स्टॅन्ड अप कॉमेडी सध्या भारतात चांगलीच चर्चिली जात आहे. स्टॅन्ड अप कॉमेडीला तरुणांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मागच्या आठवड्यात कॉमेडियन वीर दास मुळे तर आता मुनावर फारुकी मुळे स्टँड अप बातम्यांमध्ये आहे. कॉमेडियन मुनावर फारुकीला त्याचे बँगलोरमधील शो रद्द करायला सांगितल्याने आपण स्टॅन्डअप कॉमेडी सोडत असल्याचं त्यानं जाहीर केलं आहे.
मुनावर फारुकी कोण आहे?
मुनावर फारुकी हा मूळचा गुजरातचा आहे. सध्या तो मुंबई मध्ये राहतो. मुनावरची कॉमेडी सरकार विरोधी असते. मुनावर फारुकी म्हणतो की कॉमेडी नेहमी सत्तेच्या विरोधातच केली जाते. तर सरकारचे समर्थक मुनावर फारुकी वर हिंदू धर्माचा अपमान करतो असा आरोप करतात. मुनावर फारुकीच्या विरोधात अनेक संघटनांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. मुनावरला विरोध करणाऱ्यांसोबत त्याच्या स्टॅन्ड अप साठी गर्दी करणारे त्याचे चाहते पण खूप आहेत.
इंदोर मध्ये का जावं लागलं मुनावर फारुकीला कारागृहात?
२०२० च्या जानेवारी मध्ये मुनावर फारुकीचे स्टँड कॉमेडी शो मध्यप्रदेशच्या इंदोर मध्ये आयोजित केले होते. इंदोर मध्ये चालू स्टॅन्ड अप कॉमेडी मध्ये भाजपच्या लोकांनी मुनावर फारुकीचा स्टॅन्ड अप बंद पाडला. इंदोरच्या त्या शो मध्ये मुनावर फारुकी हिंदू देव देवतांचा अपमान करत असल्याचा भाजपच्या लोकांनी आरोप केला होता. मुनावर फारुकीच्या विरोधात इंदोर मध्ये पोलीस तक्रार झाली होती.सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम मुनावर फारुकी करत असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला. त्याच केस मध्ये मुनावर फारुकीला अटक झाली होती. मुनावर त्या केस मध्ये दोन महिने इंदोरच्या कारागृहात होता. मुनावर फारुकीच्या शोला असलेल्या प्रेक्षकांनी मात्र मुनावर फारुकीने हिंदू देवतांचा अपमान केल्याचे मान्य केले नाही. त्याला फसवल्याचे मुनावर फारुकीचे चाहते सांगतात. कॉमेडी केल्यामुळे कारागृहात जावं लागणारा मुनावर फारुकी हा भारतातला पहिलाच कॉमेडियन असेल.
बँगलोर मध्ये काय झाले?
डिसेंबर महिन्यात मुनावर फारुकीचे स्टॅन्ड अप कॉमेडी शो बँगलोरमध्ये आयोजित केले होते. परंतू मुनावर फारुकीला काही हिंदू संघटनांकडून धमक्या येत होत्या. जर मुनावरचे शो तुम्ही चालवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो उधळून लावू इत्यादी धमक्यांचे फोन आयोजकाला येत असल्याने मुनावर फारुकीच्या आयोजकाने त्याचे बँगलोरमधील शो रद्द केले. नोव्हेंबरमध्ये मुंबईतही त्याचे दहा शो अश्याच धमक्यांच्या कारणाने रद्द करावे लागले होते. बँगलोर येथील शो रद्द झाल्यावर मुनावर फारुकीने त्याच्या समाज माध्यमाच्या अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात तो म्हणतोय,
द्वेष जिंकला आहे आणि कला मात्र हारली, तुम्ही खूप प्रेमळ प्रेक्षक होतात मी आता स्टॅन्ड अप कॉमिडी सोडतोय
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !