सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

व्हाट्सअपची पॉलिसी तूर्तास कॅन्सल,पब्जी लवकरच भारतामध्ये येणार,लवकरच जिओ कार्डचा प्लान सूची किंमत वाढणार..

प्रायव्हसी पॉलिसी तुर्तास रद्द

१) व्हाट्सअपची असलेली प्रायव्हसी पॉलिसी तुर्तास रद्द करण्यात आली आहे. यामुळे ज्या लोकांनी ही पॉलिसी मान्य केली नाही यांचे अकाउंट डिलीट केल्या जाणार नाही असे व्हाट्सअप इंडियाचे हेड यांनी ही माहिती दिली तर या लोकांचं काय करायचं तेही नंतर ठरवणार असे सांगितले.

बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया

२) पब्जी हा प्रसिद्ध गेम लवकरच नव्या नावाने भारतात लॉन्च होणार आहे. त्याचं नाव बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असणार आहे व यामध्ये भारतीय लोकांना फक्त भारतीय लोकांसोबतच खेळता येणार आहे. हा गेम फक्त भारतीयांपुरत मर्यादित राहणार असल्याने आपल्याला बाहेरच्या देशामधील
जनतेसोबत हा गेम खेळता येणार नाही. सोबतच कंपनीने सांगितले आहे की या गेममध्ये कोणत्याही प्रकारची चायनीज गुंतवणूक राहणार नाही आणि भारतीय लोकांची सुरक्षा व त्यांच्या डेटाची सुरक्षा करण्यासाठी याचे सर्व्हर भारतामध्ये असणार आहे. अजून बरेच काही नियम त्यांनी या नवीन नावासोबत जाहीर केले आहेत. ज्यामध्ये रोज लेखीमध्ये पासेस विकत घेतल्या जाणार आहे. याशिवाय कोणताही खर्च हा मर्यादित करण्यात आलेला आहे, जो की सात हजार रुपये प्रति प्लेयर प्रतिदिवस ठेवण्यात आलेला आहे.

जिओ कार्डच्या प्लान्सची किंमत वाढणार ?

३) येत्या काही महिन्यांमध्ये जिओ कार्डच्या प्लान्स ची किंमत वाढणार आहे, अशी बातमी मिळत आहे ती कितपत खरी आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच,पण जर हल्ली पाहिलं तर जिओ फार उत्कृष्ट कमाई करत आहे आणि फार चांगल्या प्रमाणात नफा त्यांना झालेला आहे तरीसुद्धा या किंमत वाढी मागचा उद्दिष्ट काय असू शकतो हे अजुन तरी स्पष्ट नाही. पण जर ही गोष्ट खरी असल्यास आपल्या खिशाला कात्री लागली ते नक्कीच. ३९९ चे असणारे प्लॅन ४४४ आणि मग आता ५५५ वर गेले आहे. भविष्यात ते किती वाढतील किती याची माहिती लवकरच कळेल.

‘अमेझॉन प्राईम डे’ सेल तूर्तास लांबणीवर

४)ॲमेझॉनने त्यांचा वर्षभरातला सर्वात महत्वाचा असलेला ‘अमेझॉन प्राईम डे’ सेल हा तूर्तास लांबणीवर गेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा सेल पुढे ढकलण्यात आला आहे. याउलट फ्लिपकार्टचा ‘बिग सेविंग डेज’ सेल हा एक ते सात मे पर्यंत सुरू होता. डिस्काउंटची वाट पाहणार्‍यांना अजून काही वेळ ह्या सेल ची प्रतीक्षा करावी लागणार.

कशी वाटली आजची टेक न्यूज कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळू द्या.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.