सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ट्विटरच्या CEO पदी विराजमान भारतीय ‘पराग अग्रवाल’ कोण आहेत ?

जगभरातल्या प्रसिद्ध कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. त्यात मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, गुगलचे सुंदर पिचाई, IBM चे अरविंद कृष्णा आणि आता त्यांच्या रांगेत ट्विटर पण आले आहे. ट्विटरचे संस्थापक आणि CEO जॅक डोर्सी यांनी २९ नोव्हेंबरला एक पत्रक काढून भारतीय इंजिनियर पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या CEO पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

पराग अग्रवाल यांचा ट्विटर प्रवास

पराग अग्रवाल यांनी २०१० ला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ट्विटर जॉईन केले होते. २०१७ साली त्यांची ट्विटरने चीफ टेक्नॉलॉजि डेव्हलपर म्हणून बढती केली होती. पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम केलं आहे. दहा वर्षाच्या प्रवासानंतर जॅक डोर्सी यांनी पराग अग्रवाल यांची CEO म्हणून निवड केली आहे.

फेक माहितीला आळा बसवणाऱ्या प्रोजेक्ट ब्लू स्कायवर पराग यांनी काम केले आहे.

२०१९ च्या डिसेंबर मध्ये प्रोजेक्ट ब्लू स्काय ट्विटरने सुरु केलं. त्यात त्यांनी ओपन सोर्स वापरून जगभरातल्या लोकांना प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट करून फेक माहितीला ट्विटरवर पसरण्यापासून रोखले. प्रोजेक्ट ब्लू स्काय मुळे ट्विटरवर इतर समाज माध्यमांपेक्षा कमी फेक माहिती पसरते. ट्विटर ने फेक माहितीवर काही अंशी मत केली आहे. ट्विटरचा जॅक डोर्सी याने प्रोजेक्ट ब्लू स्काय साठी पराग अग्रवाल याचे अनेक कार्यक्रमात कौतुक केले आहे.

पराग अग्रवाल यांचे शिक्षण

मुंबईच्या IIT मध्ये पराग अग्रवाल यांनी इंजिनीरिंग केले आहे. २००१ च्या बॅचचे ते विद्यर्थी आहेत. मुंबई मध्ये B Tech केल्यानांतर पराग अग्रवाल यांनी अमेरिकेच्या स्टँडफोर्ड विद्यापीठातून Computer Science मध्ये PHD केली आहे. PHD झाल्यावर याहू, मायक्रोसॉफ्ट मध्ये काही काळ काम केल्यानांतर पराग यांनी २०१० मध्ये ट्विटर जॉईन केलं. आणि आज एक दशकाच्या प्रवासानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे CEO झाले आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.