणाले, ” कोरोना जागतिक महामारी होती , जग संकटात होते. भारत देखील एवढ्या मोठ्या महामारीचा सामना करण्याला तयार नव्हता. त्यामुळे आपल्याला अचानक लॉकडाऊन लावावे लागले. देशात लॉकडाऊन लावल्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्ली मुंबई सारख्या शहरातून मजुरांना त्यांच्या गृह रांज्यांमध्ये पाठवण्याची सोय केली…परिणाम असा झाला कि दिल्ली मुंबईत असलेला कोरोना युपी बिहार मध्ये वाढला. विरोधी पक्षांनी मजुरांना त्यांच्या गावी पाठवल्यामुळेच ग्रामीण भागात कोरोना पसरला. “
मोदींच्या आरोपांमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या…
पंतप्रधान मोदींच भाषण संपण्याच्या आधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर पलटवार केला. केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर मोदींच्या आरोपांची क्लिप चालवून पंतप्रधान खोटं बोलत असल्याचं जाहीर केलं. पंतप्रधानांना असे आरोप करणं शोभा देत नसल्याचं केजरीवाल म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रावर आरोप झाल्यामुळे महाराष्ट्रातून खूप टीका झाली. भाजप आणि पंतप्रधान मोदी महारष्ट्राचा द्वेष करत असल्याचा आरोप झाला. महाराष्ट्र द्रोही भाजप असा ट्रेंड पण सोशल मीडियावर चालवला गेला.
सोनू सूदने लॉकडाऊनची सत्य परिस्थिती सांगितली….
नट म्हणून सोनू सूद सर्वाना माहिती होता पण लॉकडाऊन मध्ये त्याने केलेल्या कामामुळे सोनू किती मोठ्या मनाचा माणूस आहे हे देखील लोकांना समजले. देश लॉकडाऊन मध्ये असताना मजुरांना घरी पाठवण्यासाठी सोनुने स्वतःच्या पैश्याने बसची व्यवस्था केली. मुंबई दिल्लीत राहण्याऱ्या मजुरांना घरी पाठवण्यासाठी सोनूने शक्य तेवढे प्रयत्न केले. सोनू सूद नसता तर अनके मजुरांना लॉकडाऊनमध्ये घरी जाणे शक्य झाले नसते. मजुरांना घरी पाठवल्यामुळेच ग्रामीण भागात कोरोना पसरल्याचाच आरोप मोदींनी केल्यामुळे त्या आरोपाबद्दल सोनू सूदला विचारले गेले. कारण सोनुने स्वतः मजुरांना घरी पाठ्वण्याची सोय केली होती.
पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर सोनू म्हणला ,” संसदेतले पंतप्रधानांचे भाषण मी बघितले. मला माहिती नाही मजूर गावात गेल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना पसरला कि नाही. पण त्यावेळची परिस्थीती फार भयानक होती. मजूर खूप असहाय्य होते. त्यांच्या राहण्याची , जेवणाची सोय नव्हती. रात्री बेरात्री मला ते फोन करायचे , फोनवर रडायचे. चार पाच महिन्याचे बाळ घेऊन महिला यायच्या आम्हाला गावी जायला मदत करा म्हणून विनवण्या करायच्या. त्यांच्या विनवण्या मीच काय कोणीही नाकारू शकला नसता. मी माझ्या परीने जे शक्य होत ते केलं. ज्या लोकांना घरी पाठवणं मला जमलं मी त्यांना पाठवलं. मला असं वाटत कि जर मजुरांना घरी पाठवलं नसत तर ते मजूर आणि त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती.”
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फायद्यासाठी आरोप केले असतील. विरोधकांनी पण त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठी मोदींवर प्रतिहल्ले केले असतील. पण आपल्याला एवढं कळतं कि सोनू सूदने जे काम केलं ते भारी होत. ज्या वेळेस सरकारने आपल्या नागरिकांना , मजुरांनां देवाच्या भरवश्यावर मरायला सोडलं तेंव्हा हा सोनू सूद नावाचा माणूस त्यांच्या मदतीला आला. सोनू सूद म्हणतोय तसं जर त्याने लोकं घरी पाठवलं नसतं तर ते आणि त्यांची मुले रस्त्यावर मरून पडलेली असती.
तुम्हाला काय वाटतं सोनू सूदने बरोबर केलं कि मजुरांनां घरी पाठवून चूक केली.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार