सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ऑस्ट्रेलियात २००७ साली पाहिल्यान्दा विराट कोहलीचे नाव ऐकलं..

भारतीय टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली आज ४ मार्च पासून श्रीलंका संघासोबत त्याचा शंभरावा टेस्ट मॅच खेळत आहे. शंभर धावा असतील नाही तर शंभर विकेट्स खेळाडू साठी त्या नेहमीच खास असतात. कारण त्या मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत केली असते. त्याही पेक्षा जर खेळाडू त्याचा शंभरावा टेस्ट मॅच खेळत असेल तर आपण अंदाज लावू शकतो कि तो त्याच्या साठी किती खास असेल. म्हणूनच आज विराट कोहलीला चियर्स करण्यासाठी त्याची बायको आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पण मैदनावर दिसणार आहे.

सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला त्याच्या शंभराव्या टेस्ट मॅच साठी शुभेच्छा दिल्यात.

विराटला त्याच्या शंभराव्या मॅच साठी जगभरातून शुभेच्छा येत आहेत. मात्र विराट साठी सर्वात खास शुभेच्छा आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या शुभेच्छा . सचिन तेंडुलकर यांचे भारतीय लोकांच्या मनात काय स्थान आहे हे सांगायची गरज नाही. विराट कोहली साठी देखील सचिन तेंडुलकर खूप आदराचे स्थान ठेवतो.

बीबीसीआयने एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात सचिन तेंडुलकर , सौरभ गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने विराटला शंभराव्या मॅच साठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन म्हणतो , ” २००६ साली आम्ही ऑस्ट्रेलिया दौर्यावर होतो. भारतीय क्रिकेटचं भविष्य काय असेल याच्यावर त्यावेळी नेहमी चर्चा व्हायची. चर्चेत नेहमी विराट कोहलीचं नाव यायच. विराट त्यावेळेला अंडर १९ खेळायचा. मी त्यावेळा पहिल्यांदा विराट कोहलीचा नाव ऐकलं. नंतर आम्हीं दोघे एकत्र खेळलो देखील पण जास्त काळ खेळता आले नाही. मी बघितले आहे विराट नेहमीच नवीन शिकण्यासाठी तत्पर असतो. नवीन शिकण्याच्या त्याच्या स्वभावानेच त्याला एवढ्या मोठ्या स्थानावर पोहचवले आहे. शंभराव्या टेस्ट मॅच साठी विराटला खूप खूप शुभेच्छा .”

शंभर टेस्ट मॅच खेळणं साधं यश नाही .

भारतीय क्रिकेट टीमचे कोच राहुल द्रविड यांनी देखील विराट कोहलीला शंभराव्या टेस्ट मॅच साठी शुभेच्छा दिल्यात , ” राहुल व्हिडिओ मध्ये म्हणतो शंभर टेस्ट खेळणे हा एक रेकॉर्ड आहे. मी विराट कोहलीचे क्रिकेट सुरुवातीपासून पाहत आहे. विराटने त्याच्या खेळात खूप बदल केले आहेत . विराट खूप प्रतिभावान खेळाडू आहे. विराटचे आणखी खूप क्रिकेट आपल्याला बघायचे आहे. विराटला त्याच्या शंभराव्या टेस्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा .”

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यात कॅप्टन्सी वरून वाद झाल्याच्या बातम्या आली होत्या. विराट कोहलीने पण त्याला त्याच्या पत्रकार परिषेदेत दुजोरा दिला होता. पण विराट कोहलीच्या शंभराव्या टेस्ट मॅच साठी गांगुलीने पण शुभेच्छा दिल्या आहेत. गांगुली म्हणतो ,” विराट कोहली मागच्या अकरा वर्षांपासून भारतासाठी क्रिकेट खेळत आहे. विराटचं करियर खूप शानदार राहिलं आहे. त्याच करियर असच बहरत राहो अश्या मी त्याला शुभेच्छा देतो. शंभराव्या टेस्ट मॅच साठी बीसीसीआय कडून विराटला खूप खूप शुभेच्छा .”

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.