सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मुस्लिम महिलांचा लिलाव करणारं अँप आलंय. बुली बाई बद्दल वाचलंय का ?

Bullie App and Sulli deals

बुली बाई नावाचं एक मोबाइल अँप आलंय. बुली बाई मध्ये भारतातल्या प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो आहेत आणि त्यांना विकायला काढलं असल्याचे बोललं जात आहे. प्रत्येक महिलेच्या फोटो समोर तिची किंमत पण लिहली आहे.

ट्विटरवर नवीन वर्षाची सुरुवात वादग्रस्त ट्रेंड्सने झाली आहे. दोन जानेवारीला ट्विटरवर बुली बाई नावाने ट्रेंड्स चालला. हजारो लोकांनी बुली बाईचा हॅशटॅग वापरला. मुस्लिम महिलांचा व्यापार करत असल्याचा दावा करत असणाऱ्या अँपच्या विरोधात अनेक जणांनी आवाज उठवला. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसात बुली बाई अँपच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. बुली बाईच्या अगोदर पण सुली डीलस नावाने असेच मुस्लिम महिलांना विकणारे अँप आले होते. त्यामुळे हे महिलांना विकणारे अँप काय आहेत हे समजून घेऊ.

बुली बाई अँप मध्ये नेमकं काय आहे ?

बुली बाई हे बाकी मोबाइल अँप सारखेच आहे. गिभ हबच्या वेबसाईटला जाऊन कोणीही त्याला डाउनलोड करू शकतो. ज्या वेळेस आपण बुली बाई अँप उघडतो तेंव्हा अँप आपल्याला महिलांचे फोटो दाखवतो. त्या सगळ्या महिला मुस्लिम आहेत. महिलांच्या फोटो समोर त्यांची किंमत दिलेली असते. दिलेल्या किमतीवर ती महिला तुम्हाला विकत घेता येऊ शकते असा दावा केला आहे. अश्या प्रकारे बुली बाई अँप बनवलं आहे.

बुली बाई कोणी बनवलं आहे ?

ट्विटरवर ट्रेंड् आल्यावर हे अँप कोणी बनवलं आहे याचा शोध सुरु झाला. पण सध्या तरी बुली बाईचा निर्माता कोण आहे याच नाव उघड झालं नाही. ट्विटरवर अनेक वापरकर्त्यानी गिभ हट नावाच्या वेबसाईटने बुली बाई अँप बनवला असल्याचे दावे केले आहेत. बुली बाई अँपचा आय पी ऍड्रेस आणि गिभ हटच्या लिंक असल्याचे स्क्रीन शॉट्स शेयर केले आहेत. गिभ हटने मात्र ह्या सगळ्या प्रकरणावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही.

सहा महिन्यापूर्वी आले होते सुली डील अँप.

जून महिन्यात बुली बाई सारखंच सुली अँप गिभ हट वर आलं होत. सुली अँपवर पण मुस्लिम महिलांचे फोटो होते. त्यांच्या फोटो समोर त्यांची किंमत दिली होती आणि लोक त्या मुस्लिम महिलांना विकत घेऊ शकत होते. सुली अँप वर पण प्रसिद्ध महिलांचे फोटो वापरले होते. पत्रकार राणा अयुब, रेडिओ जॉकी सायमा आणि मुस्लिम अभिनेत्रींचे फोटो सुली अँप मध्ये वापरले होते. सुली अँपच्या विरोधात पण पोलीस तक्रारी दाखल केल्या होत्या. पोलीस तक्रारी झाल्यावर झाल्यावर गिभ हटने सुली अँप त्यांच्या वेबसाईट वरून काढून टाकले होते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.